एक्स्प्लोर

कांजुरमार्ग येथील वादग्रस्त जागा पुन्हा चर्चेत; कारशेडसाठी हीच जागा द्यावी, एमएमआरडीएची राज्य सरकारकडे मागणी

Kanjurmarg Metro Car Shed: कुलाबा ते सिप्झ मेट्रो 3 मार्गिकेसाठी नाकारण्यात आलेल्या कांजुरमार्ग येथील जमिनीची मागणी आता स्वामी समर्थनगर ( Andheri West) ते विक्रोळी या मेट्रो 6 मार्गिकेच्या कारशेडच्या उभारणीसाठी एमएमआरडीएने केली आहे.

Kanjurmarg Metro Car Shed: ज्या कांजुरमार्ग (Kanjurmarg) जागेवर मेट्रो कारशेड उभारण्यावरुन ठाकरे सरकारच्या काळात बराच वादंग झाला. त्याच कांजुरमार्ग जागेवर मेट्रो 6 करता कारशेड उभारणीची परवानगी द्यावी, अशी मागणी एमएमआरडीएनं राज्य सरकारकडे केली आहे. एमएमआरडीएने त्याबाबतचे पत्र राज्य सरकारला लिहले आहे. त्यामुळे कांजुरमार्ग येथील वादग्रस्त जागा पुन्हा चर्चेत आली आहे. यामुळे आधी एकत्रीत मेट्रो कारशेडसाठी निरुपयोगी वाटणारी जागा आता एमएमआरडीएला अचानक उपयोगी वाटू लागलीय का, असा सवाल पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

कुलाबा (Colaba) ते सिप्झ मेट्रो 3 मार्गिकेसाठी नाकारण्यात आलेल्या कांजुरमार्ग येथील जमिनीची मागणी आता स्वामी समर्थनगर ( Andheri West) ते विक्रोळी (Vikhroli) या मेट्रो 6 मार्गिकेच्या कारशेडच्या उभारणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) केली आहे. 'एमएमआरडीए'ने त्याबाबतचे पत्र राज्य सरकारला लिहिले आहे. त्यामुळे कांजुरमार्ग येथील वादग्रस्त जागा पुन्हा चर्चेत आली आहे. मात्र केंद्र सरकारकडून कांजुरमार्ग येथील जागा मेट्रो 6 मार्गिकेसाठी उपलब्ध न झाल्यास हा प्रकल्प रखडण्याची चिन्हे आहेत.

आधीच्या फडणवीस सरकारच्या काळात मेट्रो 6 मार्गिकेचे कारशेड कांजुरमार्ग येथील जागेवर प्रस्तावित करण्यात आलं होतं. या मेट्रो कारशेडसाठी कांजुरमार्ग येथील सुमारे 15 हेक्टर जागा लागणार होती. तर मेट्रो 3 मार्गिकेचे कारशेड आरे कॉलनीत प्रस्तावित होते. मात्र ठाकरे सरकारनं सत्तेवर येताच मेट्रो 3 चे कारशेड आरे येथून कांजुरमार्गला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. तसेच कांजुरमार्गला एकात्मिक कारशेड उभारण्याचे निश्चित केले. 

ठाकरे सरकारच्या काळात काय झाले?

  • कांजुरमार्ग येथील 102 एकर जागेवर मेट्रो 3, 
  • मेट्रो 4 (वडाळा ते कासारवडवली), 
  • मेट्रो 6 मार्गिकेचे कारशेड एकत्रित उभारण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला. 

मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी मेट्रो 3 ची कारशेड कांजुरमार्गला हलविण्याला विरोध दर्शविला होता. तसेच खासगी विकासकाने कांजूर येथील प्रस्तावित जागेवर दावा करून न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन प्रक्रिया आणि राजकीय वादात कांजुरमार्गची जागा सापडली.  दरम्यान, राज्यात भाजप आणि शिंदे गटाचे सरकार सत्तेवर येताच त्यांनी मेट्रो 3ची कारशेड पुन्हा आरे येथे हलविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कांजुरमार्ग येथील जागा मेट्रो 6 मार्गिकेसाठी मिळण्याची आशा 'एमएमआरडीए'च्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीने 'एमएमआरडीए'ने कांजुरमार्ग येथील जागा मेट्रो 6 मार्गिकेसाठी देण्यात यावी यामागणीचे पत्र राज्य सरकारला लिहिले आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
RBI Rule : नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय, कारण समोर
नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 31 December 2024Sandeep Kshirsagar Full PC : दोषी नाही तर फरार का झालात? संदीप क्षीरसागरांचा कराडला सवालDhananjay Deshmukh : कराडच्या शरणागतीनंतर मस्साजोगमध्ये भीतीचं वातावरण? देशमुख काय म्हणाले?Walmik Karad Surrendered : गुन्हा दाखल झाला तेव्हा कराड उजैनला होते, माजी नगरसेवकाचा दावा!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
चिमण्या 'कोंबड्यावर जडला जीव', चिकन खाणंही सोडलं; 31 डिसेंबर दिवशीच साजरा झाला 5 वा बर्थ डे
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण  कॅमेऱ्यात कैद
सूर्यास्त रोजचाच, पण आज जरा वेगळा; 2024 चा ढलता सूरज धीर धीरे, भावूक क्षण कॅमेऱ्यात कैद
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षांच्या तारखा जाहीर; 1 लाख 38 हजार विद्यार्थी सोडवणार पेपर
RBI Rule : नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय, कारण समोर
नववर्षातील पहिला धक्का, 1 जानेवारीपासून तीन प्रकारची बँक खाती बंद होणार, आरबीआयचा मोठा निर्णय
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2024 | मंगळवार
'उत्सव रंगभूमीचा, सोहळा शिवराज्याभिषेकाचा' ब्रीदवाक्यासह 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा जानेवारीत रंगणार
जानेवारीत रंगणार 'अहिल्यानगर महाकरंडक' राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा, रंगकर्मींकडून जय्यत तयारी सुरु
Gold : कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
कोणत्या देशात किती सोनं? सोनं बाळगण्यात 'या' राज्यातील महिला जगात अव्वल 
Vaibhav Suryavanshi: 6,6,6,6  अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा विजय हजारे ट्रॉफीत धमाका 
6,6,6,6 अन्  8 चौकार ठोकले,13 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची विजय हजारे ट्रॉफीत धमाकेदार फलंदाजी
Embed widget