एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सीडीआर प्रकरण : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वकिलांना अटक
अभिनेता नवाजुद्दीन सिदिक्कीच्या सीडीआरप्रकरणी ठाणे क्राईम ब्रँचनं नवाजुद्दीनचे वकील रिजवान सिदिक्की यांना अटक केली आहे. वकिलांच्या चौकशीसाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
ठाणे : अभिनेता नवाजुद्दीन सिदिक्कीच्या सीडीआरप्रकरणी ठाणे क्राईम ब्रँचनं नवाजुद्दीनचे वकील रिजवान सिदिक्की यांना अटक केली आहे. वकिलांच्या चौकशीसाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
पत्नीचे कॉन्टॅक्ट्स आणि ती कुठे आहे यावर नजर ठेवण्यासाठी खाजगी गुप्तहेराच्या माध्यमातून नवाजुद्दीनने सीडीआर मागवल्याचा आरोप आहे. याआधीच ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेनं रिजवान यांना समन्स बजावलं होतं.
बेकायदेशीर सीडीआर प्रकरणात नवाजुद्दीन सिद्दिकी यांचे वकील रिजवान सिद्दिकीला यांना मुंबईतील वर्सोवाच्या कार्यालयातून क्राईम ब्रँचकडून अटक करण्यात आली आहे. रिजवान सिद्दिकी या वकिलाने नवाजुद्दीन सिद्दिकी यांच्या पत्नीचे कॉल रेकॉर्ड्स मागवले होते. याप्रकरणी नवाजुद्दीनसह त्याच्या वकिलांना वारंवार ठाणे पोलिसांकडून समन्स पाठवण्यात आलं होतं. मात्र तरीही ते कोर्टासमोर हजर न झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे .
या प्रकरणातील अटकेत असलेले आरोपी मकवाना, सीडीआर पुरवणारा अजिंक्य नागरगोजे यांच्याकड़े चौकशी केली असता बॉलिवूड अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी व त्याचे वकील रिजवान सिद्दीकी यांचं नाव समोर आलं होतं. 23 फेब्रुवारीला ठाणे पोलीस उपायुक्तांनी माझा जवाब नोंदवला होता, मात्र माझा जवाब नोंदवला नसल्याचं सांगत 41A ची नोटीस न देता मला इथे आणल्याचे नवाजुद्दीन सिद्दीकी यांचे वकील रिझवान सिद्धीकी यांनी म्हटलं आहे.
सीडीआर प्रकरणी आतापर्यंत खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांच्यासह 11 जणांना अटक करण्यात आली होती. सीडीआर लीक प्रकरणात अटकेत असलेले आरोपी पोलिसांकडून सीडीआर खरेदी करुन विक्री करत होते. यामध्ये इतर राज्यातील पोलिसांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
संबंधित बातम्या :
ठाण्यातील सीडीआर प्रकरणात अभिनेता नवाझुद्दीन सिद्दीकीचं नाव
सीडीआर प्रकरण : खासगी गुप्तहेर रजनी पंडित यांना 11 तारखेपर्यंत पोलीस कोठडी
CDR लीक प्रकरण : व्हीआयपी नंबर समोर, ब्लॅकमेलिंगचा संशय
CDR लीक प्रकरण : व्होडाफोनसह 7 मोबाईल कंपन्या चौकशीच्या घेऱ्यात
कॉल डिटेल्स रेकॉर्डिंग लीक प्रकरणी महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक
महिला खाजगी गुप्तहेर रजनी पंडित यांना अटक
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement