Coronavirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील शेअर प्रवासी वाहतुकीवर बंदी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील जिल्हाधिकाऱ्यांनीही अनेक गोष्टिंवर निर्बंध लावण्यात आले आहेत.
ठाणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपयायोजना म्हणून ठाणे जिल्ह्यात टाळण्यासाठी शेअर रिक्षा, शेअर ओला, शेअर उबर आणि ग्रामीण भागातील काळया-पिवळया जीप अशा प्रकारची एकत्रित प्रवासी वाहतूक करणारी व्यवसायिक वाहनांवर बंदी घालण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.
शेअर रिक्षा, शेअर ओला, शेअर उबर आणि ग्रामीण भागातील काळया-पिवळया जीपमधून सर्व सामान्य प्रवासी शेअरींगद्वारे शहरांतर्गत आणि ग्रामीण भागात ये-जा करत असतात, त्या अनुषंगाने प्रवासादरम्यान कोरोना विषाणू (COVID-19) चा प्रसार आणि प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे अशी शेअरींग प्रवासी वाहतुक करणारी वाहने जसे 'शेअर रिक्षा, शेअर ओला, शेअर उबर आणि ग्रामीण भागातील काळ्या-पिवळ्या जीप ही प्रवासी वाहतूक करणारी व्यवसायिक वाहने इत्यादी दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्यात यावीत, असे आदेश दिले आहेत.
Coronavirus | कोरोना प्रतिबंधक उपचाराचा 'गोल्डन अवर' सुरू, यंत्रणांनी सतर्क रहावे : मुख्यमंत्री
सदर आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था/ संघटना महाराष्ट्र कोव्हीड-19 उपाययोजना नियम, 2020 चे नियम 11 नुसार, भारतीय दंड संहिता ( 45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदींनुसार दंडनिय/ कायदेशीर कारवाईस पात्र राहील. सदर आदेशाची अंमजबजावणी आजपासून तात्काळ लागू करण्यात आली आहे.
पाहा व्हिडीओ : Coronavirus | टॅक्सी चालकांकडून टॅक्सीचं निर्जंतुकीकरण
सर्व दुकाने आस्थापना पुढील आदेशापर्यत बंद
ठाणे जिल्ह्या कार्यक्षेत्रातील नागरिकांची एका ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व दुकाने व आस्थापना (अत्यावश्यक किराणा सामान ( GROCERY), दुध व भाजीपाला, अन्य जीवनावश्यक वस्तु व औषधालय वगळून) तसेच हॉटेल्स, बिअरबार, वाईन शॉप दिनांक 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याबाबत आदेशित करण्यात आले आहे. तसेच जी किराणामालाची दुकाने, औषधालय, दुधाची व भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तुची दुकाने उघडी ठेवण्यात येणार आहेत. अशा ठिकाणी आवश्यक ती स्वच्छता ठेवण्यात यावी. तसेच नागरिकांकरिता हॅण्डवॉश, सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात यावे अशा सुचना जिल्हाधिकारी श्री नार्वेकर यांनी दिल्या आहेत.
संबंधित बातम्या :
मास्क, सॅनिटायझरची विनापरवाना विक्री, आतापर्यंत 25 ठिकाणी धाडी टाकत दीड कोटींचा माल जप्त
Coronavirus | मुंबईतली कॉरंटाईन क्षमता संपली, आता विमानतळावरुनच प्रवाशांची मुंबईबाहेर रवानगी