Sachin Sawant Arrested by ED: भ्रष्टाचार प्रकरणी ईडीकडून वरिष्ठ IRS अधिकारी सचिन सावंत यांना अटक
Sachin Sawant Arrested by ED: सीमाशुल्क आणि जीएसटीचे अतिरिक्त संचालक सचिन सावंत यांना 500 कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
ED raids on senior IRS officer Sachin Sawant: ज्येष्ठ आयआरएस अधिकारी (Senior IRS Officer) आणि ईडीचे माजील कर्मचारी सचिन सावंत (Sachin Sawant) यांच्या घरावर ईडीनं (ED Raids) छापेमारी केली आहे. छापेमारीनंतर ईडीकडून सचिन सावंत यांना अटकही करण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत राजकीय नेते, मोठमोठे अधिकारी ईडीच्या रडारवर होते. त्यांच्या मालमत्तांवर ईडीकडून छापेमारी केली जात होती. पण आता ईडीचेच माजी कर्मचारीही ईडीच्या रडावर आल्याचं दिसून येत आहे.
सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत असलेल्या सचिन सावंत (Former ED employee Sachin Sawant) यांच्या मुंबईतील (Mumbai News) निवासस्थानावर ईडीकडून मंगळवारी छापा टाकण्यात आला. भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. काल मध्यरात्रीपर्यंत सावंत यांच्या घरी ईडीचा तपास सुरू होता. 500 कोटी रुपये बेकायदेशीररित्या वळवल्याच्या एका प्रकरणातील आरोपीनं सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावरून सीबीआयनं (CBI) एफआयआर (FIR) दाखल केली. आणि याच प्रकरणी काल ईडीनं (ED) छापेमारी केली होती.
मंगळवारी ईडीनं वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यांच्या घरावर धाड टाकली होती. सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात कार्यरत असलेल्या सचिन सावंत यांच्या मुंबईतील निवासस्थानावर ही छापेमारी करण्यात आली होती. भ्रष्टाचार आणि बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ईडीकडून छापेमारी करण्यात आली होती. यासोबतच याचप्रकरणी ईडीनं सचिन सावंत यांच्या नातेवाईकांच्या घराचीही झाडाझडती घेतली.
प्रकरण नेमकं काय?
वरिष्ठ आयआरएस अधिकारी सचिन सावंत यापूर्वी ईडी मुंबई झोन 2 मध्ये उपसंचालक म्हणून कार्यरत होते. काही हिरे कंपन्यांद्वारे 500 कोटी रुपये बेकायदेशीरपणे वळवल्या प्रकरणी ED मध्ये असताना त्यांनी चौकशी केली होती. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या एका आरोपीनं सावंत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) नं सचिन सावंत यांच्या विरोधात प्रथम माहिती अहवाल (FIR) ची नोंद केली होती. सध्या सावंत यांच्याकडे सीमाशुल्क आणि अप्रत्यक्ष कर विभागात अतिरिक्त आयुक्त पद आहे.