एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एल्फिन्स्टन चेंगराचेंगरीची घटना अतिशय धक्कादायक : मुख्यमंत्री
'रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र सरकार या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करेल. याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल.'
मुंबई : मुंबईतील एल्फिन्स्टन आणि परेल रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 22 जणांचा आपले प्राण हकनाक गमवावे लागले. या दुर्घटनेनंतर प्रशासनावर चहूबाजूनं टीका सुरु आहे.
दरम्यान, याप्रकरणी एबीपी माझाशी फोनवरुन बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘या दुर्घटनेतील दोषींवर तात्काळ कारवाई करण्यात येणार असून भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी प्रशासन नक्कीच प्रयत्न करेल.’
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया :
एल्फिन्स्टन स्टेशनवर झालेली घटना अत्यंत धक्कादायक आणि दु:खदायी आहे. या चेंगराचेंगरीत अनेक लोकांना जीवही गमवावा लागला. या सर्व मृतांच्या परिवारांच्या सोबत आमची शोकसंवेदना आहे. जे जखमी आहेत त्यांना उपचार देण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्याचे मुख्य सचिव, मुंबईचे पोलीस आयुक्त यांच्याशी माझी चर्चा झाली आहे. त्याचप्रमाणे रेल्वेमंत्री स्वत: दिल्लीहून मुंबईला आले आहेत. त्यांच्याशी देखील मी चर्चा केलेली आहे. रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र सरकार या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करेल. याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्याचप्रमाणे अशाप्रकारची घटना घडू नये यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील. त्याकरता रेल्वे प्रशासनाला आवश्यक ती सर्व मदत राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे केली जाईल. या संपूर्ण दुर्घटनेत जे मृत्युमुखी पडले त्यांच्या नातेवाईंकांना 5 लाख रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्यात येईल. तसेच जे जखमी आहेत त्यांच्या संपूर्ण उपचारांचा खर्च हा राज्य सरकारच्या वतीनं केला जाईल. या संपूर्ण प्रकरणाकडे अत्यंत गांभीर्यानं बघितलं जात आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नये यासाठी सगळी कारवाई अतिशय तातडीनं करण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकार करेल.VIDEO : संबंधित बातम्या : बुलेट ट्रेनआधी मुंबईच्या लोकलकडे लक्ष द्या! एल्फिन्स्टन-परेलला जोडणाऱ्या पुलावर चेंगराचेंगरी, 22 जणांचा मृत्यू एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : 22 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? एल्फिन्स्टन स्टेशनवर नेमकं काय घडलं? एलफिन्स्टन चेंगराचेंगरी: कोणाला किती मदत?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement