एक्स्प्लोर

मेगाभरतीचा पुनर्विचार करता येईल का? हायकोर्टाची विचारणा

सध्या अनेक उच्चशिक्षित तरूण बेरोजगार आहेत. हे सर्वजण या भरती प्रक्रियेत अर्ज करतील आणि उद्या पुन्हा न्यायालयीन प्रक्रियेत जर का हे आरक्षण अडकलं तर काय? तेव्हा योग्य तो समतोल राखणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, असं मुख्य न्यायमूर्तींनी सुनावलं.

मुंबई : राज्य सरकारने घोषणा केलेल्या 72 हजार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मेगा नोकर भरतीची घाई कशाला?, असा सवाल करत हायकोर्टानं यासंदर्भात पुढील सुनावणीला राज्य सरकारला भुमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. या मेगा भरतीत मराठा समाजासाठी जागा आरक्षित केल्या आहेत. प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाही सरकारने मराठा समाजाला नोकर भरतीत आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे हायकोर्टाने आपली नाराजी व्यक्त केली.

सरकारला मेगाभरतीची घाई का? शासनाला याबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी आणखी काही दिवस थांबता येत नाही का? असं खडसावत हायकोर्टाने याप्रकरणी सरकारला जाब विचारला. एवढेच नव्हे तर या मेगा भरतीबाबत पुनर्विचार करता येईल का? असा सवालही केला. सध्या अनेक उच्चशिक्षित तरूण बेरोजगार आहेत. हे सर्वजण या भरती प्रक्रियेत अर्ज करतील आणि उद्या पुन्हा न्यायालयीन प्रक्रियेत जर का हे आरक्षण अडकलं तर काय? तेव्हा योग्य तो समतोल राखणं ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, असं मुख्य न्यायमूर्तींनी सुनावलं. 19 डिसेंबरला होणाऱ्या पुढील सुनावणीच्यावेळी यावर राज्य सरकारची भूमिका स्पष्ट करू, अशी हमी विशेष सरकारी वकिलांनी हायकोर्टाला दिली.

मराठा आरक्षणासंदर्भातील जुन्या आणि नव्या समर्थनार्थ आणि विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर हायकोर्टात मुख्य न्यायामूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरू आहे. राज्य सरकारनं जाहीर केलेल्या मराठा आरक्षणाला आव्हान देत सध्या तीन याचिका हायकोर्टात दाखल झाल्या आहेत. या याचिकाकर्त्यांच्यावतीनं जेष्ठ वकील आणि माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी 'राज्य सरकार मागास प्रवर्ग आयोगाचा अहवाल जाहीर का करत नाही?' असा सवाल उपस्थित केला.

माहिती अधिकाराअंतर्गत अर्ज करूनही राज्य सरकार दाद देत नसल्याचं अणेंनी कोर्टाला सांगितलं. सार्वजनिक नाही तर निदान याचिकाकर्ते या नात्यानं आम्हाला तरी हा अहवाल पुरवण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात यावेत, अशी मागणी अणेंनी हायकोर्टाकडे केली. पुढील सुनावणीच्यावेळी यावरही आपली भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत.

आरक्षण मिळविण्यासाठी राज्यभरात मराठा बांधवांकडून काढण्यात आलेले 58 मोर्चे व 42 मराठा बांधवांच्या बलिदानानंतर राज्य सरकारने मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचे जाहीर केले. विधानसभेत नुकतेच यासंदर्भातील विधेयकही संमत करण्यात आले. मात्र राज्य सरकारने कायद्यात दुरुस्ती करून मराठा समाजाला दिलेले आरक्षण हे घटनाबाह्य आहे. त्यामुळे हे आरक्षण रद्द करण्यात यावे यामागणीसाठी डॉ. जयश्री पाटील यांच्या वतीने अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

सरकारने राज्यभरात 72 हजार पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली असून त्यामध्ये मराठा समाजासाठी एसईबीसी प्रवर्गाअंतर्गत जागा आरक्षित केली आहे. मुळात मराठा आरक्षणासंदर्भात कोर्टात सुनावणी प्रलंबित असताना राज्य सरकारकडून चुकीच्या पद्धतीने नोकरभरती होत असल्याचे याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने युक्तीवाद करताना ज्येष्ठ वकील व्ही. ए. थोरात यांनी कोर्टाला सांगितले की, केवळ जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून नोकरभरतीसाठी जुलै 2019 मध्ये परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यापुढील प्रक्रियेसाठी आणखी सहा महिन्यांचा अवधी जाणार आहे, अशी माहिती दिली.

मुळात राज्य सरकारला 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण जाहीर करता येत नाही. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाला आव्हान देत संजीत शुक्ला यांनी यापूर्वीच कोर्टात याचिका दाखल केली आहे. तर एखाद्या विशिष्ट समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाच्या आधारावर देण्यात आलेले आरक्षण हे घटनाबाह्य असल्याचा युक्तीवाद ज्येष्ठ वकील श्रीहरी अणे यांनी सोमवारी केला.

महत्त्वाच्या बातम्या

Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
Maharashtra Weather: राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
राज्यभरात पावसाची क्षणभर विश्रांती, 15 ऑगस्टनंतर पुन्हा जोर वाढणार; 'एल निनो'चा प्रभाव वाढण्याची शक्यता; हवामान अभ्यासकांचा अंदाज काय?
Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Tukaram Mundhe VIDEO : ज्या महिलांकडून सत्कार, त्यांच्याकडूनच विनयभंगाची तक्रार, स्वतःचे कपडे फाडून घेण्याचा डाव; तुकाराम मुंढेंनी सागितला धक्कादायक किस्सा
ज्या महिलांकडून सत्कार, त्यांच्याकडूनच विनयभंगाची तक्रार, स्वतःचे कपडे फाडून घेण्याचा डाव; तुकाराम मुंढेंनी सागितला धक्कादायक किस्सा

व्हिडीओ

Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sinhagad Fort Closed : मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
मुसळधार पावसामुळे वीकेंडला सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद; हवामान विभागाचा पुणे जिल्ह्याला 'रेड अलर्ट'
Real estate house possession RERA: नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
नव्या घराच्या पझेशनची वाट पाहणाऱ्यांसाठी मोठी बातमी, चार महिन्यांचा उशीर होणार, केंद्र सरकारचा महत्त्वाचा आदेश
Sharad Pawar :मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली, पक्षाच्या युवकांचा सेनापती बदलला, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नव्या नेतृत्वाला संधी
Tukaram Mundhe : तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
तुम्ही प्रोटिन म्हणून खाताय त्या पनीरमध्ये फॅट? पनीर शुद्ध की भेसळयुक्त कसं ओळखायचं? तुकाराम मुंढेंनी सांगितला सोपा फॉर्म्युला
Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
अजिंक्य रहाणेच्या निवृत्तीने केकेआरमध्ये नेतृत्वाची पोकळी, नव्या कॅप्टनसाठी तीन नावे समोर! किंग खान कोणाला मान देणार?
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Maharashtra Live blog updates: सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज पावसाचा यलो अलर्ट, तिलारी धरण भरलं
Indian Boxers News : भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
भारतीय बॉक्सिंगच्या इतिहासातली सुवर्णरात्र! एक-दोन नव्हे, थेट जिंकली 7 सुवर्णपदकं; रिंगमध्ये नेमकं काय घडलं? संपूर्ण जग झालं थक्क
Arvind Kejriwal: E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
E-20 पेट्रोलविरोधात अरविंद केजरीवालांचा एल्गार; सरकारकडे तीन मागण्या अन् थेट पीएम मोदींच्या निवासस्थानापर्यंत 4 ऑगस्टला किती लोकांचा मोर्चा नेणार हे सुद्धा सांगितलं
Embed widget