एक्स्प्लोर

उद्योगपती अनिल अंबानींची 2,032 कोटींची मालमत्ता ED कडून जप्त; परकीय चलनाच्या FEMA कायद्यांतर्गत कारवाई

अनिल अंबानी यांनी परदेशात बेकायदेशीररीत्या ठेवलेल्या परकीय चलनाच्या सममूल्याची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.

मुंबई : देशातील नामवंत उद्योगपती अनिल अंबानी (Anil Ambani) यांच्या अडचणी कमी होताना दिसून येत नाहीत. गेल्या वर्षभरापासून त्यांच्या संपत्तीवर ईडीकडून कारवाई सुरू आहे. आत्तापर्यंत 9 हजार कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. त्यातच, रिलायन्स पॉवर लिमिटेडची भारतातील 2,032.81 कोटींची मालमत्ता ED कडून (ED) जप्त करण्यात आली आहे. परकीय चलन व्यवस्थापन कायद्याच्या (FEMA) कलम 37A अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. जप्त मालमत्तेत रिलायन्स (Reliance) पॉवरच्या बँक खात्यातील रक्कम आणि सासन पॉवर लिमिटेडमधील भागीदारीचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.  

अनिल अंबानी यांनी परदेशात बेकायदेशीररीत्या ठेवलेल्या परकीय चलनाच्या सममूल्याची मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. SEBI कडून मिळालेल्या माहितीनंतर ED चा अधिक तपास सुरू आहे. कंपनीच्या खात्यांमध्ये  2,101.46 कोटींच्या राइट-ऑफ आणि तरतुदींची नोंद केली आहे. ब्रिटिश व्हर्जिन आयलंड्स (BVI) आणि केमन आयलंड्समधील कंपन्यांतील परदेशी गुंतवणूक आणि ॲडव्हान्सच्या व्यवहारांची चौकशी. तसेच, 2006 मध्ये रिलायन्स नॅचरल रिसोर्सेस लिमिटेडने परकीय चलन परिवर्तनीय रोख्यांद्वारे 300 दशलक्ष डॉलर उभारले आहेत. त्यापैकी 275 दशलक्ष डॉलर सिंगापूरस्थित उपकंपनीत गुंतवण्यात आल्याचा आरोप आहे. या निधीच्या आधारे BVI मधील कंपन्यांना कर्ज देण्यात आले. या कंपन्यांचे नियंत्रण भारतातून रिलायन्सच्या अनिल अंबानी समूहाकडून होत असल्याचा आरोप असल्याने ED कडून तपास सुरू आहे. 

दरम्यान,मॉरिशसमधील परदेशी संस्थांमार्फत निधी भारतात तात्पुरता परत आणल्याचा आणि उर्वरित निधी परदेशात ठेवल्याचा आरोप करण्यात आला असून कर्जाची परतफेड न झाल्यानंतर व्यवहार वैध व्यावसायिक असल्याचे भासवण्यासाठी मागील तारखेची कागदपत्रेही त्यांनी तयार केल्याचे तपासात उघडकीस 
आले. 

यापूर्वी 9000 कोटींची संपत्ती जप्त

दरम्यान, यापूर्वी देखील अनिल अंबानी यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांची मोठी संपत्ती जप्त केली आहे. त्यामुळे, अनिल अंबानी यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढतच असल्याचे दिसून येते. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपवर ईडीकडून नोव्हेंबर 2025 मध्ये कारवाई करण्यात आली होती. तेव्हा आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं रिलायन्स ग्रुपशी संबंधित 1400 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. यापूर्वीच ईडीने अनिल अंबानी यांची एकूण 9000 कोटींपेक्षा जास्त रुपयांची संपत्ती जप्त केली आहे.

हेही वाचा

Gold Rate : सोने चांदीच्या दरातील घसरण सुरुच, सोने 1200 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर 4646 रुपयांनी घसरले, जाणून घ्या नवे दर

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी तर भारतात 20 टक्क्यांनी कोसळले, फरक नेमका कशामुळं? भारतात सोनं उच्चांकावरुन 36700 रुपयांनी घसरलं
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 24 टक्क्यांनी कोसळले, भारतात सोनं 20 टक्क्यांनी स्वस्त, फरक कशामुळं? 
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
गेल्या 8 वर्षात प्रथमच मुहूर्त ट्रेडिंगवर घसरण! सेन्सेक्स 29 अंकांनी, निफ्टी 44 अंकांनी घसरून बंद; बँकिंग कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्री
Finolex Cables : मुहूर्त ट्रेडिंगचं सत्र गाजवलं, फिनोलेक्स केबल्सच्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, स्टॉकमध्ये तब्बल 20 टक्के तेजी, जाणून घ्या कारण
मुहूर्त ट्रेडिंगचं सत्र गाजवलं, फिनोलेक्स केबल्सच्या गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस, स्टॉकमध्ये तब्बल 20 टक्के तेजी
Advertisement

व्हिडीओ

Raosaheb Danve Arjun Khotkar Jalna : कटुता 100 टक्के संपली, रावसाहेब दानवे - खोतकरांची फटकेबाजी
NCP Merger News : तटकरेंचा यू-टर्न, पुन्हा चर्चेत विलिनीकरण Special Report
Ameet Satam vs Shiv Sena : साटमांना आमंत्रण, वादाला निमंत्रण Special Report
Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate: सोन्याच्या दरात घसरण कायम, सोन्याचे दर वाढणार की आणखी घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
Gold Rate: सोन्याचे दर वाढणार की घसरणार? जागतिक सुवर्ण परिषदेनं दिले मोठे संकेत
PM Modi Meets LK Advani : पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
पंतप्रधान मोदींनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट, 100 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या अडवाणींसाठी भावुक पोस्ट
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
मुंबई इंडियन्स या 4 खेळाडूंना रिलीज करू शकते, हार्दिक पांड्याच्या ट्रेडला दुजोरा!
Ashok Saraf : बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
बरेच रोल केले, बरेच रोल करायचे राहिले, मला पत्थर दिल व्हिलनची भूमिका करायचीय : अशोक सराफ
Babri Masjid Verdict : 'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
'मुस्लिमांनी कोर्टाच्या निर्णयाचा आदर केला, हा विषय आता...'; सोनिया गांधींच्या बाबरी मशिदीच्या वक्तव्यावर इक्बाल अन्सारींची स्पष्ट प्रतिक्रिया
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
क्रेडिट कार्डवरील नो-कॉस्ट ईएमआय पूर्णपणे मोफत नाहीच, प्रोसेसिंग फी आणि 18 टक्के जीएसटीमुळे अतिरिक्त भार; खरेदी करण्यापूर्वी या 5 गोष्टी तपासा!
Jay Pawar : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवार यांनी अजितदादांच्या आठवणींना दिला उजाळा
दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण; पण आमच्या आयुष्यातील खरा प्रकाश तुम्ही होता Dad, जय पवारांची अजितदादांच्या आठवणीत भावनिक स्टोरी

Embed widget