एक्स्प्लोर
मध्य रेल्वेवरील मोटरमनचं आंदोलन मागे, ओव्हरटाईम करणार
ऑक्टोबर अखेरपर्यंत 50 नवीन मोटरमनची भरती करण्याचं आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत देण्यात आलं.
मुंबई : मुंबईतील मध्य रेल्वेच्या मोटरमननी पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मोटरमन युनियन, डीआरएम, रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये दोन तास चाललेल्या बैठकीत अखेर तोडगा निघाला.
मोटरमनच्या रिक्त जागा त्वरित भरणे, सिग्नल ओलांडल्यास सेवेतून कमी करण्याची शिक्षा रद्द करणे या मोटरमनच्या प्रमुख मागण्या होत्या. त्यासाठी मोटरमननी ओव्हरटाईम न करता केवळ नियमित वेळेत काम करण्याचं मध्य रेल्वे मजदूर संघाने जाहीर केलं होतं.
ऑक्टोबर अखेरपर्यंत 50 नवीन मोटरमनची भरती करण्याचं आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत देण्यात आलं. त्याचप्रमाणे सिग्नल ओलांडल्यावर होणाऱ्या शिक्षा शिथिल करण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे मोटरमन पूर्वीप्रमाणे ओव्हरटाइम ड्युटी साठी रुजू होणार आहेत.
रेल्वेतील मोटरमनच्या 898 मंजूर पदांपैकी 229 पदे रिक्त आहेत. यामुळे सद्यस्थितीत रेल्वेच्या फेऱ्या सुरळीत पार पडण्यासाठी मोटरमनला ओव्हरटाईम करावा लागतो. ओव्हरटाईम न केल्यास मध्य रेल्वेच्या सुमारे 150 पेक्षा जास्त फेऱ्या रद्द कराव्या लागू शकतात.
मध्य रेल्वेवरील मोटरमननी आज ओव्हरटाईम करण्यास नकार दिल्यामुळे सकाळच्या वेळेत 9 फेऱ्या रद्द कराव्या लागल्या होत्या. त्यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम होऊन वाहतूक 15 ते 20 मिनिटं उशिरानं धावत होती.
मोटरमनला पूर्ण आठवड्यात 104 तास काम करावं लागतं. यापेक्षा जास्त काम केल्यास तो ओव्हरटाईम गृहित धरला जातो. या ओव्हरटाईमच्या बदल्यात मोटरमनला वरिष्ठतेनुसार 700 ते 1200 रुपये प्रतितास इतके वेतन मिळते.
सूत्रांच्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यात 3 घटना अशा झाल्या ज्यामध्ये युनियनशी निगडित मोटरमनने सिग्नल ओलांडून गाड्या पुढे नेल्या. त्यांच्यावरील कारवाई रद्द करावी यासाठी एक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न या युनियन्सकडून केला जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement