एक्स्प्लोर

ठाण्यात कडकडीत लॉकडाऊन; नियम मोडणाऱ्या वाहन चालकांकडून लाखोंचा दंड वसूल

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ठाण्यात कडकडीत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. ठाण्याच्या आयुक्तांनी घेतलेल्या या निर्णयाला ठाणेकरांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

ठाणे : ठाणेकरांनी लॉकडाऊनचा पहिला दिवस अतिशय शिस्तबद्ध रीत्या पाळला. काल (गुरुवारी) ठाण्यातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी तुरळक माणसे दिसून येत होती. तसेच भाजी मंडई आणि धान्य बाजारपेठ सुरु असून देखील त्या ठिकाणी गर्दी पाहायला मिळाली नाही. त्यामुळे covid-19 ची साखळी तोडण्यासाठी प्रशासनासोबत ठाणेकरदेखील या लढाईत उतरले असल्याचे चित्र बघायला मिळाले.

ठाण्यातील कोविड-19 ची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे ठाण्याच्या आयुक्तांनी दहा दिवसांच्या पूर्णतः लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी ठाणेकरांनी देखील चांगला प्रतिसाद प्रशासनाला दिला. वेगवेगळ्या भागात आम्ही पडताळणी केली असता तिथे रस्त्यावर माणसांची गर्दी दिसून आली नाही. नौपाडा, वागळे इस्टेट, आनंदनगर, कळवा, मुंब्रा, लोकमान्य नगर अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन एबीपी माझा टीमने पडताळणी केली.

लॉकडाऊन जरी असले तरी ठाण्यात भाजीपाला आणि धान्य उपलब्ध असणार आहे. याबाबतीत थोडा संभ्रम सुरुवातीस निर्माण झाला होता. मात्र आता पोलिसांनी जांभळी नाका येथील मुख्य भाजीपाला मंडई सकाळी सहा ते अकरा वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे. तसेच धान्य बाजारपेठ देखील सकाळी आठ ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे या जीवनावश्यक वस्तू ठाण्यात उपलब्ध असणार आहेत. याव्यतिरिक्त तर सर्व दुकाने बंद राहतील. दुकानदारांनी देखील या बंदला उत्तम प्रतिसाद दिला आहे.

पाहा व्हिडीओ : ठाणे आणि कल्याण-डोंबिवलीत 2 ते 12 जुलैपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन

ठाणे ट्रॅफिक पोलिसांची कारवाई

लॉकडाऊन असूनही घराबाहेर विनाकारण वाहन घेऊन फिरणाऱ्या नागरिकांवर ठाणे वाहतूक पोलिसांनी चांगलीच कारवाई करत लाखोंचा दंड देखील वसूल केला. यामध्ये दुचाकीवर डबल सीट बसणे, तीन चाकी आणि चार चाकी वाहनात क्षमते पेक्षा जास्त प्रवासी घेऊन जाणे, हेल्मेट न घालणे अश्या कारवाईंचा समावेश देखील समावेश आहे. गुरुवारी सकाळपासून संध्याकाळी 6 पर्यंत वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईची आकडेवारी पाहूया. ठाणे पोलीस आयुक्तालयात ठाणे शहर, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडी, कळवा आणि मुंब्रा हे सर्व विभाग येतात. या सर्व विभागात मिळुन एकूण 316 वाहनांवर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत कारवाई करण्यात आली. यात 249 दुचाकी, 56 तीन चाकी आणि अकरा चारचाकी वाहनांवर कारवाई केली गेली. दिवस भरात एकूण 2744 चलान दिले गेले. तर 13 लाख 09 हजार दोनशे रुपयांचा दंड दिवसभरात आकारला गेला.

महत्त्वाच्या बातम्या : 

मुंबईत 60 लाखांचा हिरोइन जप्त; गुन्हे शाखेची कारवाई

कारागृहात फैलावणाऱ्या कोरोना संदर्भातील याचिकेवर हायकोर्टाचा निकाल जाहीर

कोरोना बाधित रुग्णांवर उपचारांसाठी जास्त पैसे घेतल्याने नानावटी रुग्णालयावर गुन्हा; मुंबई महापालिकेची कारवाई

महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे मोठ्या त्वेषाने मुंबईकडे चाल करून जातात अन् गुलाल उधळत येतात; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका
मनोज जरांगे मोठ्या त्वेषाने मुंबईकडे चाल करून जातात अन् गुलाल उधळत येतात; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या हायकोर्टात जायच्या हालचाली, मुंबई पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल, 50 जणांची लिस्ट मागवली, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंच्या हायकोर्टात जायच्या हालचाली, मुंबई पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल, 50 जणांची लिस्ट मागवली, नेमकं काय घडलं?
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त स्वरुपात फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Breaking LIVE: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा संक्षिप्त स्वरुपात फक्त एका क्लिकवर...
Ashish Shelar : मनोज जरांगे यांचे आंदोलन अतर्क, आताताईपणा अन् अर्वाच्च भाषेचं, छत्रपतींना मानणारा...; मंत्री आशिष शेलार भडकले, मराठा समाजालाही आवाहन
मनोज जरांगे यांचे आंदोलन अतर्क, आताताईपणा अन् अर्वाच्च भाषेचं, छत्रपतींना मानणारा...; मंत्री आशिष शेलार भडकले, मराठा समाजालाही आवाहन

व्हिडीओ

Nashik Tree Cutting : नाशिकमध्ये झाडं तोडणारे हात नेमके कुणाचे? | Special Report ABP Majha
Jarange Chalo Mumbai : जरांगे मुंबई गाठणार की तोडगा निघणार? Special Report
Uniform Civil Code 2029 : 2029 आधी यूसीसी लागू करण्याचा प्रयत्न | Special Report ABP Majha
Disha Salian FIR : सतीश सालियन यांच्या जबाबानंतर जोरदार राजकारण Special Report
Manoj Jarange Patil Mumbai Morcha : मनोज जरांगेंची मुंबईकडे कूच; गाडीत बसताच रडले आणि म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Pakistan Navy Ship Collision: भारत आणि पाकिस्तानच्या अरबी समुद्रात चक्क युद्धनौका धडकल्या, दिल्लीत तातडीने मोठ्या हालचाली
भारत आणि पाकिस्तानच्या अरबी समुद्रात चक्क युद्धनौका धडकल्या, दिल्लीत तातडीने मोठ्या हालचाली
मनोज जरांगे मोठ्या त्वेषाने मुंबईकडे चाल करून जातात अन् गुलाल उधळत येतात; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका
मनोज जरांगे मोठ्या त्वेषाने मुंबईकडे चाल करून जातात अन् गुलाल उधळत येतात; विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या हायकोर्टात जायच्या हालचाली, मुंबई पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल, 50 जणांची लिस्ट मागवली, नेमकं काय घडलं?
मनोज जरांगेंच्या हायकोर्टात जायच्या हालचाली, मुंबई पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल, 50 जणांची लिस्ट मागवली, नेमकं काय घडलं?
Rinku Singh: सव्वा वर्षापूर्वी साखरपुडा अन् आता रिंकू आणि खासदार सरोज लग्नाच्या बेडीत अडकणार, हाॅटेलसकट मुहूर्तही ठरला
सव्वा वर्षापूर्वी साखरपुडा अन् आता रिंकू आणि खासदार सरोज लग्नाच्या बेडीत अडकणार, हाॅटेलसकट मुहूर्तही ठरला
एकावरचा हल्ला तिघांवर समजला जाणार म्हणत मक्का करार झाला अन् अण्वस्त्रधारी पाकिस्तानने फक्त 40 दिवसात कलटी मारली? अडचणीतील सौदीला नकारघंटा, नेमकं काय घडलं?
एकावरचा हल्ला तिघांवर समजला जाणार म्हणत मक्का करार झाला अन् अण्वस्त्रधारी पाकिस्तानने फक्त 40 दिवसात कलटी मारली? अडचणीतील सौदीला नकारघंटा, नेमकं काय घडलं?
Cabinet Meeting : मंत्रीमंडळ बैठकीनंतर सर्व अधिकारी बाहेर गेले अन् प्रत्येक जण...; जरांगेंच्या भाषेबाबत मंत्र्यांचा नाराजीचा सूर, भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी
मंत्रीमंडळ बैठकीनंतर सर्व अधिकारी बाहेर गेले अन् प्रत्येक जण...; जरांगेंच्या भाषेबाबत मंत्र्यांचा नाराजीचा सूर, भुजबळांनी सांगितली इनसाईड स्टोरी
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना
बंगाली IPS अधिकारी बुशरा बानोंनी स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारांना "इन्शाअल्लाह, जझाकअल्लाह" म्हणताच थेट बदली, टीम इंडियाचा माजी कॅप्टन तडकाफडकी निर्णयावर भडकला
Sanjeev Sonawane Latur Crime: संजीव सोनवणे यांनी आयुष्य संपवण्यापूर्वी लिहलेल्या पत्रातील त्या वाक्याने गूढ वाढवलं, म्हणाले, ‘I am a good fool’; मेसेजमुळे चर्चेला उधाण
संजीव सोनवणेंनी आयुष्य संपवण्यापूर्वी लिहलेल्या पत्रातील त्या वाक्याने गूढ वाढवलं, म्हणाले, ‘I am a good fool’; मेसेजमुळे चर्चेला उधाण
Embed widget