एक्स्प्लोर
दुसरं इंजिन लावून सिंहगड एक्स्प्रेस रवाना, म.रे. ची वाहतूक विस्कळीतच
मुंबई: मुंब्रा-कळवादरम्यान पारसिक बोगद्याजवळ सिंहगड एक्स्प्रेसचं इंजिन बंद पडल्यानं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या जलद लोकल दिव्यापासून धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत.
ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक 15-20 मिनिटं उशिरानं आहे. त्यामुळे प्रवाशांचे बरेच हाल झाले आहेत. बोगद्याजवळ एक्सप्रेस बंद पडल्यानं याचा परिणाम लोकल वाहतुकीवर झाला आहे.
पारसिक बोगद्याजवळ एका मागे एक अशा सहा लोकल ट्रेन खोळंबून राहिल्या आहेत. ऐन कामाच्या वेळी खोळंबा झाल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, सिंहगड एक्सप्रेसचं इंजिन दुरुस्त करुन वाहतूक पूर्ववत करण्याचा मध्य रेल्वेचा प्रयत्न सुरु आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement