एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नवी मुंबई विमानतळाचं काम वेगात, 18 फेब्रुवारीला मोदींच्या हस्ते भूमिपूजन
विमानतळाच्या कामाला जोरदार सुरुवात झाली असून पहिल्या टप्यातील 2 हजार कोटी रूपयांचं काम सिडकोने हाती घेतलं आहे.
नवी मुंबई : 18 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या कामाचं भूमिपूजन होणार आहे. विमानतळाच्या कामाला जोरदार सुरुवात झाली असून पहिल्या टप्यातील 2 हजार कोटी रूपयांचं काम सिडकोने हाती घेतलं आहे.
1160 हेक्टर जागेवर 16 हजार कोटी रूपये खर्चून विमानतळ उभारलं जाणार आहे. एकूण तीन टप्प्यांमध्ये विमानतळाच्या कामाचं वर्गीकरण करण्यात आलं आहे. पहिला टप्पा डिसेंबर 2019 ला पूर्ण होणार असून पहिलं विमान टेकऑफ होणार आहे.
सिडकोने येथील प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी संपादन करून त्यांना 2014 च्या पुनर्वसन आणि पुनर्वसन स्थापना धोरण कायद्यानुसार नुकसान भरपाई आणि स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. एकूण 12 गावातील 3500 कुटुंबांपैकी सध्या 500 कुटुंबांचं इतरत्र स्थलांतरण करण्यात आलं आहे.
सिडकोने विमानतळाचं काम युध्दपातळीवर हाती घेतलं असून 2 हजार कोटी रुपयांचं काम चार कंपन्यांना देण्यात आलं आहे. यामध्ये GVK Infrastructure, Gayatri Infra project, J M Mhatre , T J P L यांचा समावेश आहे. डोंगराचं सपाटीकरण करणं, भराव टाकून जमीन सपाट करणं, नदीचा प्रवाह बदलणं, उच्चदाबाच्या वाहिन्या भूमिगत करणं या कामांचा समावेश आहे.
सिडकोने तीन टप्यात काम पूर्ण करण्याचं उद्दीष्ट ठेवलं आहे. पहिला टप्पा 2019 पर्यंत पूर्ण करून रन वे आणि इमारत उभारून वर्षाला 1 कोटी प्रवासी याचा उपयोग करतील, असा सिडकोचा दावा आहे. दुसऱ्या टप्प्यात टप्पात अडीच कोटी आणि 2025 पर्यंत तिसरा टप्पा पूर्ण करीत एकूण 6 कोटी प्रवाशांची ने-आण करण्याची क्षमता या विमानतळाची असेल.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची वैशिष्ट्य
- 18 फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन
- 1160 हेक्टर जागेवर 16 हजार कोटी रूपये खर्चून विमानतळ उभारलं जाणार
- एकूण तीन टप्प्यांमध्ये विमानतळाच्या कामाचं वर्गीकरण
- पहिल्या टप्यातील 2 हजार कोटी रूपयांचं काम सिडकोने हाती घेतलं
- GVK Infrastructure, Gayatri Infra project, J M Mhatre , T J P L या चार कंपन्या पहिल्या टप्प्यातील काम करणार
- डोंगराचं सपाटीकरण करणं, भराव टाकून जमीन सपाट करणं, नदीचा प्रवाह बदलणं, उच्चदाबाच्या वाहिन्या भूमिगत करणं या कामांचा समावेश
- पहिला टप्पा 2019 पर्यंत पूर्ण करून रन वे आणि इमारत उभारून वर्षाला 1 कोटी प्रवासी याचा उपयोग करतील, असा सिडकोचा दावा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement