शाहरुखच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांची दिलखुलास उत्तरे
मुंबईचे एक वेगळे फ्लेवर आहे. हा फ्लेवर टिकवून ठेवून त्याला आणखी ॲक्सेसेंबल करण्याचे काम करत आहे. मुंबईने अनेकांची स्वप्ने पूर्ण केली आहे. मात्र, अजूनही अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली नाहीत. अश्या लोकांची स्वप्ने पूर्ण करण्याचे माझे व्हिजन/मिशन आहे.
मुंबई : महाराष्ट्र शासन आणि प्रोजेक्ट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुंबई 2.0 या परिषदेत अभिनेता शाहरुख खानने देखील हजेरी लावली. यावेळी शाहरुख खानने एक मुंबईकर म्हणून भविष्यकाळात मुंबईत काय बदल झाले पाहिजेत? याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली तसेच काही प्रश्न देखील विचारले. अभिनेता शाहरूख खान यांनी विचारलेल्या मुख्यमंत्र्यांच्या मुंबईबद्दलच्या व्हिजन वर मुख्यमंत्री म्हणाले, पूर्वी अनेकजण मुंबईला शांघाय करण्याचे बोलत होते. पण मुंबई ही मुंबई आहे. त्याचे एक वेगळे कल्चर, स्पिरीट आहे. मुंबईचे एक वेगळे फ्लेवर आहे. हा फ्लेवर टिकवून ठेवून त्याला आणखी ॲक्सेसेंबल करण्याचे काम करत आहे. मुंबईने अनेकांची स्वप्ने पूर्ण केली आहे. मात्र, अजूनही अनेकांची स्वप्ने पूर्ण झाली नाहीत. अश्या लोकांची स्वप्ने पूर्ण करण्याचे माझे व्हिजन/मिशन आहे. मुंबईत बदल कसा घडवून आणणार याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गेल्या 20 वर्षांपासून मुंबईकर झालोय. मुंबईत क्षमता आहे. मुंबई ही ग्लोबल सिटी असून इथे45 टक्के जनता झोपडपट्टीत राहते, शहराला झोपडपट्टीमुक्त करायचे आहे. त्यामुळे पदावर आल्यानंतर प्रथम मुंबईतील पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर भर दिला आहे. शासनाच्या योजना व धोरणाबाबत नागरिकांकडून काय अपेक्षा आहेत, यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुंबई ही सांस्कृतिक राजधानी आहे. वाहतूक समस्या आहे,मात्र मेट्रो आल्यानंतर ही समस्या सुटणार असल्याने मुंबईकर तक्रार करीत नाहीत. जनतेच्या सहभागानेच राज्याचा विकास होत असल्याने अनेक योजनात व धोरणात जनतेला सामावून घेतले जात आहे. मुंबईमध्ये जगातली सर्वात मोठा चित्रपट उद्योग आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिज्युल व स्पेशल इफेक्ट आणि ॲनिमेशनच्या अभ्यासासाठी मुंबईत संस्था उभारण्यासाठी फिल्म इंडस्ट्रीने ब्ल्यू प्रिंट तयार करावी, याला शासन सहकार्य करेल, असेही मुख्यमंत्री म्हणाले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्र व उद्योगासाठी शासनाने धोरणात बदल केला असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. व्यावसायिक शिक्षणाविषयी मुख्यमंत्री म्हणाले, सध्या कौशल्य विकासावर आधारित शिक्षण देण्यावर भर आहे. यासाठी केंद्र शासनाने नियमातही बदल केले असून व्यावसायिक शिक्षण देणारी परदेशी विद्यापीठे राज्यात येत आहेत. नवीन नोकऱ्या, मानवी संसाधने तयार करणारे शिक्षण देण्यासाठी परदेशी संस्था व विद्यापीठे यांच्यात सहकार्य होत आहे. यावेळी शाहरूख खानने आपण स्वत: शिक्षण क्षेत्रात काम करणार असल्याचे जाहीर केले. मुंबईतील जुन्या वस्तू, ठिकाणे, संस्कृती जपून ठेवण्यासाठी संग्रह केंद्र उभारण्यासाठी पुढाकार घेणार असून मुंबईला 'मॅजिकल मुंबई' बनवायचे आहे. मुंबईतील सांस्कृतिक, कला, नेपथ्य आदींसह सर्व क्षेत्रातील कल्पक व्यक्तींना घेऊन मुंबईला'क्रिएटिव्ह हब' बनवायचा संकल्प शाहरूख खान याने बोलून दाखविला. मी मुख्यमंत्र्यांना रात्री तीन वाजता संपर्क करतो ज्या वेळी एसएमएस केला आहे तेव्हा तेव्हा मला उत्तर मिळाले आहे, असेही शाहरुखने यावेळी सांगितले. शाहरूखचे काय होते प्रश्न आणि त्याला मुख्यमंत्र्यांनी दिलेली उत्तरे शाहरुख - ट्रॅफिकही फार मोठी समस्या आहे? तुम्ही विरोधी पक्षात असतांना प्रश्न उपस्थित करायचात, मात्र आमच्यासारख्या सामान्य माणसाने काय करायचे? मुख्यमंत्री - मुंबई मध्ये जेवढी शिस्त आहे तेवढी अजून कोणत्याही शहरात नाही. मुंबईकरांसाठी अनेक प्रकल्प सुरू आहेत. सध्या ट्रॅफिकमध्ये वेळ लागतो मात्र मुंबईकरखूप सहकार्य करत आहेत. मुंबईकरांकडून मला काय हवं आहे? या पेक्षा मुंबईकरांना माझ्याकडून काय हवं आहे ते महत्वाचं आहे. लोकांनी आम्हाला प्रश्न करत राहावे त्याने आम्हाला त्यातून काम करण्याची प्रेरणा मिळते. शाहरुख - मुंबईसाठी तुमच्या काय योजना मिशन काय आहेत? मुख्यमंत्री - मुंबईमध्ये सर्वांना आपली स्वप्न पूर्ण करता यावीत असे काम करायचं आहे, हेच माझं मिशन आहे अस यावेळी मुख्यमंत्री म्हणाले शाहरुख -मुंबईमध्ये तुम्ही जो विकास घडवू इच्छिता त्या संदर्भात सांगा? मुख्यमंत्री - मी जरी नागपूरचा असलो तरी माझा अर्धा वेळ मुंबईमध्येच गेला आहे. लोकांना चांगलं घर आणि वातावरण देणे ही आमची जबाबदारी आहे. बऱ्याचदा हे म्हणणं खूप सोपं असत मात्र करणे खूप कठीण असते. त्यामुळे सामान्यांसाठी मूलभूत सुविधांचे प्रकोप निर्माण करण्याची कामे सुरु आहेत.