एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गाडी टो केल्याने वाद, वाहतूक पोलिसांना धक्काबुक्की
उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरातला हा सगळा प्रकार टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी मोबाईलमध्ये शूट केला.
मुंबई: गाडी टो करण्याच्या वादातून दोन तरुणांनी वाहतूक पोलिसाला शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. याप्रकरणी दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.
उल्हासनगर रेल्वे स्थानक परिसरातला हा सगळा प्रकार टोईंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी मोबाईलमध्ये शूट केला.
काल संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास उल्हासनगर स्टेशनच्या पूर्व भागात वाहतूक कोंडी झाल्यानं, टोईंग व्हॅनने अनधिकृतपणे पार्क केलेल्या गाड्या अनाऊन्समेंट करून उचलायला सुरुवात केली. मात्र यावेळी विशाल आढाव आणि गणेश लष्करे या दोन तरुणांनी त्यांची उचललेली गाडी जबरदस्तीने ओढून खाली घेतली.
यावेळी टोईंग व्हॅनवर उपस्थित सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सूळ यांनी गाडीला जॅमर लावण्याचा प्रयत्न केला, मात्र याचा राग आल्यानं या दोघांनी सूळ यांच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ केली. तसंच आत्ता तुझी वाट लावतो, तुमची औकात काय आहे? अशी अपमानजनक वक्तव्य केली.
यानंतर वाहतूक पोलिसांनी विठ्ठलवाडी पोलिसांना पाचारण करत या दोघांना ताब्यात घेतलं. या दोघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारानं पोलिसांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
सिंधुदुर्ग
Advertisement