(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Corona Vaccination: आज मुंबईत लसीकरण बंद! सोमवारच्या लसीकरणाबाबतची माहिती लवकरच...
देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईमध्ये आज, रविवारी लसीकरण होणार नसल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
Corona Vaccination: देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु असतानाच आता लसीकरण मोहिमेला वेग येताना दिसत आहे. पण, यामध्ये देशातील काही प्रमुख शहरांमध्ये मात्र लसीकरण मोहिमेची गती मध्येच कमीही होत असल्याचं निरिक्षणात येत आहे. सध्या मुंबईत लसीकरणाचा असाच ब्रेक लागल्याचं दिसत आहे. रविवारी म्हणजेच आज मुंबईतील लसीकरण संपूर्णपणे बंद असणार असल्याची माहिती मुंबई महाननगर पालिकेनं दिली आहे.
ट्विटर अकाऊंटच्या माध्यमातून पालिकेनं ही माहिती दिली. रविवारी लसीकरण बंद असलं तरीही सोमवारच्या लसीकरणाबाबतची माहिती पालिकेकडून देण्यात येणार असल्याचंही सांगण्यात आलं. 'प्रिय मुंबईकरांनो... रविवारी शहरात लसीकरण बंद असणार आहे. आम्ही आशा करतो की तुम्ही रविवारचा आनंद घ्याल. सोमवारच्या लसीकरणासंदर्भातील माहिती ट्विटरच्या माध्यमातून आणि सदर प्रभागांमधूनही देण्यात येईल', असं पालिकेकडून ट्विट करत सांगण्यात आलं.
गोंदियात एकाच दिवशी महिलेला कोविशिल्डचे दोन डोस? जालन्यात महिलेला दोन वेगवेगळ्या लशींचे डोस
लसींचा तुटवडा असल्यामुळे नव्हे, तर रविवार असल्या कारणामुळे शहरात लसीकरण प्रक्रियेला ब्रेक दिला जात असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
मुंबईत 1283 नवे कोरोनाबाधित
शनिवारी मुंबईत 1283 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. तर, 52 जणांनी या संसर्गामुळं जीव गमावला. मुंबईचा कोरोना प़ॉझिटीव्हीटी रेट हा 0.2 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. त्यामुळं मुंबईकरांसाठी ही बाब मोठा दिलासा देणारी ठरत आहे.
राज्यातील कोरोना परिस्थिती
महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून घातलेल्या निर्बंधांचा चांगलाच परिणाम झाल्याचं समोर येत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे दैनंदिन आकडे कमी होत आहे. दैनंदिन आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत आहे. शनिवारी 40,294 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत तर 26,133 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आजपर्यंत एकूण 51,11,095 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळं राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.04% एवढे झाले आहे.