Corona Update | अँटीजन किट्स उपलब्ध, मात्र ठाणेकरांना फायदा कधी?
ठाणे शहरात रुग्ण संख्या प्रचंड असून चाचण्या मात्र अतिशय कमी होत असल्याचा आरोप केला जात होता. त्यातही स्वाब घेऊन जी चाचणी करण्यात येत होती. त्याचे परिणामी येण्यासाठी बराच अवधी लागत होता. त्यामुळे ठाणे महानगरपालिकेने 1 लाख अँटीजन टेस्ट किट विकत घेतल्या आहेत.
ठाणे : ठाण्यात नागरिकांची जास्तीत जास्त चाचणी व्हावी यासाठी 1 लाख अँटी जेन टेस्टच्या किट मागवण्यात आल्या. मात्र सध्याचा पालिकेचा रोजच्या चाचण्यांचा वेग बघता या किट धूळ खात पडून राहतील, असा आरोप करण्यात येत आहे. ठाणे शहरात रुग्ण संख्या प्रचंड असून चाचण्या मात्र अतिशय कमी होत असल्याचा आरोप केला जात होता. त्यातही स्वाब घेऊन जी चाचणी करण्यात येत होती. त्याचे परिणामी येण्यासाठी एक दिवस किंवा त्यापेक्षा जास्तीचा कालावधी लागत होता. म्हणून ठाणे महानगरपालिका आयुक्त विपीन शर्मा यांनी 1 लाख अँटीजन टेस्ट किट विकत घेतल्या. मात्र सोमवारपासून आतापर्यंत केवळ 2 हजार टेस्ट करण्यात आल्याने, या वेगाने जर महापालिका चाचण्या करणार असेल तर त्यामुळे ठाणेकरांना काहीही फायदा होणार नाही, असा आरोप करण्यात येत आहे.
'येत्या 2 महिन्यात नवीन तंत्रज्ञान येईल, ज्याने आपण अधिक लवकर आणि चांगल्या प्रकारे कोरोनाची टेस्ट करू शकू, मग सध्या ठाणे महानगरपालिका ज्या वेगाने चाचण्या करत आहे, त्या वेगाने 1 लाख किट वापरण्यासाठी 7 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागेल. तेव्हा 2 महिन्यानंतर या किट्सचा काय उपयोग होणार?, त्याचे पैसे फुकट जाणार नाहीत का?' असा प्रश्न अविनाश जाधव यांनी विचारला आहे. अविनाश जाधव हे ठाणे जिल्ह्याचे मनसेचे अध्यक्ष आहेत.
पाहा व्हिडीओ : ठाण्यात घरकाम करणाऱ्या महिला आणि नाका कामगारांच्या मोफत अॅंटिजन टेस्ट - एकनाथ शिंदे
केवळ मनसेने नाही, भाजप नगरसेवक नारायण पवार यांनी देखील पालिकेला पत्र लिहून या चाचण्यांचा वेग वाढवावा, अशी मागणी केली आहे. महापालिकेच्यावतीने नऊ प्रभाग समितीअंतर्गत कोरोना रुग्णांच्या रॅपिड अॅंटीजन किटसच्या माध्यमातून चाचणी केल्या जात आहेत. त्यासाठी 9 ठिकाणी चाचणी केंद्रे सुरु करण्यात आली. या केंद्रात पहिल्या तीन दिवसांत सुमारे 1 हजार 571 चाचणी करण्यात आल्या आहेत. त्यात 331 व्यक्तींचे अहवाल पॉझिटीव्ह आले. केलेल्या चाचण्यांमध्ये 20 टक्क्यांचे प्रमाण चिंताजनक आहे, असे नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
त्यावर पालिकेने उत्तर देत, लवकरच प्रत्येक केंद्रात 200 ते 250 चाचण्या सुरु करणार असल्याचे सांगितले आहे. सोमवारपासून आजपर्यंत 2 हजार चाचण्या केल्याचे महानगरपालिकेने सांगितले आहे. दिवसाला 300 पर्यंत चाचण्या केल्या जातात. त्याच वाढवून गल्लीबोळात जाऊन चाचण्या करण्याचे ठरवले असल्याचे, महानगर पालिका उपायुक्त संदीप माळवी यांनी सांगितले.
Corona Update | मुंबईला जमलं ते ठाण्याला का नाही जमत? ही आहेत कारणे...
आकडेवारी काय सांगते?
- सोमवारपासून या चाचण्या ठाणे महापालिका क्षेत्रात सुरु करण्यात आल्या आहेत.
- त्यासाठी 9 केंद्र स्थापन केली गेली.
- या केंद्रांमध्ये लक्षणं असलेल्या नागरिकांनी जाऊन मोफत तपासणी करण्याचे आवाहन केले गेले.
- त्याचप्रमाणे पालकमंत्री यांच्या निर्देशानुसार आता नाका कामगार आणि विविध हातावर पोट असलेल्या कामगारांच्या देखील अँटीजन टेस्ट करण्यात येणार आहेत.
- मात्र या सर्व प्रक्रियेचा वेग अतिशय संथ असल्याचा आरोप केला जात आहे.
लाखो रुपये खर्च करून, 1 लाख अँटीजन किट विकत घेण्यात आल्या आहेत. मात्र त्याचा ठाणेकरांना हवा तसा फायदा होताना दिसत नाहीये. एकीकडे रुग्ण संख्या वाढते आहे, त्यात कोरोनाची साखळी अजूनही हवी तशी संथ झालेली नाही. ती तोडायची असेल तर या किट्सचा जास्तीत जास्त वापर व्हायला हवा.
महत्त्वाच्या बातम्या :
तिकीट दलालांकडून प्रवाशांच्या हतबलतेचा गैरफायदा, आरपीएफकडून लाखोंची तिकिटे जप्त