एक्स्प्लोर

आता मिशन ऑक्सिजन स्वावलंबन, कोविड केंद्रांची संख्याही वाढवणार : मुख्यमंत्री

राज्याची आरोग्य सुविधा आणखी बळकट करण्यावर भर दिला जात आहे : मुख्यमंत्री

मुंबई : राज्यात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलं असून आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. अनेक रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे राज्यातील आरोग्य व्यवस्था आणखी बळकट आणि अशा अनेक संकटांना तोंड देणारी ठरेल, यावर भर दिला जात असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे सांगितले. पेटीएम फाऊंडेशनच्यावतीने राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि लसीकरणासाठी राज्य शासनाला सहकार्य करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने दृरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री ठाकरे बोलत होते.

पेटीएम फाऊंडेशन स्वतःहून पुढे आल्याबद्दल मुख्यंत्र्यांनी अशा संकटाच्या काळात राज्य आणि देशाच्या आर्थिक चक्राला गती देण्यासाठी असे प्रयत्न महत्वाचे ठरतील, असे कौतुकोद्गारही काढले.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, विकास होत राहील. पण जीव वाचले, तर विकासाला खरा अर्थ आहे. आपण विकास, विकास म्हणून ज्याच्या मागे धावत होतो. त्या विकासाने आपल्याला तोंड दाखवायला जागा ठेवलेली नाही. आता आपल्याला ऑक्सिजनच्या मागे धावावे लागत आहे. कोरोनाने आपल्याला धडा दिला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातील आव्हानांना तोंड देण्याची तयारी आतापासूनच आम्ही सुरु केली आहे. पहिल्या लाटेत आम्ही खूप सुविधा जाणीवपूर्वक वाढवल्या. पण त्याही आता अपूऱ्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे आता लसीकरण सुरु झाल्यानंतरही आरोग्या सुविधा वाढविणाऱ्यावर भर आहे. आता जुलैनंतर पावसाळ्यामुळेही अनेक साथीचे आजार पसरू लागतात. त्यांना तोंड देण्यासह कोविडची तीसरी, चौथी आणि अशा कितीही लाटा आल्या तरीही त्यांना थोपविण्यासाठी, लोकांना उपचार मिळावेत यासाठी जास्तीत जास्तीत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ऑक्सिजन हे आता औषध ठरल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील ऑक्सिजन निर्मिती पंधराशे मेट्रीक टनांपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. त्याशिवाय ज्या-ज्या गोष्टी आवश्यक आहेत, त्या जास्तीत जास्त प्रमाणात उपलब्ध होतील, असे प्रयत्न आहे. त्यामध्ये तात्पुरत्या आणि दीर्घकाळाचे असे नियोजन आहे. रुग्णशय्यांची संख्या, तसेच कोविड केंद्रांचीही संख्या वाढवणार आहोत.

पेटीएम फाऊंडेशनने ऑक्सिजन निर्मिती, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर आणि लसीकरणात लसीकरणासाठी सरकारी यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी लस उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक सहाय्याचीही तयारी दर्शवली आहे. या सगळ्या सहकार्याचे आणि पुढाकाराचेही मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले.

पेटीएम फाऊंडेशनचा पुढाकार..
पेटीएम फाऊंडेशनने ऑक्सिजन निर्मिती-पुरवठा, लसीकरण आणि लस उपलब्धतेसाठी निधी यासाठी आवश्यक असे योगदान देण्याची हमी दिली आहे. राज्यात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीत, तसेच लसीकरणासाठी मुंबई-पुण्यातील मोठ्या कंपन्यांची कार्यालयांचा परिसर आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची तयारी. लशीसाठी आवश्यक अर्थसहाय्यही सामाजिक बांधिलकी निधीतून तसेच विविध मार्गातून आर्थिक भार उचलण्याची तयारी दर्शवली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
दिल्लीत ज्यांनी सामान फेकले, त्यांच्याच सत्तेचे गाठोडे बांधले, खास शैलीत मुख्यमंत्र्यांकडून रामदास आठवलेंचा गौरव 
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
तुकाराम मुंढेंचा धडाका! Blinkit, Zepto अन् Instamart च्या डार्क स्टोअर्सवर FDA चे धाडसत्र; परवाने निलंबित
Maharashtra Rain: पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
पावसाचं पुन्हा कमबॅक! 27 जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज, मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार? वाचा हवामान विभागाचा अंदाज
Asim Sarode On Shivsena Name And Symbol Hearing Supreme Court: तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
तोच कागदोपत्री पुरावा आता एकनाथ शिंदेंसाठी अडचण ठरणार; शिवसेना सुनावणीवर असीम सरोदे यांचं मोठं विधान, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget