एक्स्प्लोर
मुंबई विमानतळासमोर बर्निंग कारचा थरार, चालती कार पेटली

मुंबई : मुंबईतील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. एअरपोर्टसमोरील उड्डाणपुलावर ह्युंडाई आय-20 या कारला आग लागल्याने काही वेळासाठी वाहतूक थांबवण्यात आली होती. दुपारी पावणे चारच्या सुमारास ही घटना घडली. अचानक लागलेल्या या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. गाडीतील सर्वजण सुरक्षित आहेत, मात्र गाडी जळून खाक झाली. कारला अचानक आग लागल्याने उड्डाणपुलावर एका बाजुच्या वाहतुकीचा काही काळासाठी खोळंबा झाला होता. मात्र कारची आग विझवल्यानंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. पाहा व्हिडिओ :
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
पालघर
व्यापार-उद्योग
विश्व
मुंबई























