मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला, अपशब्द वापरले आणि कारवर फटकाही मारला; साकीनाक्यातील ठाकरे गटाचा कार्यकर्ता ताब्यात
CM Eknath Shinde Convoy : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा ताफा अडवला असून त्यांच्याविषयी अपशब्द वापरणाऱ्या कार्यकर्त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे.
मुंबई : साकीनाका येथील सभा संपवून 90 फूट रस्त्यावर जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ताफा आडवण्यात आला. संतोष कटके नावाच्या व्यक्तीने काळा झेंडा घेऊन मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवला. संतोष कटके असं या व्यक्तीचं नाव असून त्याने यावेळी मुख्यमंत्र्यांविषयी अपशब्द वापरले आणि त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कारवर फटकाही मारल्याची माहिती आहे. गाडीचा ताफा अडवल्यानंतर मु्ख्यमंत्री स्वतः रस्त्यावर उतरले. संतोष कटकेला हा ठाकरे गटाचा कार्यकर्ता असल्याची माहिती असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे.
नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साकीनाका येथे सभा होती. ती आटपल्यानंतर 90 फूट रस्त्यावरून त्यांचा ताफा जात होता. महाविकास आघाडीचे उमेदवार नसिम खान यांचे कार्यालय त्या रस्त्यावर आहे. त्या कार्यालयात काही कार्यकर्ते बसले होते.
एकनाथ शिंदे यांचा ताफा नसिम खान यांच्या कार्यालयासमोर आल्यानंतर कार्यालयातील कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन बाहेर आले. त्यांनी मुख्यमंत्र्याचा ताफा अडवला. त्यावेळी मुख्यमंत्री स्वतः कारमधून खाली उतरले. त्यापैकी संतोष कटके या व्यक्तीने मुख्यमंत्र्यांच्या कारवर फटकाही मारल्याची माहिती आहे.
मुख्यमंत्र्यांसोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांनी संतोष कटके आणि त्याच्या तीन ते चार साथिदारांना ताब्यात घेतलं आणि जवळच्या पोलिस बीटमध्ये नेण्यात आलं.
परिस्थिती तणावसदृश्य
मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली. महाविकास आघाडीचे उमेदवार नसिम खान हेदेखील पोलिस स्थानकात पोहोचले.
दरम्यान, संतोष कटकेला ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिस स्टेशनसमोर ठिय्या मारला.
ही बातमी वाचा: