एक्स्प्लोर

एका दिवसात मुख्यमंत्र्यांकडून सव्वाचारशे कोटींच्या 40 रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन; म्हणाले, राज्य विकासाच्या मार्गावर

एका दिवसात मुख्यमंत्र्यांकडून 40 एकूण 417 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यामुळं कल्याण डोंबिवली भागातील रस्त्यांचा कायापालट होणार आहे.  

Mumbai Kalyan Dombivali News: एका दिवसात मुख्यमंत्र्यांकडून 40 एकूण 417 कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. यामुळं कल्याण डोंबिवली भागातील रस्त्यांचा कायापालट होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. 

मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई महानगर क्षेत्रात रस्ते विकासकामांना आम्ही प्राधान्य दिलं आहे, कारण चांगल्या रस्त्यांमुळेच शहरांचा विकास होतो. त्याअंतर्गत नागरिकांना चांगले रस्ते देण्याचा आमचा प्रयत्न आहे. एमएमआरडीएमार्फत हाती घेण्यात आलेला एमटीएचएल प्रकल्प हा आधुनिक तंत्रज्ञान वापरून उभारण्यात येत, त्यामुळे हा प्रकल्प लवकर पूर्ण होणार असून तो गेम चेंजर ठरणार आहे, असं मुख्यमंत्री  म्हणाले.

'एक चेहरे में कई चेहरे लगा लेते हैं लोग'

स्वतःचा स्वार्थ जागृत झाला तर दुसरं काही दिसत नसतं असं बोलत मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. पुढे बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी काही लोकांचा  एक चेहरा असतो. त्यामध्ये अनेक चेहरे असतात, पहिल्यांदाच भेटल्यावर चेहरा चांगला वाटतो, असं बोलताना शिंदे यांनी 'एक चेहरे में कई चेहरे लगा लेते हैं लोग' हे गाण्याचे बोल बोलत ठाकरे यांच्यावर नाव न घेता टोला लगावला .

शिंदे म्हणाले की, आम्ही गेम चेजर प्रकल्प राज्यात आणले आहेत. आमच्या पोटात एक आणि ओठात एक असे नाही. आम्ही 50 खोके घेतले नसून आणि 200 खोके देतो. 1 हजार खोके विकासासाठी दिले आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले. 

मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलं की, रस्ते या शहराच्या रक्तवाहिन्या आहे. त्यांचा विकास योग्य प्रकारे झाल्यास उद्योग व्यापाराला चालना मिळते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी युती सरकारच्या काळात उड्डाणपूल तयार केले. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे तयार केले. त्यावेळी याची गरज का असा प्रश्न उपस्थित केला जात होता. आत्ता तेच पूल आणि मार्ग कमी पडत आहे. राज्याला विकासाच्या मार्गावर घेऊन जाणारे आमचे सरकार असून रस्ते वाहतूकीची सक्षम जाळे राज्यात विणले जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

आज  445 कोटी च्या रस्त्यांचे भुमिपूजन करून कल्याण डोंबिवली शहराच्या विकासाची ही एक नवी सुरुवात झाली आहे. ऐरोली काटाई नाका प्रकल्पाच्या पहील्या टप्प्याचे काम पूर्ण करून लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, ज्यामुळे अगदी कमी वेळात नागरिकांना नवी मुंबईत पोहोचता येईल" असे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. 

गेल्या 7 वर्षांपासून एबीपी माझाशी नाळ बांधली आहे. रेल्वे आणि रस्ते वाहतुकीचे वार्तांकन करताना, ठाणे जिल्ह्याची जबाबदारी देखील सांभाळत आहेत. यासोबतच राजकीय बातम्या विशेषतः शिंदे गटाची जबाबदारी यांच्याकडे आहे. याआधी मी मराठी, जय महाराष्ट्र सारख्या वृत्त वाहिन्यात आणि वृत्तपत्रात कामाचा अनुभव आहे

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Sakinaka Manhole: साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला 15 दिवस उलटले, चौकशी अहवालाची अद्याप प्रतीक्षा; पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
साकीनाका मॅनहोल दुर्घटनेला 15 दिवस उलटले, चौकशी अहवालाची अद्याप प्रतीक्षा; पालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हाणामारी, दोन तृतीयपंथीयांकडून प्रवाशाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये हाणामारी, दोन तृतीयपंथीयांकडून प्रवाशाला बेदम मारहाण, व्हिडीओ व्हायरल
Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
सुप्रिया सुळेंचा 'व्हाईस रेस्ट'! पुढील दोन आठवडे भाषण वा मुलाखत नाही, आवाजाला विश्रांती, मोठं कारण समोर
Mumbai Crime : कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!
कधी अमिताभकडून डॉक्टरेट तर कधी जॅकी श्रॉफसोबत फोटो! 10 वर्षे तो बनला बनावट DCP, 48 लाखांचा गंडा घालणाऱ्या पोलिसालाच बेड्या!

व्हिडीओ

Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
काल दिल्ली पोलिसांनी उपोषणावरुन चादरीआड सोनम वांगचुकना फरफटत नेलं, आज म्हणतात उद्याच्या मोर्चाला सुद्धा परवानगी नाही
Ketan Agrawal Case: केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
केतनसोबत घातपात झाल्याचं जिनं सगळ्यात पहिलं ओळखलं, ती बहीण अखेर आली समोर, भावूक होऊन म्हणाली...
Buldhana Crime: संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
संतापजनक! नवऱ्याचा डोळ्यादेखत 19 वर्षीय विवाहितेसोबत नको ते कृत्य; शस्त्राचा धाक दाखवून दोन नराधमांनी मोबाईल अन् पैसेही हिसकावले, बुलढाणा जिल्हा हादरला!
महेश मांजरेकरांनी सोडलेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' साठी रणदीप हुड्डांना National Award! ओटीटीवर कुठे पहाल?
महेश मांजरेकरांनी सोडलेल्या 'स्वातंत्र्य वीर सावरकर' साठी रणदीप हुड्डांना National Award! ओटीटीवर कुठे पहाल?
CBSE 10th Board Result 2026: प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
प्रतीक्षा संपली! CBSE इयत्ता 10 वीच्या दुसऱ्या सत्राचा निकाल जाहीर, झटपट निकाल पाहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या स्टेप्स
Aaditya Thackeray: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या गटाला लोकसभा अध्यक्षांकडून मान्यता; आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'आम्ही हाच अन्याय...'
Donald Trump: 'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
'इराणसाठी नरकाचे दरवाजे उघडा' जॉर्डनमधील दोन सैनिकांच्या मृत्यूनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची संतप्त प्रतिक्रिया; इराणवर पुन्हा मोठा हवाई हल्ला
Pune Crime Ravindra Dhangekar: खलील शेख मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल, पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना
खलील शेख मृत्यूप्रकरणात मोठी अपडेट, रवींद्र धंगेकर पत्नीसह नॉट रिचेबल, पोलिसांची पथकं शोधासाठी रवाना
Embed widget