एक्स्प्लोर

मध्य रेल्वेवर मोटरमन नसल्याने लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द!

गाड्या रद्द होण्याचं नवीन कारण समोर आलं आहे. मोटरमनची कमतरता असल्याने दररोज लोकलच्या अनेक फेर्‍या रद्द केल्या जात असल्याची माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिली आहे.

मुंबई : मध्य रेल्वेवरील तांत्रिक बिघाडामुळे गाड्या रद्द होतात हे आपण ऐकलं असेल. मात्र आता गाड्या रद्द होण्याचं नवीन कारण समोर आलं आहे. मोटरमनची कमतरता असल्याने दररोज लोकलच्या अनेक फेर्‍या रद्द केल्या जात असल्याची माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांनी दिली आहे. मध्य रेल्वेवर गेल्या पाच दिवसात ऐन गर्दीच्या काळात जवळपास 40 लोकल रद्द करण्यात आल्या. यामागे तांत्रिक बिघाडाचं कारण देण्यात आलं. मात्र खरं कारण वेगळंच होतं. मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मोटरमनच्या पदासाठी उपलब्ध असलेल्या जागांपैकी 20 टक्के जागा रिक्त आहेत. लोकलमध्ये 898 मोटरमनची गरज असताना सध्या फक्त 690 मोटरमन कार्यरत आहेत. त्यामुळे अनेक गाड्या रद्द कराव्या लागत आहेत. दरम्यान, मध्य रेल्वेकडून मात्र मोटरमनची कमतरता नसल्याचा दावा करण्यात येत आहे. मोटरमनच्या कमतरतेमुळे 27 मे रोजी मेन लाईनवरील 10, तर हार्बर लाईनवरील 14 लोकल फेर्‍या रद्द करण्यात आल्या. याच कारणांमुळे 25 मे रोजीही 10 फेर्‍या, 26 मे रोजी दोन फेर्‍या, 28 मे रोजी पाच फेर्‍या आणि 29 मे रोजी तीन फेर्‍या रद्द करण्यात आल्या. गर्दीच्या वेळेला एखादी लोकल रद्द झाली, तर तिचा ताण पुढच्या लोकलवर पडतो. त्यामुळे एकाच लोकलमध्ये दोन लोकलचे प्रवासी प्रवास करतात. परिणामी गर्दीत लोकलमधून पडून अपघाताची शक्यता वाढते. उन्हाळ्यात अनेक मोटरमन सुट्टीवर जात असतात. जे मोटरमन काम करत असतात ते ओव्हरटाईम करण्यास नकार देतात. त्यामुळेच मोटरमनच्या कमतरतेमुळेच अनेकदा लोकल फेर्‍या रद्द केल्या जात असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे याचा मोठा फटका मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसत आहे. येत्या काळात मोटरमनची रिक्त पदे न भरल्यास मध्य रेल्वेच्या प्रवाशांना याच जीवघेण्या गर्दीत प्रवास करावा लागणार आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Central Railway : मध्य रेल्वेच्या 5 लाख चौ.मी. जमिनीवर 16 हजार झोपड्यांचा विळखा; वांद्रे कारवाईनंतर रेल्वेच्या हलगर्जीपणावर मोठे प्रश्नचिन्ह!
मध्य रेल्वेच्या 5 लाख चौ.मी. जमिनीवर 16 हजार झोपड्यांचा विळखा; वांद्रे कारवाईनंतर रेल्वेच्या हलगर्जीपणावर मोठे प्रश्नचिन्ह!
आम्ही दोघेही प्रभावीपणे कार्य करू; अन्न व औषध प्रशासनचा पदभार स्वीकारताच नरहरी झिरवाळांना भेटले तुकाराम मुंढे
आम्ही दोघेही प्रभावीपणे कार्य करू; अन्न व औषध प्रशासनचा पदभार स्वीकारताच नरहरी झिरवाळांना भेटले तुकाराम मुंढे
मंत्रीमंडळानं घेतला शेतकऱ्यांच्या एकजुटीचा धसका, कांदाप्रश्नी आज तोडगा निघाला तर ठिक नाहीतर...रोहित पवारांचा सरकारला इशारा
मंत्रीमंडळानं घेतला शेतकऱ्यांच्या एकजुटीचा धसका, कांदाप्रश्नी आज तोडगा निघाला तर ठिक नाहीतर...रोहित पवारांचा सरकारला इशारा
मला फोनवरुन धमक्या, रुपाली चाकणकरांचा रोल करू नका; अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा खळबळजनक दावा
मला फोनवरुन धमक्या, रुपाली चाकणकरांचा रोल करू नका; अभिनेत्री दिपाली सय्यद यांचा खळबळजनक दावा

व्हिडीओ

BMC Sudhar Samiti Special Report : मध्यरात्रीच्या घडामोडी, शिंदेंवर कुरघोडी? | ABP Majha
Vidhanparishad Election Special Report : अंतिम जागावाटपावर तिन्ही पक्षाचं समाधान कधी? | ABP Majha
NCP Meeting Special Report : आव्हानांचा चक्रव्यूह सुनेत्रा पवार कसा भेदणार? | ABP Majha
Ashok Kharat Movie Special Report : खरात फाईल्स मोठ्या पडद्यावर! | ABP Majha
Amit Deshmukh On Petrol Diesel Crisis : इंधन तुटवड्याच्या प्रश्नावर काय बोलावे हे सरकारकडून शिकावं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Beed Crime : संतापजनक! केजमध्ये अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीची हेळसांड, आरोग्य तपासणीसाठी दहा तास, तर गुन्हा दाखल होण्यासाठी स्टेशनमध्ये रात्र गेली
संतापजनक! केजमध्ये अत्याचारग्रस्त अल्पवयीन मुलीची हेळसांड, आरोग्य तपासणीसाठी दहा तास, तर गुन्हा दाखल होण्यासाठी स्टेशनमध्ये रात्र गेली
Share Market Today: राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
राजधानी दिल्लीपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या तैवानच्या शेअर बाजाराचा भारताला हादरा; तैवान गुंतवणूकदारांसाठी पहिली पसंती
Rupee vs Yuan : डॉलरनंतर आता चिनी 'युआन'समोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; आयात महागणार, महागाई वाढण्याची शक्यता
डॉलरनंतर आता चिनी 'युआन'समोर रुपयाची ऐतिहासिक घसरण; आयात महागणार, महागाई वाढण्याची शक्यता
सत्ता जाताच पक्षावरील 'ममता' आटू लागली! तृणमूल खासदाराचा पक्षातील सर्व पदांचा राजीनामा, 100 नगरसेवकांच्या राजीनाम्याची सुद्धा चर्चा
सत्ता जाताच पक्षावरील 'ममता' आटू लागली! तृणमूल खासदाराचा पक्षातील सर्व पदांचा राजीनामा, 100 नगरसेवकांच्या राजीनाम्याची सुद्धा चर्चा
Vaibhav Sooryavanshi: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!
Video: जगातील सर्वात वेगवान शतकाचा मान हुकला, वैभव सूर्यवंशीच्या विकेटने अभिमानाचा हुंदका दाटला!
DK Shivakumar: संकटमोचक डीकेंची कर्नाटकात स्वप्नपूर्ती होत असतानाच सीएम सिद्धरामय्यांच्या फक्त तीन शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
संकटमोचक डीकेंची कर्नाटकात स्वप्नपूर्ती होत असतानाच सीएम सिद्धरामय्यांच्या फक्त तीन शब्दातील प्रतिक्रियेनं भूवया उंचावल्या
मुंबईत चोरलेले सोने काश्मिरच्या डोंगरात लपवलं; कांदिवली पोलिसांनी चोरट्यांना पाक सीमेवरून उचललं
मुंबईत चोरलेले सोने काश्मिरच्या डोंगरात लपवलं; कांदिवली पोलिसांनी चोरट्यांना पाक सीमेवरून उचललं
Iran War Live Update: ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...
ट्रम्पकडून दावे सुरुच असताना इराणकडून शांतता करारावर मोठा दावा; तिकडं लेबनाॅनमध्ये इस्त्रायली नरसंहार सुरुच, गेल्या 24 तासांतील 4 मोठ्या घडामोडी...
Embed widget