एक्स्प्लोर
मला फिट घोषित करण्याचा ईडीचा घाट: छगन भुजबळ
मुंबई: बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी आर्थर रोड कारागृहात असलेल्या छगन भुजबळ यांनी ईडीवर गंभीर आरोप केले आहेत. ईडीद्वारे सादर केलेला मेडिकल रिपोर्ट माझा नसून इतरांचा, मेडिकल रिपोर्ट सादर करुन मला फीट घोषित करण्यात येत आहे. असा आरोप भुजबळ यांनी केला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर भुजबळांच्या मेडीकल तपासणीसाठी जेजे रुग्णालयातल्या डॉक्टरांचं एक विशेष पॅनल तयार केलं आहे. मात्र, या डॉक्टरांकडून सादर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये जन्मतारीख, एक्स रे रिपोर्टवरची तारीख, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची वेळ ही संपूर्ण माहिती चुकीची असल्याचं भुजबळ यांचे वकील अमित देसाई यांनी उच्च न्यायालयात म्हटलं आहे.
यावर ईडीला उत्तर देण्यासाठी न्यायालयानं गुरुवारपर्यंत वेळ देण्यात आला असून पुढील कारवाई गुरुवारपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
राजकारण
राजकारण
Advertisement