एक्स्प्लोर
Coronavirus | कोरोनासंदर्भातील मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री विरुद्ध प्रशासकीय अधिकारी!
मंत्र्यांनी कोरोना बाबत संसर्ग वाढू नये म्हणून काही कठोर निर्णय घेण्याची भूमिका मांडली, पण अधिकाऱ्यांनी मात्र या भूमिकेला विरोध केल्याने हे निर्णय आजच्या बैठकीत झाले नाहीत.
मुंबई : कोरोनाच्या परिस्थितीबाबत आज मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. आजच्या बैठकीत कोरोना संसर्ग थांबवा म्हणून सार्वजनिक वाहतुकीवर बंदी घालण्याचा महत्वाचा विषय होता. या बैठकीत काही निर्णयावरुन मंत्री विरुद्ध प्रशासकीय अधिकारी यांच्यातील दोन वेगवेगळ्या भूमिका दिसून आल्या.
या बैठकीत मंत्र्यांची स्पष्ट भूमिका होती की ज्या गतीने रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अनेक विभागांवर ताण येईल. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक थांबवली पाहिजे. विशेषतः मुंबई लोकल ट्रेनच्या गर्दीमुळे संसर्ग वाढू शकतो म्हणून सार्वजनिक वाहतुकीबाबत निर्णय घ्यावा अशी काही मंत्र्यांची भूमिका मांडली. तब्बल एक तास याबाबत चर्चा झाली पण सार्वजनिक वाहतूक बंद करण्याला राज्यातील वरिष्ठ मंत्र्यांनी विरोध केला.
पण सार्वजनिक वाहतूक बंद झाली तर रोजंदारी काम करतात त्यांच्या उपजीविकेवर परिणाम होईल, पॅनिक होईल अशी भूमिका अधिकाऱ्यांनी मांडली त्यामुळे याबाबत अजून दोन दिवस आढावा घेऊन नंतर निर्णय घ्यावा असे मत ठरले.
हा निर्णय होत नसेल तर किमान शासकीय कर्मचाऱ्यांबाबत निर्णय घेण्याची भूमिका मंत्र्यांनी मांडली. पण अधिकाऱ्यांचा त्याला विरोध होता. सगळ्यांना सुट्टी देण्यापेक्षा 50% कर्मचाऱ्यांनी काम करावे, घरून काम करण्याची मुभा द्यावी असा निर्णय झाला. एकूणच मंत्र्यांनी कोरोना बाबत संसर्ग वाढू नये म्हणून काही कठोर निर्णय घेण्याची भूमिका मांडली, पण अधिकाऱ्यांनी मात्र या भूमिकेला विरोध केल्याने हे निर्णय आजच्या बैठकीत झाले नाहीत.
बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले
सरकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सुट्टी देण्याच्या निर्णयाची चर्चा सुरु होती. मात्र सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जाणार नसल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. सोबतच मुंबईत लोकल आणि बससेवा बंद करणार नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं. यानंतर बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, राज्यात 40 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. एकाचा सकाळी मृत्यू झाला. या रुग्णांमध्ये 26 पुरुष तर 14 महिला आहेत. यातील एक रुग्ण गंभीर आहे. इतर रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.
ते म्हणाले की, मी पुन्हा आवाहन करतोय, आजही आम्ही बस, ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. पण गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. गर्दी टाळा. पण जर गर्दी ओसरली नाही तर आम्हाला कठोर पावलं उचलावी लागतील, असंही ते म्हणाले, त्यांनी सांगितलं की, मी मुंबईतील दुकानदारांनाही विनंती करतोय की जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सोडून इतरांनी दुकानं बंद ठेवावीत.
ठाकरे म्हणाले की, मंत्रालय आणि सरकारी कार्यालयातील संख्या 50 टक्क्यांवर आणण्याचा प्रयत्न आहे. कमी उपस्थितीत आम्ही कसं काम चालवायचं याचा आढावा घेत आहोत. त्याचा आम्ही विचार करु, असं त्यांनी सांगितलं. आपण जे करता येणं शक्य आहे, ते आपण करतोय. पण सर्वांनी सहकार्य केलं तर संभाव्य धोका आपण टाळू शकतो.
बस, ट्रेन बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही. पण गर्दी टाळली नाही तर नाइलाजानं असा निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते, असं ते म्हणाले. ट्रॅफिक बऱ्यापैकी कमी झालं आहे. बस, ट्रेन अत्यावश्यक सेवा आहेत. त्या बंद करु नयेत याच मताचे आम्ही आहोत, असं ते म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
मुंबई
महाराष्ट्र
रत्नागिरी
Advertisement