नेहल, भन्साळी आणि मिस्त्री हे परदेशात पसार झाले असून त्यांना याप्रकरणी समन्स बजावण्यात आले आहे. नीरव मोदीने नेहलला दुबाईला पाठवून पुरावे नष्ट करण्याचे काम दिले होते. दुबई आणि कैरोमधील बोगस कंपन्यांमार्फत बँकेची आर्थिक फसवणुक केल्याचा आरोप सीबीआयने ठेवला आहे. तसेच दुबई आणि हाँगकाँगमधील अन्य काही कंपन्यांच्या संचालकांना धमकावल्याचा आरोपही यामध्ये लावलेला आहे. बँकेतून जारी केलेल्या कागदपत्रांवरून परदेशातील काही मालमत्ता आरोपींनी नष्ट केली आहे, असं यामध्ये म्हटलं आहे.
पंजाब नॅशनल बँकेला सुमारे 13, 400 कोटींना गंडा घालून मेहुल चोक्सी आणि घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला त्याचा भाचा नीरव मोदी आपल्या कुटुंबकबिल्यासह देशातून पसार झालेले आहेत. यांच्या विरोधात ईडीनं पीएमएल कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. तसेच सीबीआयदेखील यांच्या मागावर आहे. वारंवार चौकशीचे समन्स बजावूनही हे आरोपी भारतात येऊन कोर्टापुढे आणि तपासयंत्रणेपुढे हजर होण्यास तयार नाहीत. त्यामुळे अखेरीस तपासयंत्रणेनं साल २०१८ च्या फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार कारवाई सुरू करत जप्त केलेल्या सा-या संपत्तीवर टांच आणण्याची प्रक्रिया तपासयंत्रणेनं सुरू केली आहे. जेणेकरून त्यांची आर्थिक नाकाबंदी करणं शक्य होईल.
संबंधित बातम्या
पीएनबी घोटाळा : मेहुल चोक्सीविरोधात आणखी एक अजामीनपात्र वॉरंट
मी भारतात येऊ शकत नाही, ईडीनं अँटिग्वात येऊन माझी चौकशी करावी, मेहुल चोक्सीचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र
सरकारला झटका, मेहुल चोकसीने भारतीय नागरिकत्व सोडलं!