एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
‘साहेब संपत्ती घोषित करणार का?’, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल
मुंबई: ‘मला राजकारणात 25 वर्ष झाली पण माझी संपत्ती वाढली नाही. तुम्ही सांगा, साहेब किंवा त्यांचे बोलके पोपट हे त्यांची संपत्ती घोषित करणार? 25 वर्षाच्या राजकारणात माझं दामन साफ आहे. पण जे काचेच्या घरात राहतात त्यांनी दुसऱ्यांवर दगड फेकू नये.’ अशी घणाघाती टीका करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं. ते साकीनाका येथील सभेत बोलत होते.
‘शिवसेनेचं मराठी प्रेम कुठे, यांची एकच नीती मराठी माणसाच्या नावाने संघर्ष करत आपण श्रीमंत व्हायचं.’ अशी बोचरी टीकाही मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर केली.
नागपूर महापालिकेत घोटाळ्यांच्या आरोपाला मुख्यमंत्र्यांचं उत्तर
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेनं त्यांच्यावर केलेल्या घोटाळ्यांच्या आरोपालाही उत्तर दिलं. ‘विलासराव देशमुख यांनी आम्हाला तेव्हा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. कोणताही पुरावा नसताना आयोगानं अहवाल मांडला. पण हा अहवाल मान्य करता येणार नाही असं हायकोर्टानं स्पष्ट केलं. त्यामुळे शिवसेनेच्या बोलक्या पोपटाने हायकोर्टाचा अहवाल वाचला असता तर आरोप केले नसते. असं मुख्यमंत्री म्हणाले
‘खंबाटाप्रकरणी शिवसेनेची सौदेबाजी’
यावेळी खंबाटाप्रकरणात शिवसेनेनं सौदेबाजी केली असा गंभीर आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. ‘खंबाटाप्रकरणी मी अधिक चौकशी केली. त्यावेळी मला समजलं की, 2014 साली शिवसेनेच्या युनियन प्रमुखांनी तिथं सौदेबाजी केली. आजही 22 शाखा प्रमुखांना खांबटाकडून पगार मिळतो.’ असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला.
‘मध्य वैतरणा धरणाच्या कामात भ्रष्टाचार’
मध्य वैतरणा धरणाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं. कामाची किंमत 1329 कोटी होती. काम 42 महिन्यात पूर्ण करायचं होत. ते झालं नाही. तब्बल 921 कोटी जास्त लागले. त्यासाठी दोषी कोण? असा सवालही मुख्यमंत्र्यांनी विचारला विचारला.
संबंधित बातम्या:
फडणवीस महापौर असताना नागपूर महापालिकेत घोटाळा : शिवसेना
सेना मंत्र्यांना लाल दिव्याची सवय, सत्ता सोडणार नाहीत: पृथ्वीराज चव्हाण
रायगडमधील शिवसेना-काँग्रेस युतीवर ओवेसींचा निशाणा
शेतकऱ्याला कांदा जाळावा लागणं हे महाराष्ट्राचं दुर्दैव: सुप्रिया सुळे
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement