एक्स्प्लोर

ईबीसी सवलत ६ लाखांपर्यंत, सरकारचा महत्वपूर्ण निर्णय

मुंबई: मुख्यमंत्र्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळानं घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. राजर्षी शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजना लागू करण्याचा महत्वाचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या योजने अंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ईबीसीसंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ईबीसीची मर्यादा ही 6 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पण त्यासाठी मात्र 60 टक्क्यांची अट घालण्यात आली आहे. शिवाय महाविद्यालयीन शिक्षणाचा स्तर वाढवण्यासाठी महाविद्यालयांना 2 वर्षात अधिस्विकृती मिळवणं बंधनकारक केलं आहे. खासगी कॉलेजमधील किमान 50 टक्के विद्यार्थ्यांची नोकर भरती ही अनिवार्य केली आहे. विशेष म्हणजे यासंदर्भातल्या मागण्या सकल मराठा मोर्चाच्या निवेदनात आहेत. मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय सहा लाखांपर्यंत उत्पन्न कुटुंबातील विद्यार्थ्याला इंजिनिअरिंगला प्रवेश घेताना सीईटीला 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे. अडीच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांना कोणतीही अट ठेवण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या नावाने योजना सुरु करण्यात आली आहे. अल्पभुधारक शेतकऱ्यांच्या विद्यार्थ्यांना निवासासाठी 30 हजार प्रतिवर्ष देण्यात येतील. वेगवेगळ्या अभ्यासक्रमांमध्ये सवलत लागू करण्यात येईल. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंयोजना सुरु करण्यात आली. जेवण, राहणे, शिक्षणखर्चासाठी 4 ते 5 हजार रुपये देण्यात येणार आहे. खासगी शाळांतील तीन लाख विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल. याबरोबरच राधानगरी तालुक्यातील धामणी प्रकल्पाला 782 कोटी रुपये देण्यात येतील. पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे - राजर्षी शाहू महाराज फी प्रतिपूर्ती योजना लागू करण्याचा निर्णय - व्यावसायिक शिक्षणात SC,ST ,OBC यांना फी मिळते - ही योजना सुरु करण्यात आली, यात 6 लाख उत्पन्न असलेल्या सगळ्यांसाठी योजना लागू करण्यात आली आहे. - या योजनेच्या माध्यमातून शैक्षणिक शुल्क ओबीसी 50% सवलत त्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना ही योजना - सरसकट सर्व विद्यार्थ्यांना 60%गुण आणि 6 लाख उत्पन्न - अडीच लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणतीही अट नाही - विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण घेताना मदत - मराठा समाज मोर्चा महत्वाची मागणी कि शिक्षण परवडत नाही - इंजिनिअरिंगसाठी खासगी 1 लाख 45 हजार जागा तर 6 हजार शासकीय जागा - सामान्य माणसांना खासगी प्रवेश घेणं त्रासदायक आहे. - या योजनेनंतर 1 लाख 45 जागा विद्यार्थ्यांना उपलब्ध होतील. - पंजाबराव देशमुखांच्या नावानं योजना - अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या मुलांना व्यावसायिक शिक्षण घेताना निवासासाठी 30 हजार रुपये प्रतिवर्ष देण्याचा निर्णय - पंडित दिनदयाळ उपाधअयाय स्वयम योजना- आदिवासी विद्यार्थ्यांसाठी योजना - आदिवासी विद्यार्थ्यांना जेवण, शिक्षणसाहित्य शासनाकडून - सहा हजार रुपये मोठ्या शहरांमध्ये तसेच, छोट्या शहरांमध्ये ५ आणि ४ हजार रुपये दरमहा देणार - फी प्रतिपूर्ती योजना आतापर्यंत फक्त खाजगी महाविद्यालयांसाठी होती. आता सरकारी महाविद्यालयांसाठीही फी प्रतिपूर्ती योजना लागू होणार - मेरिट विद्यार्थ्यांना सरकारी कॉलेजमध्ये पण सवलत मिळणार - 2.5 ते 6 लाख उत्पन्न असणाऱ्यांनी खासगी मेडिकल कॉलेजसाठी शैक्षणिक कर्ज घेतले तर व्याज राज्य सरकार भरणार - 2. 50 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्यांना कुठलीही अट नाही. 2. 5 ते 6 लाखसाठी 60%ची अट आहे. - कॉलेजं दुकानांसारखी चालवू नका. कॉलेजेसनी 50% प्लेसमेंट केली पाहिजे - कॉलेजेसची गुणवत्ता वाढवण्यासाठी सरकार प्रयत्नशील राहणार - यावर्षीपासून योजना लागू होणार, 1000 कोटींची तरतूद - राधानगरी धामणी मध्यम प्रकल्पाला 782 कोटी - मुंबई उच्च न्यायालयाला १० हजार चौरस फूट जागा - वारणा प्रकल्पाला फेर प्रशासकीय मान्यता मराठा आरक्षण प्रतिज्ञापत्रावर मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण - सरकारने वेळ मागितला नाही, किमान कोर्टाचं खरं दाखव, आम्हाला फाटकारलं नाही. याचिकाकर्त्यांनी वेळ मागितला. - यापूर्वी भूमिका मांडली आरक्षणाने सगळे प्रश्न सुटत नाही. - सरकारी कॉलेजमध्ये मराठा समाजाला 900 जागा मिळतील. - खासगी कॉलेजमध्ये फी भरावी लागते, सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे -आरक्षणाबाबत आमच्यात संभ्रम नाही, तुम्ही करू नका - मराठा संघटनांशी चर्चा झाली आहे, अॅट्रॉसिटी कायदा रद्द करा अशी मागणी नाही, दुरुपयोग होतो त्यावर आक्षेप, दुरुपयोग होऊ नये यासाठी चर्चा सुरु आहे. - जनतेला आवाहन आहे की, काही मूठभर लोक आहेत जी केवळ राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडावी असे प्रयत्न करीत आहेत. - चुकीच्या गोष्टी पसरवायच्या, भडकावणारी वक्तव्य करायची आणि समाजात तेढ निर्माण करायचा हे योग्य नाही. - सरकार सर्व समाजाचा विचार करत आहे. एका समाजाने दुसऱ्या समाजविरुद्ध भूमिका घेऊ नये -  शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. शाहू, फुले, आंबेडकरांना अपेक्षित असं वर्तन सगळ्यांकडून करावं असं माझं सगळ्यांना आवाहन आहे. -  पवार मोदींना भेटले पण चर्चा काय झाली कल्पना नाही. संबंधित बातम्या: मराठा आरक्षणाबाबत हायकोर्टाने सरकारला फटकारलं नाही : मुख्यमंत्री

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Mundhe : मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
मोठी बातमी! तुकाराम मुंढे MPSC चौकशी समितीचे सचिव, मुख्यमंत्री विद्यार्थ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक; शिवेंद्रराजेंची घोषणा; तर भीमनवार अध्यक्षपदी नकोत, रोहित पवारांची मागणी
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन! मुंबई पोलिसांकडून आदित्य ठाकरेंसह अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल
Mumbai Protest : शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करणाऱ्या 300 हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल होणार, आदित्य ठाकरे-अमित ठाकरेंचं काय? 
शिवाजी पार्क परिसरात आंदोलन करणाऱ्या 300 हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल होणार, आदित्य ठाकरे-अमित ठाकरेंचं काय? 
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar on MPSC Protest : विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा विजय, तुकाराम मुंडे समितीत आले, काही जागा वाढवून मिळाल्या, 14 अतिरिक्त मागण्या मान्य, आंदोलन स्थगित झाल्यानंतर रोहित पवार नेमकं काय म्हणाले?
Vivekanand Patil and Navnath Ban: नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
नवनाथ बन.... आम्ही गाढवं नाही, वाघ आहोत वाघ, आम्ही शिकार केलेय! विवेकानंद पाटलांनी खेळाचा शेवट केला
Amravati Politics : बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
बंडखोरांविरोधात भाजपची मोठी कारवाई, अमरावतीत 3 बंडखोरांचं निष्कासन; चंद्रशेखर भोयर, संगीता शिंदेंसह सुमीत पवार 6 वर्षांसाठी निलंबित, बडे नेतेही रडारवर
Rohit Pawar MPSC Protest Pune: आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
आंदोलन मागे घेण्याबाबत रोहित पवार आग्रही, पण विद्यार्थी ऐकेनात, आंदोलनस्थळी पेच; मध्यरात्री 1.24 वाजता काय घडलं?
Vivekanand Patil MPSC Protest Pune: आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
आता MPSCचा अभ्यास करणार की राजकारणात येणार? विवेकानंद पाटलांचं सूचक उत्तर ऐकून चर्चांना उधाण
Vivek Bhimanwar MPSC Protest Pune: 12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
12 दिवस आंदोलन, अखेर सक्तीच्या रजेवर...; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Chief Justice of India Surya Kant: इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
इंडिया आघाडीचा मोर्चा सुप्रीम कोर्टावर धडकणार, सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांची भेटीची विनंती फेटाळून लावली
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
'माझा कमी अभ्यास असल्याने भारती विद्यापीठात शिकलो नाही, मी गरीबासारखा साताऱ्यात शिकलो त्यामुळे..' एमपीएससी आंदोलनातून शिवेंदराजेंचा विश्वजित कदमांना अप्रत्यक्ष टोला
Embed widget