एक्स्प्लोर

Corona Vaccination : मुंबईत पुरेशा लस नसल्याने 45 वर्षांवरील वयोगटाचे लसीकरण उद्या बंद

मुंबईत एकूण 136 कोविड-19 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत कोविड प्रतिबंध लसीचा पुरेसा साठा  उपलब्ध नसल्या कारणामुळे महानगरपालिका, शासकीय आणि खासगी कोविड लसीकरण केंद्रात उद्या 45 वर्षे आणि त्यावरील वयाच्या नागरिकांचे लसीकरण होऊ शकणार नाही.

मुंबई : कोविड-19 लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय, महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवर उद्या सोमवार 3 मे रोजी 45 वर्ष व त्यावरील वयोगटाचे लसीकरण होणार नाही. तर 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सध्याच्या पद्धतीप्रमाणे निर्देशित ५ केंद्रांवर सुरू राहील. ज्यांची कोविन अॅपमध्ये नोंदणी झालेली आहे आणि ज्यांना निर्धारित  लसीकरण केंद्र आणि वेळ दिलेला आहे, त्यांनाच लसीकरण केंद्रावर  लस मिळणार आहे.

सध्या सर्व वयोगटातील नागरिक लसीकरण केंद्रावर मोठ्या स्वरूपात गर्दी करत आहेत. कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी विनाकारण घराबाहेर आणि लसीकरण केंद्रावर येऊ नेय. पालिका प्रशासनाकडून लस उपलब्ध करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील असून लसीचा साठा प्राप्त होताच नागरिकांना कळवण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांनी लसीकरण केंद्रावर येऊन गर्दी करू नये, असं विनम्र आवाहन महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

कोविड-19 लसीकरण मोहिमेसाठी मुंबईत, बृहन्मुंबई महानगरपालिका, शासन यांच्यातर्फे 63  केंद्रे तसेच खासगी रुग्णालयात 73 अशी एकूण 136 कोविड-19 लसीकरण केंद्रे कार्यान्वित करण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत कोविड प्रतिबंध लसीचा पुरेसा साठा  उपलब्ध नसल्या कारणामुळे महानगरपालिका, शासकीय आणि खासगी कोविड लसीकरण केंद्रात उद्या 45 वर्षे आणि त्यावरील वयाच्या नागरिकांचे लसीकरण होऊ शकणार नाही.

दरम्यान, 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ज्या पाच लसीकरण केंद्रावर प्रत्येकी 500 नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. ते उद्या देखील सकाळी 9 ते 5 या नियमित वेळेत सुरू राहील. हे लसीकरण केवळ 'कोविन ॲप' मध्ये नोंदणी केलेल्या व्यक्तींसाठी असणार आहे.

पाच लसीकरण केंद्राची नावे पुढीलप्रमाणे

  1. बा. य. ल.‌ नायर सर्वोपचार रुग्णालय (मुंबई सेंट्रल परिसर).
  2. सेठ वाडीलाल छत्रभुज गांधी व मोनजी अमिदास व्होरा सर्वोपचार रुग्णालय, राजावाडी (घाटकोपर परिसर) 
  3. डॉ. रुस्तम नरसी कूपर सर्वोपचार रुग्णालय (जुहू विलेपार्ले पश्चिम परिसर).
  4. सेव्हन हिल्स रुग्णालय (अंधेरी परिसर).
  5. वांद्रे कुर्ला संकुल येथील जम्बो कोविड सेंटर.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live Updates: पहिली ते आठवीच्या परीक्षांवरुन वाद, नेमका काय निर्णय होणार?

छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे

बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?

लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NCP Vidhan Parishad Candidate List : राष्ट्रवादीच्या विधानपरिषदेसाठी झिशान सिद्दीकी, उमेश पाटील, संजय दौंड यांचे नाव आघाडीवरMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा आढावा सुपरफास्ट ABP Majha 07 AMABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 7AM 16 March 2025Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा, बातम्यांचा आढावा सुपरफास्ट ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live Updates: पहिली ते आठवीच्या परीक्षांवरुन वाद, नेमका काय निर्णय होणार?
Maharashtra Live Updates: पहिली ते आठवीच्या परीक्षांवरुन वाद, नेमका काय निर्णय होणार?
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
छत्रपती शिवरायांच्या सैन्यात किती मुस्लिम सैनिक होते? यावर वाद घालणं योग्य नाही, इतिहासकारांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं मांडणी केलीय : शिवेंद्रराजे
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
बाप रे बाप! 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक, 'या' नव्या येऊ घातलेल्या लीगमुळे आयपीएलला तगडी टक्कर?
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
लेकीकडून सोन्याची तस्करी, अभिनेत्रीचे IPS वडिल गोत्यात; सरकारने सक्तीच्या रजेवर धाडलं
समृद्धी महामार्गावर भरधाव कारने घेतला पेट, गाडी जळून खाक

औरंगजेबाच्या कबरीवरुन जुंपली; आव्हाडांचे अनेक सवाल, खासदार म्हस्के म्हणाले, जितू मियाँ आव्हाड

मोठी बातमी ! 16 महिलांसह 64 नलक्षवाद्यांचे समर्पण; बंदुका खाली ठेऊन शांतेतेचा मार्ग, प्रत्येकी 25 हजार मदत

रायगडच्या वरंधा घाटात बसचा भीषण अपघात; एसटी पलटी झाल्याने 15 ते 20 प्रवासी जखमी

Embed widget