एक्स्प्लोर

मुंबई विद्यापीठात कोरोनाचा शिरकाव, विद्यापीठाच्या दोन्ही कॅम्पसमध्ये 8 जण कोरोना पॉझिटिव्ह

मुंबई विद्यापीठात मागील महिन्याभरापासून कामकाज सुरू आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई या भागातून कर्मचारी विद्यापीठात कामाला येतात त्यात मागील दोन आठवड्यापासून हा कोरोनाचा संसर्ग कर्मचाऱ्यांमध्ये वाढत असल्याची माहिती आहे.

मुंबई : मुंबई विद्यापीठ फोर्ट कॅम्पस आणि कलिना कॅम्पसमध्ये काम करणारे असे एकूण 8 जण कोरोना बाधित मिळाले असून त्यांच्या संपर्कात असलेले 60 ते 70 कर्मचाऱ्यांना स्वतः च्या घरी क्वांरटाइन होण्यास सांगितले आहे. हे कोरोना बाधित कर्मचारी मुंबई विद्यापीठाच्या विविध विभागाचे असून ज्या ठिकणी कोरोनाचा संसर्ग झाला त्या ठिकाणचे विभाग बंद ठेवून त्या विभागात निर्जंतुकीकरण करण्याचे काम केले जात आहे.

मुंबई विद्यापीठात मागील महिन्याभरापासून कामकाज सुरू आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई या भागातून कर्मचारी विद्यापीठात कामाला येतात त्यात मागील दोन आठवड्यापासून हा कोरोनाचा संसर्ग कर्मचाऱ्यांमध्ये वाढत असल्याची माहिती आहे. जे कर्मचारी कोरोना बधितांच्या संपर्कात आढळले आहेत असे कर्मचारी स्वतःच्या घरी क्वांरटाइन राहिलाय सांगितलं शिवाय लक्षण आढळल्यास त्यांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. मुंबई विद्यापीठत काम करण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या अटी नियमानुसार 10 ते 15 टक्के कर्मचारी रोज उपस्थित राहून काम करताय त्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यास समोर आलंय.

यामध्ये मुंबई विद्यापीठ कलिना परीक्षा व मूल्यमापन विभागातील वरिष्ठ लिपिक, शिपाई, फोर्टच्या विधी विभागातील वरिष्ठ लघु लेखिका, हवालदार आणि लेखापाल, ग्रंथालय शिपाई, कनिष्ठ लिपिक कर्मचारी कोरोना बाधित झाले असून त्यांच्या सहवासात आलेले 60ते 70 कर्मचारी सध्या घरीच क्वांरटाइन आहेत. आता यामध्ये अस्थायी कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण देण्याची मागणी करण्यात येत आहे. कारण अगदी तुटपुंज्या पगारावर काम करत कुटूंबाचा उदरनिर्वाह करत असताना आता कोरोना संसर्ग झाल्यानंतर होणारा खर्च करणे हा अस्थायी कर्मचाऱ्यांना कठीण झालं असून कोरोना बधितांचा रुग्णलयाच्या खर्च विद्यापीठ प्रशासनाने करावा अशी मागणी अस्थायी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आलीये. शिवाय, विद्यापीठात कोरोनाचा वाढत असलेला धोका पाहून अस्थायी कर्मचारी वर्गाला आर्थिक त्रास होणार नाही यासाठी तात्काळ विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी विद्यापीठातील कामगार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद तुळसकर यांनी केली आहे.

Coronavirus | मुंबई विद्यापीठात कोरोनाचा शिरकाव, फोर्ट आणि कलिना कॅम्पसमध्ये आठ जण कोरोनाबाधित

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat Attacked : 4 दुचाकी, 2 कार; संजय शिरसाटांच्या लेकानं सांगितला हल्ल्याच घटनाक्रमZero Hour Vidhan Sabha Election | मतदानाआधीच राजकीय महाभारत, निवडणूक आयोगाकडून किती कोटी जप्त?Devendra Fadnavis on Deshmukh | सलीम जावेदची स्क्रिप्ट, रजनिकांतची फिल्म, फडणवीसांचा देशमुखांवर नेमVinod Tawde On Cash Controversy: टीप नव्हतीच..हितेंद्र ठाकूर खोटं बोलतायत, तावडेंची पहिली प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jayant Patil : शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार, महेश बालदींच्या अटकेची मागणी
शेकापच्या नावानं खोटं पत्र व्हायरल, जयंत पाटील यांची माहिती, निवडणूक आयोगाकडे तक्रार
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
अनिल देशमुख हल्ल्याप्रकरणी अनेक संशयास्पद गोष्टी समोर, पोलिस आणि उपचार करणारे डॉक्टर काय म्हणाले? 
Vinod Tawde : ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’तून महाराष्ट्राला सोडवा; मराठी अभिनेत्याच्या पोस्टने लक्ष वेधले
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी लीक केली असेल तर अतिशय शरमेची बाब; अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका
Ind vs Aus 1st Test Playing-11 : पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
पर्थ कसोटीपूर्वीच एका फोटोमुळे टीम इंडियाच्या प्लेइंग-11 चे चित्र स्पष्ट, 'या' खेळाडूंची जागा पक्की...
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर 'विनोद', पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
Vinod Tawde  : विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण... दोन्ही नेते एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले
विनोद तावडेंना का सोडून दिलं, हितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं 50 फोनचं कारण...
Vinod Tawde : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Video : कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र? बविआच्या सामान्य कार्यकर्त्याची भाजप राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंच्या डोळ्यादेखत प्रश्नांची सरबत्ती!
Embed widget