मुंबईकरांनो, रविवारच्या प्रवासाचं नियोजन आजच करा; उद्या मध्य आणि हार्बर मार्गांवर 'मेगाब्लॉक'
Mumbai Local Mega Block: आज रविवारी उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक होणार आहे. यामुळं मुंबईकरांनी घराबाहेर निघताना लोकलचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावं.
Mumbai Local Mega Block Updates : मुंबईकरांनो, रविवारी घराबाहेर बाहेर पडण्याचा प्लॅन असेल तर तुमच्या प्रवासाचं नियोजन (Mumbai Local Megablock) आजच करा. रविवार (26 फेब्रुवारी) रोजी मध्य रेल्वेवर आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक (Megablock on Central Railway) घेण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून प्रसिद्धीपत्रक जारी करुन देण्यात आली आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून 26 फेब्रुवारी 2023, रविवारी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी उपनगरीय विभागांत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळं मुंबईकरांनी घराबाहेर निघताना लोकलचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडावं.
माटुंगा - मुलुंड अप आणि डाउन धिम्या मार्गावर सकाळी अकरा ते दुपारी 3.55 पर्यंत
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 या वेळेत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबतील. पुढे मुलुंड स्थानकावर धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित आगमनापेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचेल.
ठाणे येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 या वेळेत अप धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड आणि माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकावर थांबतील. पुढे अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील आणि नियोजित आगमनापेक्षा 15 मिनिटे उशिराने गंतव्यस्थानावर पोहोचतील.
पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 04.05 पर्यंत
(बेलापूर/नेरुळ - खारकोपर मार्ग वगळून)
पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 वाजेपर्यंत सुटणारी ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि
ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेल करीता जाणारी डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.
ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई- वाशी भागात विशेष लोकल धावतील.
ब्लॉक कालावधीत ठाणे - वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील.
ब्लॉक कालावधीत बेलापूर - खारकोपर आणि नेरुळ - खारकोपर दरम्यान लोकल ट्रेन वेळापत्रकानुसार धावतील.
आणखी वाचा :
कांगारुंना घरचा आहेर, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने पॅट कमिन्सला सुनावलं, म्हणाला....