एक्स्प्लोर

Nalasopara Crime : 'दोन वर्षांत हिंदू संपतील...' मैत्रिणीच्या मदतीने लव्ह जिहाद जाळं, नालासोपारा येथे तरुणीवर अनन्वित अत्याचार

Nalasopara Religious Conversion Case : नालासोपारा येथे धर्मांतरासाठी दबाव टाकणे, बलात्कार करणे आणि गोमांस खाण्यास सक्ती केल्याचा अत्यंत संतापजनक प्रकार समोर आला आहे. 

मुंबई : मैत्रीच्या माध्यमातून ओळख वाढवून प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, त्यानंतर धर्मांतरासाठी दबाव टाकून जबरदस्तीने मारहाण आणि लैंगिक अत्याचार करणे, असा अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार नालासोपारा येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी पीडित तरुणीने 12 ऑक्टोबर रोजी नालासोपारा पोलीस ठाण्यात (Nalasopara Police Station) गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी आरिफ शेख (Arif Sheikh) याच्यासह त्याची आई रुक्साना शेख आणि मावस भाऊ साहिल खान यांचाही या कटात सहभाग असल्याचा खळबळजनक दावा पीडितेने आपल्या जबाबात केला आहे.

"दोन वर्षांत हिंदू संपतील, त्यामुळे लवकर धर्मांतर कर", असे वक्तव्य आरोपी आरिफ करत असल्याने तो एखाद्या मोठ्या देशविरोधी किंवा धर्मांतर घडवणाऱ्या टोळीशी जोडलेला आहे का, या दृष्टिकोनातून पोलीस चौकशीची मागणी केली जात आहे.

Forced Conversion And Abuse : जादूटोणा आणि प्रेताची भीती दाखवून अत्याचार

पीडितेच्या दाव्यानुसार, तिच्या एका मैत्रिणीच्या माध्यमातून तिची आरोपी आरिफ शेखशी ओळख झाली होती. ओळख वाढल्यानंतर आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि आपली आई रुक्साना शेख अॅस्ट्रोलॉजर (Astrologer) असल्याचे सांगून तिच्याकडे नेले. 

आरिफच्या आईने पीडितेला, "तुझी आई मेली आहे, तुझ्या घरात भूत राहते आणि तुझे घरचेच तुझे शत्रू असून ते तुला मारून टाकतील," अशी भीती दाखवली. त्यानंतर तिला स्वतःच्या घरी राहण्यास भाग पाडले. 1 एप्रिल 2025 रोजी पीडिता आरोपीच्या घरी राहण्यास गेली असता, लग्न करण्याचे आमिष दाखवून आरिफ तिच्यावर वारंवार अत्याचार करत राहिला.

त्यानंतर 5 मे 2025 रोजी ते दोघे दुसऱ्या ठिकाणी भाड्याने राहू लागले. तिथे फक्त हिंदू नागरिकांनाच खोल्या दिल्या जात असल्याने आरिफने स्वतःला पीडितेचा भाऊ भासवून 'लिव्ह-इन-रिलेशनशिप'मध्ये (Live In Relationship) राहण्यास सुरुवात केली. विरोध केल्यास तो पीडितेला अमानुष मारहाण करायचा. जुलै 2025 मध्ये आरिफचा मावस भाऊ साहिल खान यानेही पीडितेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला विरोध केला असता दोघांनी मिळून तिला बेदम मारहाण केली.

Targeting Hindu Girls : गोमांस खाण्याची अन् हिजाबची सक्ती

या सर्व छळवणुकीदरम्यान आरोपींकडून पीडितेला गोमांस खाण्यास आणि हिजाब परिधान (Hijab) करण्यास सांगून धर्मांतरासाठी सातत्याने दबाव टाकला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. नकार दिल्यास तिला बेदम मारहाण केली जात असे.

पीडितेने केलेल्या अत्यंत गंभीर आरोपानुसार, आरिफ शेख हा तरुण मुलींना जाळ्यात ओढणाऱ्या एका मोठ्या टोळीचा भाग आहे. मुलींचे अश्लील फोटो काढून त्यांच्याकडून पैसे उकळणे आणि त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणे, असा हा गंभीर प्रकार सुरू होता. आरिफने स्वतः तिच्यासमोर 70 ते 80 हिंदू मुलींना लक्ष्य केल्याचे कबूल केले होते. विशेषतः नवरात्रोत्सव आणि गणेशोत्सवाच्या काळात हिंदू तरुणींना टार्गेट केले जात असल्याचा आरोप तिने केला आहे. या प्रकरणी आणखीही काही पीडित मुली समोर येऊन तक्रार दाखल करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Musafir Khana Masjid in bhendi bazar: भेंडीबाजारातील दाऊदच्या घराजवळची मुसाफिरखाना मशीद BMC जमीनदोस्त करणार, तोडकामापूर्वी अश्विनी भिडेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
भेंडीबाजारातील दाऊदच्या घराजवळची मुसाफिरखाना मशीद BMC जमीनदोस्त करणार, तोडकामापूर्वी अश्विनी भिडेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
Mumbai Kandivali Railway Station Viral Video: कांदिवली रेल्वे स्थानकात AK-47 घेऊन पाकिस्तानी दहशतवादी आल्याचा व्हिडीओ व्हायरल; RPF ची धावपळ, पुढे काय घडलं?
कांदिवली रेल्वे स्थानकात AK-47 घेऊन पाकिस्तानी दहशतवादी आल्याचा व्हिडीओ व्हायरल; RPF ची धावपळ, पुढे काय घडलं?
Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
'गोकुळ'मध्ये कंडका पाडणाऱ्या बंटी पाटलांना काँग्रेसकडून मोठी जबाबदारी; आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महत्त्वाचं पद
Advertisement

व्हिडीओ

Amit Shah vs Uddhav Thackeray : 'कोरोना'तले फोन,आरोपांचा टोन Special Report
Rohit Pawar vs Devendra Fadnavis : आरोपांची बरसात,पण घरातूनच मिळेना साथ Special Report
Eknath Shinde On Uddhav Thackeray :अमित शाहांवर टीका करणारेच सर्वात मोठे थापाडे, उद्धव ठाकरेंवर टीका
Pune Ajit Pawar Statue : अजितदादांचा पुतळा, आठवणींना उजाळा Special Report
Rohit Pawar on Devendra Fadnavis Ajit Pawar Plan Crash : 'मफलर मॅन' , आरोपांचे बाण Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Satara District Bank : सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा आज फैसला; भाजप की राष्ट्रवादी, कुणाचं पारडं जड? जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी महायुतीत रस्सीखेच; अध्यक्षपदावरून भाजप-राष्ट्रवादी आमनेसामने
Raigad Traffic jam News : रायगडमध्ये चिमुकल्याने फुगा गिळला, घाबरलेले आई-बाप लेकराला रुग्णालयात घेऊन निघाले, पण ट्रॅफिकमुळे रस्त्यातच जीव सोडला, अलिबाग-बेलकडे मार्गावरील घटनेने संतापाची लाट
रायगडमध्ये चिमुकल्याने फुगा गिळला, घाबरलेले आई-बाप लेकराला रुग्णालयात घेऊन निघाले, पण ट्रॅफिकमुळे रस्त्यातच जीव सोडला, अलिबाग-बेलकडे मार्गावरील घटनेने संतापाची लाट
NCP Leader viral video: नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
नर्तिकेवर एकापाठोपाठ एक कोऱ्या करकरीत नोटा उधळल्या, गर्दीतून 'सातबारा कोरा होईल'ची हाक, राष्ट्रवादीच्या नेत्याचा व्हिडीओ व्हायरल
MS Dhoni Emotional Video After Retirement Of IPL: IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
IPL मधून निवृत्ती घेताच जुन्या फोटोंसह स्वत: व्हिडीओ एडिट केला; MS धोनीच्या पोस्टने सगळ्यांना रडवले
Musafir Khana Masjid in bhendi bazar: भेंडीबाजारातील दाऊदच्या घराजवळची मुसाफिरखाना मशीद BMC जमीनदोस्त करणार, तोडकामापूर्वी अश्विनी भिडेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
भेंडीबाजारातील दाऊदच्या घराजवळची मुसाफिरखाना मशीद BMC जमीनदोस्त करणार, तोडकामापूर्वी अश्विनी भिडेंनी बोलावली महत्त्वाची बैठक
IPL Top Released Player List 2027: MS धोनीपासून ट्रॅव्हिस हेड, शिमरॉन हेटमायरपर्यंत....; आयपीएल 2027 मधून रिलीज केलेल्या टॉप खेळाडूंची यादी, चक्रावणाऱ्या नावांचा समावेश
धोनीपासून हेड, हेटमायरपर्यंत....; आयपीएल 2027 मधून रिलीज केलेल्या टॉप खेळाडूंची यादी, चक्रावणाऱ्या नावांचा समावेश
Maharashtra IAS Transfer : राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
राज्यातील प्रशासनात मोठे फेरबदल! तीन वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; अतुल पाटणे, शैला ए. आणि स्वाती म्हसे-पाटील यांना नव्या जबाबदाऱ्या!
Maharashtra Live blog updates: कांदिवलीत 15 वर्षांपासून प्रलंबित रस्ता रुंदीकरणातील 27 बांधकामे तोडली
Maharashtra Live blog updates: कांदिवलीत 15 वर्षांपासून प्रलंबित रस्ता रुंदीकरणातील 27 बांधकामे तोडली
Embed widget