एक्स्प्लोर

मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर छठ पूजेला बंदी; सरकारचं हिंदूविरोधी कृत्य असल्याची भाजपची टीका

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर छठ पूजेला बंदी घालण्यात आली आहे. बीएमसीच्या या निर्णयानंतर राजकारणही सुरु झालं आहे. किनाऱ्यावर छठ पूजेला बंदी म्हणजे हिंदूविरोधी कृत्य असल्याची टीका भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे.

मुंबई : मुंबईतील समुद्रकिनाऱ्यावर छठ पूजेला बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. छठ पूजेसाठी समुद्रावर होणारी गर्दी पाहता सोशल डिस्टन्सिंगचं पालन होणार नाही, अशी शंका मुंबई महापालिकेला आहे. मुंबई महापालिकेच्या या निर्णयानंतर सरकारने मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात अशी मागणी भाजपने केली आहे. यासंदर्भात मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी राज्यपालांना पत्र लिहिलं आहेत.

दुसरीकडे बीएमसीच्या या निर्णयानंतर आता राजकारणही सुरु झालं आहे. किनाऱ्यावर छठ पूजेला बंदी म्हणजे हिंदूविरोधी कृत्य असल्याची टीका भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी केली आहे. तर मुंबईतील उत्तर भारतीयांचे नेते अशी ओळख असलेल्या काँग्रेसच्या संजय निरुपम यांनी यंदा घरीच छठ पूजा साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.

सरकार आणि मुंबई महापालिका हिंदूविरोधी काम करत असल्याची शंका : अतुल भातखळकर "बरेच दिवस आधी मी स्वत: मुख्यमंत्र्यांकडे छठ पूजा करण्याबाबत परवानगी मागितली होती. परंतु ऐन दिवाळीत वक्फ बोर्डाचे भाडे कोट्यवधीने वाढवले. मंदिरे सर्वात उशिरा उघडली आणि आता छठ पूजेलाही परवानगी नाकारली आहे. सरकार आणि मुंबई महापालिका हिंदूविरोधी काम करत आहे, अशी शंका माझ्या मनात येत आहे. अशा सरकार आणि महापालिकेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो," अशा शब्दात भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

छठ पूजा अवश्य साजरी करा, पण सार्वजनिक ठिकाणी नाही : संजय निरुपम "छठ पूजा अवश्य साजरी करा, पण सार्वजनिक ठिकाणी गर्दी करुन साजरी करु नका. तुमच्या परिसरात एखादी विहीर, तलाव असेल तर किंवा इमारतीत, घरात छठची व्यवस्था करुन पूजा करा. जुहू बीचवर दरवर्षी लाखोच्या संख्यने लोक जमा होतात. यंदाही गर्दी झाली तर कोरोनाचा प्रादुर्भाव किती वाढू शकेल यांचा अंदाज लावता येणार नाही. याचा परिणाम सर्वसामान्य मुंबईकरांवर होऊ शकतो, जे चुकीचं आहे. त्यामुळे सामाजिक भान राखत यंदा जुहू बीच किंवा सार्वजनिक ठिकाणी जाऊन छठ पूजा साजरी करु नये. पण पूजा अवश्य करायला हवी," असं संजय निरुपम म्हणाले.

कोरोनामुळे यंदाच्या छठ पूजेवर निर्बंध छठ पूजा यंदा 20 आणि 21 नोव्हेंबर रोजी साजरा केला जाणार आहे.बिहार, उत्तर प्रदेश आणि झारखंड या राज्यांत प्रामुख्याने साजरा होणारा हा उत्सव गेल्या काही वर्षांपासून मुंबईतही मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. जुहू बीचवर दरवर्षी छठ पूजेसाठी हजारो उत्तर भारतीयांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळते. छट पूजेच्या निमित्ताने निर्माल्य विसर्जित करण्यासाठी भाविक समुद्रकिनारी, तलाव, नदी किनारी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी मोठ्या संख्येने जमतात. परंतु यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने काही अटी घातल्या आहे. त्यात समुद्र किनारी, नदी किनारी किंवा तलावाच्या काठी हा उत्सव साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Chhath Puja 2020 | मुंबईतील किनाऱ्यांवर छठपूजेला बंदी घातल्यानंतर राजकारणाला सुरुवात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Video : धनंजय मुंडेंच्या परळीत राडा, तीन मतदान केंद्रावर तासभर थांबलं मतदान; ईव्हीएमची तोडफोड
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Praniti Shinde : प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
Embed widget