(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ध्वनी प्रदूषणाचे नियम मुख्यमंत्री आणि इतर राजकीय सभांना लागू? पोलीस कारवाई करणार?
Mumbai News : एकीकडे मंदिर आणि मशिदींवरील लाऊडस्पीकरला बंदी असताना मुंबई पोलीस नेत्याच्या राज्यकीय सभांवर कारवाई करतील का? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.
Loudspeaker : एकीकडे मंदिर आणि मशिदींवरील लाऊडस्पीकरला बंदी घालण्यात आली असताना दुसरीकडे नेत्यांच्या राजकीय सभांमध्येही लाऊडस्पीकरचा वापर होताना दिसत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मशिदी, मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरवर बंदी घालण्यात आली. मंदिर आणि मशिदींवरील लाऊडस्पीकरला बंदी असताना मुंबई पोलीस नेत्याच्या राज्यकीय सभांवर कारवाई करतील का? असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे. आता राजकीय सभांनाही कारवाई होणार का असा सवाल विचारण्यात येत आहे. 14 मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि 15 मे रोजी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची सभा होणार आहे.
मुख्यमंत्री आणि फडणवीस ध्वनी मर्यादा पाळणार?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची 14 मे रोजी बीकेसीमध्ये सभा होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री विरोधकांवर टीका करतील. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार निवासी भागात लाऊडस्पीकर 55 डेसिबल आणि व्यावसायिक क्षेत्र 65 डेसिबल असावे. तर बीकेसी मैदान हे व्यावसायिक क्षेत्राजवळ आहे. त्यामुळे मुख्यमंत्री डेसिबल पातळीचे पालन करतील का? त्यांच्यावर पोलीस कारवाई करणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी पोलीस काय करणार ?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस सभेसाठी डेसिबल पातळीनुसार होईल का? कायदा सर्वांसाठी समान असल्याने ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी पोलीस काय करवाई करणार ऐसा सवाल आता उपस्तित होत आहे. त्यामुळे मुंबई पोलीस आता राजकीय सभेवर कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करणार आहेतस याकडे जनतेचं लक्ष लागलं आहे.
अनेक ठिकाणी लाऊड स्पीकरवरील अजान बंद
4 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील लाऊड स्पीकर काढण्याचा अल्टिमेटम दिला होता. त्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने मशिदी, मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरवर बंदीचा निर्णय घेतला. या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांना नोटीसी पाठवत लाऊड स्पीकर काढण्यात आले होते. यानंतर 4 मे रोजी मुंबईतील बहुतेक मशिदींनी सकाळच्या अजानसाठी लाऊडस्पीकर वापरला नाही. त्यानुसार मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 1140 मशिदींपैकी 940 मशिदींनी लाऊडस्पीकरसाठी परवानगी मागितली आहे.
मुंबई पोलिसांनी यापूर्वी ध्वनिप्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. पोलीस आता राजकीय मोर्चांवर आणि सभांवर कारवाई करणार का याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या