एक्स्प्लोर
Advertisement
गुजराती अनुवाद प्रकरणावर मुख्यमंत्र्यांचा माफीनामा
'खरं तर हा विषय सभापती आणि अध्यक्ष यांच्या अखत्यारितील आहे. पण माझी त्यांना अशी विनंती आहे की, या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. इतकंच नव्हे तर आज संध्याकाळपर्यंत दोषींवर कारवाई करुन त्यांना घरी पाठवण्यात यावं.'
मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधीमंडळात प्रचंड गदारोळ पाहायला मिळला. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केलेल्या भाषणाच्या अनुवादावरुन विरोधक प्रचंड आक्रमक झाले होते. त्यानंतर खुद्द मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी सभागृहाची माफीही मागितली.
सभागृहात राज्यपालांचं अभिभाषणं आमदारांना थेट गुजराती भाषेतून ऐकायला मिळाल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंनी केला. या सगळ्या प्रकारानंतर सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाची माफी मागितली. तसेच राज्यपालांनी देखील झाल्या प्रकाराची चौकशी करण्याची सूचना केली आहे.
मुख्यमंत्र्यांचा माफीनामा :
‘अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी राज्यपाल हे नेहमी अभिभाषण करतात. जेव्हा-जेव्हा ते इंग्रजीतून भाषण करतात तेव्हा-तेव्हा त्या भाषणाचं मराठीतून अनुवाद केला जातो. मात्र, आजच्या भाषणादरम्यान मराठी अनुवाद ऐकू आला नाही. त्यामुळे शिक्षणमंत्री तावडेंना धावपळ करुन नियंत्रण कक्षातून मराठीत अनुवाद करावा लागला. हे अतिशय गंभीर आणि निषेधार्ह आहे. खरं तर हा विषय सभापती आणि अध्यक्ष यांच्या अखत्यारितील आहे. पण माझी त्यांना अशी विनंती आहे की, या प्रकरणात जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी. इतकंच नव्हे तर आज संध्याकाळपर्यंत दोषींवर कारवाई करुन त्यांना घरी पाठवण्यात यावं. हा संपूर्ण प्रकार विधीमंडळच्या अंतर्गत येत असला तरी मी याप्रकरणी सभागृहाची स्पष्टपणे माफी मागतो.
विधीमंडळात नेमकं काय घडलं?
राज्यपालांचं भाषण सुरु होताच मराठी अनुवाद ऐकू येत नसल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षात जाऊन स्वत: मराठी अनुवाद केला. पण तोपर्यंत विरोधक चांगलेच आक्रमक झाले आणि त्यांनी वेलमध्ये उतरुन घोषणाबाजी केली. त्यानंतर आक्रमक झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांनी सभात्यागही केला.
संबंधित बातम्या :
राज्यपालांच्या भाषणाचा अनुवाद गुजरातीमधून, विरोधक आक्रमक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement