एक्स्प्लोर
एबीपी माझा इम्पॅक्ट : अखेर सिडकोकडून टाळेबंदीच्या कालावधीतील हफ्त्यांवरील विलंब शुल्क माफ
सिडकोने सदनिकाधारक ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. घरांच्या हप्त्यांचं लॉकडाऊन काळातील विलंब शुल्क माफ करण्यात आले आहे. एबीपी माझा'च्या बातमीनंतर सिडको प्रशासनाने हा निर्णय घेतलाय.
मुंबई : सिडकोच्या 2018-19 मधील घर विजेत्यांना अखेर सिडकोने दिलासा दिला आहे. सिडकोने टाळेबंदीच्या कालावधीतील कर्जाच्या हफ्त्यांवरील विलंब शुल्क माफ़ करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे. याबाबत अधिकृतरित्या सिडकोकडून एक पत्रक देखील प्रसिद्ध करण्यात आलं आहे. त्यामुळे आता हजारो नागरिकांना दिलासा मिळाला असून त्यांना 30 सप्टेंबर 2020 पर्यंत सदनिकांचे हाफ्ते भरता येणार आहेत.
याबाबत सिडकोकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे की, सिडको गृहनिर्माण योजनेतील विजेत्या अर्जदारांना सदनिकांचे हफ्ते भरण्यासाठी सरसकट मुदत देण्यात आली असून दिनांक 30 सप्टेंबर 2020 पर्यंत अर्जदार त्यांच्या सदनिकांचे हफ्ते भरू शकणार आहेत. त्याचप्रमाणे कोविड-19 च्या पार्श्वभूमीस अनुसरून लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीच्या कालावधीत ज्या अर्जदारांना हफ्ते भरायचे होते अशा अर्जदारांच्या हफ्त्यांवरील विलंब शुल्कदेखील माफ करण्यात आलं आहे. सिडकोच्या या निर्णयानंतर हजारो घर विजेत्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सिडको घर विजेत्यांना भरमसाठ विलंब शुल्क, नागरिकांमध्ये सिडकोविरोधात तीव्र संताप
याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली होती. प्रवीण दरेकर बोलताना म्हटले होते की, दोन दिवसांत सिडकोचे संचालक लोकेश चंद्रा यांची स्वतः जाऊन भेट घेणार आहेत. ज्या सिडकोकडून कमी दरात घर योजना राबवण्यात आली, त्या सिडकोकडून गरीबांची पिळवणूक होतं असल्याचं समोर आलं आहे. एकीकडे म्हाडाने डिसेंबरपर्यंत शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ देताना कसल्याही प्रकारे विलंब शुल्क आकारण्यात येणार नाही. तसेच पंतप्रधान आवास योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मुद्रांक शुल्कात सवलत देखील जाहीर केली आहे. लाभार्थ्यांना केवळ 1 हजार मुद्रांक शुल्क भरावे लागणार आहे. तर दुसरीकडे सिडको मात्र विलंब शुल्क आकारात असून मुद्रांक शुल्कात कोणतीही सवलत देत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही परिसरात नागरिकांना विलंब शुल्क भरू देणारं नाही.
विलंब शुल्क माफ आता 1 हजार रुपयांत घरांची नोंदणी करून द्या : दत्ता घंगाळे
सिडकोकडून विलंब शुल्काच्या नावाखाली जी लुबाडणुक सुरू होती, याबाबत सिडको प्रशासनाला दोन दिवसांपुर्वी निवेदन दिलं होतं. यावेळी म्हाडाने ज्या पद्धतीने डिसेंबरपर्यंत विना विलंबशुल्क रक्कम भरण्यास मुदतवाढ दिली आहे. त्याप्रमाणे सिडकोने देखील विना विलंबशुल्क मुदतवाढ द्यावी आणि त्याचसोबत म्हाडाप्रमाणे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मुद्रांक शुल्कात सवलत देऊन केवळ 1 हजार रुपयांत घरांची नोंदणी करून द्यावी, अशी मागणी केली होती. आमच्या मागणीनंतर आता टाळेबंदीच्या कालावधीतील हफ्त्यांवर विलंब शुल्क आकारण्यात येणार नसल्याचं सिडकोने जाहीर केलं आहे. आता सिडकोने पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मुद्रांक शुल्कात सवलत देऊन त्यांना 1 हजार रुपयांत घरांची नोंदणी करुन द्यावी. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देखील आम्ही पत्र लिहिणार आहोत. जर सिडकोकडून आमची मागणी मान्य करण्यात आली नाही तर आम्ही लवकरच तीव्र आंदोलनात करू.
CIDCO | सिडको घर विजेत्यांना हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ, पण दीड ते दोन लाखांचं विलंब शुल्क
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement