एक्स्प्लोर
नवी मुंबईत बालविवाहाची घटना उघडकीस, तीन आरोपी अटकेत
नवी मुंबई: 9 वर्षीय चिमुकलीचा 25 वर्षाच्या तरूणाशी बालविवाह लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नवी मुंबईतील दिघा परिसरात उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुलीची आई शिला चौहान, मुलीशी विवाह करणारा तरूण सुनिल चौहान आणि विवाह लावून देणारा पंडीत नरसिंग पांडे या तिघांना अटक केली आहे.
या बालविवाहाची माहिती एका सामाजिक कार्यकर्त्याला समजताच त्यांनी तत्काळ रबाळे एमआयडीसी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. पोलिसांनी सुनील चौहान यांच्या घरी पाहणी केली असता शिला चौहानची ९ वर्षीय मुलगी बाजूच्या खोलीमध्ये सुनिल चौहान याच्यासह नव्या साडीमध्ये आणि मंगळसूत्र परिधान केलेली आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ शिला चौहानसह अल्पवयीन मुलीशी लग्न करणारा तरुण आणि लग्न लावून देणारा पंडीत या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांनी बालविवाह केल्याची कबुली दिली. त्यानंतर तिघांना अटक करण्यात आली.
हे तिघे आरोपी दिघाच्या यादव नगरचे रहिवाशी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीच्या आईची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. पैशाच्या मोहापाई मुलीचा बालविवाह लावून दिल्याची कबूली तीनं पोलिसांना दिली आहे.
दरम्यान नवी मुंबईसारख्या शहरात आजही बालविवाह लावले जाताहेत ही महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाला काळीमा फासणारी घटना आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement