एक्स्प्लोर

केंद्रीय पथक महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा करणार

राज्यातील सर्व दुष्काळी भागातील पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यातील अधिकाऱ्यांच्या सहभागाने तीन टीममध्ये विभागले जाणार आहे. शेवटच्या दिवशी 7 डिसेंबरला विभागीय अधिकाऱ्यांसोबत केंद्रीय पथकाची मुंबईत किंवा पुण्यात संयुक्त बैठक होणार आहे.

मुंबई  : महाराष्ट्रातील दुष्काळी जिल्ह्यांचा पाहणीसाठी अखेर केंद्रीय पथकाचा तीन दिवसीय दौरा ठरला असून 5 ते 7 डिसेंबर दरम्यान केंद्राचं पथक राज्याच्या दुष्काळी जिल्ह्यांची पाहणी करणार आहे. राज्यातील सर्व दुष्काळी भागातील पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक राज्यातील अधिकाऱ्यांच्या सहभागाने तीन टीममध्ये विभागले जाणार आहे. शेवटच्या दिवशी 7 डिसेंबरला विभागीय अधिकाऱ्यांसोबत केंद्रीय पथकाची मुंबईत किंवा पुण्यात संयुक्त बैठक होणार आहे. हे केंद्रीय पथक राज्याच्या दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन मदतीसाठी केंद्राकडे अहवाल सुपूर्द करणार आहे. यापूर्वीच राज्याने 7522 कोटींच्या मदतीसाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे.  राज्य सरकारने एकूण 151 तालुके आणि 20 महसुली मंडळ दुष्काळ सदृश्य घोषित केले आहेत.

राज्यात 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

राज्यातील 26 जिल्ह्यांमधल्या 151 तालुक्यांमध्ये राज्य सरकारकडून दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. 112 तालुक्यांमध्ये गंभीर स्वरुपाचा, तर 39 तालुक्यांत मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झाला आहे. राज्यातील तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीतील पर्जन्याची तूट, उपलब्ध असलेल्या भूजलाची कमतरला, दूरसंवेदन विषयक निकष, वनस्पती निर्देशांक, मृदू आर्द्रता, पेरणीखालील क्षेत्र आणि पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करुन या घटकांनी प्रभावित झालेल्या तालुक्यांमध्ये आपत्तीची शक्यता विचारात घेऊन राज्य शासन परिशिष्ट 'अ' मध्ये नमूद केलेल्या 151 तालुक्यांमध्ये त्यांच्या नावासमोर दर्शवल्याप्रमाणे गंभीर/मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करत आहे. दुष्काळ घोषित केल्याचे आदेश 31 ऑक्टोबर (आज) पासून अंमलात येत आहेत. शासनाने हे आदेश रद्द न केल्यास पुढील सहा महिन्यांच्या कालावधीपर्यंत लागू राहतील. दुष्काळ घोषित केलेल्या तालुक्यांत आवश्यक उपाययोजना अंमलात आणण्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आलं आहे. गंभीर स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झालेले तालुके (112) सांगली (5) : जत, कवठेमहांकाळ, खानापूर-विटा, आटपाडी, तासगांव सातारा (1) : माण-दहीवडी सोलापूर (9) : करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, पंढरपूर, सांगोले, अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर पालघर (3) : पालघर, तलासरी, विक्रमगड धुळे (2) : धुळे, सिंदखेडे जळगाव (13) : अमळनेर, भडगांव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल नंदुरबार (3) : नंदुरबार, नवापूर, शहादा नाशिक (4) :  बागलान, मालेगांव, नांदगांव, सिन्नर अहमदनगर (11) : कर्जत, अहमदनगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, रहाता, रोहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड औरंगाबाद (9) : औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड,सोयगाव, वैजापूर, कन्नड बीड (11) :  आष्टी, बीड, धारुर, गेवराई, माजलगाव, शिरुर (कासार), वडवणी, केज, आंबेजोगाई, परळी, पाटोदा, जालना (7) : अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसांगवी, जाफ्राबाद, जालना, परतूर नांदेड (2) : मुखेड, देगलूर उस्मानाबाद (7) : लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर, वाशी, भूम परभणी (6) : मनवथ, पाथरी, सोनपेठ, पालम, परभणी, सेलू हिंगोली (2) :  हिंगोली, सेनगाव अमरावती (1) : मोर्शी बुलडाणा (7) : खामगाव, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा यवतमाळ (6) :  बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड, राळेगाव चंद्रपूर (1) : चिमूर नागपूर (2) : काटोल, कळमेश्वर मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर झालेले तालुके (39) पुणे (7) - आंबेगाव, पुरंदर, सासवड, वेल्हे, बारामती, दौंड, इंदापूर, शिरुर-घोडनंदी सातारा (2) - कोरेगांव, फलटण धुळे (1) - शिरपूर नंदुरबार (1) - तळोदे नाशिक (4) - देवळा, इगतपुरी, नाशिक, चांदवड नांदेड (1) - उमरी हिंगोली (1) - कळमनुरी लातूर (1) - शिरुर अनंतपाळ अकोला (5) - बाळापूर, बार्शिटाकळी, मुर्तिजापूर, तेल्हारा, अकोला अमरावती (4) - अचलपूर, चिखलदरा, वरुड, अंजनगांव सुर्जी बुलडाणा (1) - मोताळा वाशिम (1) - रिसोड यवतमाळ (3) - केलापूर, मारेगांव, यवतमाळ चंद्रपूर (4) - ब्रम्हपुरी, नागभिर, राजुरा, सिंदेवाही नागपूर (1) - नरखेड वर्धा (2) - आष्टी, कारंजा

महत्त्वाच्या बातम्या

काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
Dhananjay Munde and Sunetra Pawar: सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
सुनेत्रा वहिनींसमोर तो शेतकरी खूप जोरात बोलत होता, मी त्याला थांबवताच 'हुकूमशाह' असल्याचं पसरवलं: धनंजय मुंडे
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Air India Flight Turbulence: एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
एअर इंडियाचे विमान थांबले, उलटे-सुलटे झाले; अचानक भीषण टर्ब्युलन्स, अनेकजण जखमी, प्रवाशाने सांगितला थरारक प्रसंग
Maharashtra Goverment Cabinet Decision: पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
पिंपरी-चिंचवडमध्ये विशेष मोटार वाहन न्यायालय होणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 7 धडाकेबाज निर्णय
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
काँग्रेसकडून 'गुंगी गुडिया' टीकेचं समर्थन; हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं कारण, सुनेत्रा पवारांना मोलाचा सल्ला
Arvind Kejriwal: E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
E20 इंधनाविरोधात दिल्लीत अरविंद केजरीवाल यांचा एल्गार, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाकडे आपचा मोर्चा; अमेरिकेच्या दबावाखाली देशावर निर्णय थोपवल्याचा आरोप
DY Patil Passed Away : पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
पहिली IPL फायनल, महिला विश्वविजेतेपदाला गवसणी, नवी मुंबईतील डी वाय पाटील क्रिकेट स्टेडियमच्या निर्मितीची कहाणी!
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
बीडमधील व्हिडिओ, सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हणत काँग्रेसची बोचरी टीका; राष्ट्रवादीचा पलटवार, एकनाथ शिंदेंनीही सुनावलं
Embed widget