एक्स्प्लोर
तुर्भे एमआयडीसीत केमिकल कंपनीला भीषण आग
तुर्भे एमआयडीसीतील मोडेको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आज दुपारी भीषण आग लागली. या आगीत तीन कामगार जखमी झाले असून, त्यांच्यावर पालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीतील केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. यात कंपनीतील तीन कामगार जखमी झाले आहेत. यानंतर वाशी अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तुर्भे एमआयडीसीतील मोडेको इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आज दुपारी भीषण आग लागली. या आगीत तीन कामगार जखमी झाले असून, त्यांच्यावर पालिका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही आग इतकी भीषण आहे की, आगीचे लोट दूरवरुनही स्पष्ट दिसत आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी वाशी अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
आणखी वाचा























