मेडिकल, फार्मसी, नर्सिंग कॉलेजमध्ये सुट्ट्यांबाबत संभ्रम; अमित देशमुख यांना युवासेनेचं पत्र
एकीकडे सर्व महाविद्यालय, शाळांना 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर केलेली असताना मेडिकल, फार्मसी, नर्सिंग कॉलेजला सुट्टी मिळालेली नाही किंवा तसे निर्देश दिलेले नाहीत. युवासेनेने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना पत्र लिहून यबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन हा संभ्रम सोडवण्याची मागणी केली आहे.
![मेडिकल, फार्मसी, नर्सिंग कॉलेजमध्ये सुट्ट्यांबाबत संभ्रम; अमित देशमुख यांना युवासेनेचं पत्र Coronavirus - Confusion over holidays in medical, pharmacy, nursing college; Yuva Sena writes to Amit Deshmukh मेडिकल, फार्मसी, नर्सिंग कॉलेजमध्ये सुट्ट्यांबाबत संभ्रम; अमित देशमुख यांना युवासेनेचं पत्र](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/06/22110409/Medical.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यभराती सर्व शाळा तसंच महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मेडिकल, फार्मसी, नर्सिंग महाविद्यालयात सुट्ट्यांबाबत संभ्रमाचं वातावारण आहे. यासंदर्भात युवासेनेचे साईनाथ दुर्गे यांनी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना पत्र लिहून निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
एकीकडे राज्यातील सर्व महाविद्यालयं, शाळांना 31 मार्च पर्यंत सुट्टी जाहीर केली आहे. परंतु मेडिकल, फार्मसी, नर्सिंग महाविद्यालयांना नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून सुट्टी मिळालेली नाही किंवा तसे निर्देश देण्यात आलेले नाहीत.
सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी नाही, मुंबईत लोकल आणि बससेवा बंद करणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या पदवीच्या विद्यार्थ्यांना गरज नसतानाही कॉलेजला बोलवलं जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाही विद्यार्थ्यांना कॉलेजला यावं लागत आहे. महाविद्यालयांना सुट्टीचे कोणतेही आदेश दिलेले नाहीत. सुट्टीबाबत कोणी विचारणा केली तर विद्यापीठाकडून जोपर्यंत निर्देश येत नाही तोपर्यंत सर्व महाविद्यालयात हजेरी घेणार असून स्ट्रिक्ट कॉलेज गाईडलाइन फॉलो करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
त्यामुळे युवासेनेने वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांना पत्र लिहून यबाबत लवकरात लवकर निर्णय घेऊन हा संभ्रम दूर करण्याची मागणी केली आहे. अमित देशमुख यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश द्यावेत. तसंच कोणत्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये यावं आणि कोणत्या नाही हे देखील स्पष्ट करावं, असंही पत्रात म्हटलं आहे.
कमलनयन बजाज नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये न येण्याचा पवित्रा घेतला. मात्र यानंतर आम्हाला विद्यापीठाकडून जोपर्यंत आदेश मिळत नाही तोपर्यंत सुट्टी जाहीर करणार नसल्याचं प्राचार्यांनी सांगितलं. दरम्यान कूपर, जे जे, सायन यांसह राज्यातील अनेक कॉलेजमधील विद्यार्थ्यांचा याबाबतीत रोष पाहायला मिळत आहे.
Mumbai Local Running | मुंबईची लोकल आणि बस बंद करणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माहिती
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)