नवी दिल्ली : साडेतेरा हजार कोटी रुपयांच्या पीएनबी बँक घोटाळ्यात भारत सरकारला मोठा झटका बसला आहे. घोटाळ्याचा प्रमुख आरोपी मेहुल चोकसीने भारतीय नागरिकत्व सोडलं आहे. चोकसीने आपला भारतीय पासपोर्ट अँटिग्वा उच्च आयोगात जमा केलं आहे. याचाच अर्थ आता चोकसीला भारतात आणणं आणखी कठीण झालं आहे.


मेहुल चोकसीने पासपोर्ट नंबर झेड 3396732 कॅन्सल्ड बुकसोबत जमा केला आहे. नागरिकत्व सोडण्यासाठी चोकसीने 177 अमेरिकन डॉलरचा डीडीही जमा केला आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव अमित नारंग यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला याची माहिती दिली. नागरिकत्व सोडण्याच्या अर्जावर चोकसीने त्याचा नवा पत्ता जॉली हार्बर सेंट मार्कस अँटिग्वा, असा लिहिला आहे. "मी नियमानुसार अँटिग्वाचं नागरिकत्व स्वीकारलं असून भारताचं नागरिकत्व सोडलं आहे," असं चोकसीन उच्च आयोगाला सांगितलं आहे.

प्रत्यार्पणाच्या कारवाईपासून वाचण्यासाठी मेहुल चोकसीने भारतीय नागरिकत्व सोडलं आहे. याबाबत अँटिग्वा कोर्टात 22 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने परराष्ट्र मंत्रालय आणि तपास यंत्रणांकडे या प्रकरणाचा प्रगती अहवाल मागितला आहे.

कोण आहे मेहुल चोकसी?

मेहुल चोकसी हा गीतांजली जेम्स कंपनीचा मालक आहे.

गीतांजली जेम्स ही कंपनी जगभरात हिरे निर्यात करते.

देशात गीतांजली जेम्सचे अनेक शो रुम होते.

मेहुल चोकसी हा आणखी एक आरोपी नीरव मोदीचा मामा आहे.

मेहुल चोकसी-नीरव मोदी पीएनबी घोटाळ्याचे आरोपी आहेत.

घोटाळ्यानंतर दोघेही देश सोडून फरार झाले आहेत.

मेहुल चोकसी सध्या अँटिग्वामध्ये राहत आहे.

काय आहे घोटाळा?

- फेब्रुवारी 2018 में पीएनबी घोटाळा उघड झाला होता.

- पीएनबी घोटाळ्यात 13 हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा गैरव्यवहार झाला होता

- नीरव आणि मेहुलने लेटर ऑफ अंडरटेकिंग्जद्वारे बँकांमधून पैसा घेऊन परदेशात ट्रान्सफर केला होता.

- पीएनबीचे काही कर्मचाऱ्यांना कथितरित्या नीरव मोदीच्या कंपन्यांना लेटर ऑफ अंडरटेकिंग्ज (LoU) जारी केले होते.

- हे लेटर ऑफ अंडरटेकिंग्ज एकप्रकारची क्रेडिट नोट होती

- मेहुलने गीतांजली कंपनीद्वारे हजारो कोटी रुपयांची रक्कम इटली, जपान, थायलंड, अमेरिका, यूएई, यूके आणि बेल्जिअममध्ये पाठवली होती.

- चोकसीने हाँगकाँगमध्ये 6, दुबईत 9 डमी कंपन्या बनवल्या होत्या.

- या कंपन्यांचा काम केवळ पैसे इथून तिथे पाठवणं हेच होतं.

यापुढे LoU आणि LoCs जारी करण्यास बँकांना बंदी!

PNB घोटाळा : लेटर ऑफ अंडरटेकिंग म्हणजे काय?

फरारांच्या मुसक्या आवळण्यासाठी नव्या कायद्याची तरतूद

पीएनबी घोटाळा : मेहुल चोकसीची आणखी 1217 कोटींची मालमत्ता जप्त