एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
डोंबिवली आणि बदलापुरात केमिकलमुळे घबराट, गटारींमधून रासायनिक धूर
डोंबिवली एमआयडीसीच्या फेज एकमध्ये रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या ड्रेनेजमधून अचानक धूर निघू लागला. शिवाय उग्र दर्पाचं हे रासायनिक सांडपाणी रस्त्यावर सुद्धा आलं आहे. त्यामुळं डोंबिवलीकरांमध्ये चांगलीच घबराट पसरली आहे.
कल्याण : डोंबिवली एमआयडीसीच्या फेज एकमध्ये रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या ड्रेनेजमधून अचानक धूर निघू लागला. शिवाय उग्र दर्पाचं हे रासायनिक सांडपाणी रस्त्यावर सुद्धा आलं आहे. त्यामुळं डोंबिवलीकरांमध्ये चांगलीच घबराट पसरली आहे.
डोंबिवली एमआयडीसीच्या फेज एक मध्ये दुपारच्या सुमारास रासायनिक सांडपाणी वाहून नेणाऱ्या ड्रेनेज लाईनमधून अचानक धूर निघू लागला. शिवाय उग्र दर्पाचं रासायनिक सांडपाणी रस्त्यावर सुद्धा वाहू लागलं.
तर दुसरीकडे बदलापूर रेल्वे स्थानकालगतच्या नाल्यात केमिकलचं पाणी सोडल्याचं निदर्शनास आलं. शिवाय परिसरात या सांडपाण्याचा उग्र दर्पही पसरला आहे.
डोंबिवली आणि बदलापूरमध्ये असे प्रकार नेहमीचेच होत आहेत. मात्र, त्याकडं प्रदूषण नियंत्रण मंडळ कानाडोळा करत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
क्राईम
राजकारण
Advertisement