एक्स्प्लोर
Advertisement
तिळगूळ घ्या, भांडू नका; चंद्रकांत पाटलांच्या अटीवर रामदास कदम म्हणाले...
कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन वादळी ठरणारी मंत्रिमंडळाची बैठक आज मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हसतखेळत पार पडली.
मुंबई : युतीवरुन शिवसेना आणि भाजपमध्ये तणावाची परिस्थिती असताना, आज मकरसंक्रांतीच्या मुहूर्तावर मंत्रिमंडळ बैठकीत वेगळं चित्र पाहायला मिळालं. युतीत गोडवा आणण्यासाठी भाजपच्या एका मंत्र्याने मंत्रिमंडळ बैठकीत शिवसेना मंत्र्यांना तिळगूळ दिले आणि गोड गोड बोला, असंही म्हटलं.
बैठकीच्या सुरुवातीलाच राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांना तिळगूळ देऊन न भांडण्याची अट घातली. त्यावर रामदास कदम यांनी किमान आज तरी भांडणार नसल्याचं कबूल केलं.
कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन वादळी ठरणारी मंत्रिमंडळाची बैठक आज मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हसतखेळत पार पडली. पण युतीवरची संक्रांत कायमची टळणार का यावर मंत्रालयात चांगलीच चर्चा रंगली होती.
संबंधित बातम्या
'रोडरोमियो'सारखे आमच्या मागे का लागता? : संजय राऊत
शाहांनी महाराष्ट्राच्या पैलवानांच्या नादी लागू नये : शिवसेना
अंगावर येणाऱ्याला शिंगावर घ्यायला तयार, अमित शाहांच्या वक्तव्याला शिवसेनेचं उत्तर
युती होगी तो ठीक, नही हुई तो पटक देंगे : अमित शाह
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
पुणे
राजकारण
ठाणे
Advertisement