एक्स्प्लोर

विधानपरिषद पोटनिवडणुकीत राणेंच्या मदतीला अदृश्य हात?

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे. त्याआधी ही निवडणूक होते आहे. त्यामुळे नारायण राणे यांचं भवितव्य यावर अवलंबून आहे. स्वतःचा पक्ष स्थापन झाल्यावर नारायण राणे यांची ही पहिली परीक्षा आहे.

मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. 7 डिसेंबरला ही निवडणूक होत आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लांबला आहे. त्याआधी ही निवडणूक होते आहे. त्यामुळे नारायण राणे यांचं भवितव्य यावर अवलंबून आहे. स्वतःचा पक्ष स्थापन झाल्यावर नारायण राणे यांची ही पहिली परीक्षा आहे. आधी शिवसेना, मग काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या नारायण राणेंनी भाजपचे दारही ठोठावण्याचा प्रयत्न केला. मात्र तिथेही प्रतिसाद न मिळाल्याने स्वत:चा पक्ष स्थापन केला. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थान केल्यावर ते एनडीएमध्येही सहभागी झाले. यानंतर राणेंची भाजप सरकारमध्ये वर्णी लागेल, अशीही चर्चा सुरु आहे. पण मंत्रिमंडळ विस्ताराबाबत अजूनही चित्र स्पष्ट होत नसताना नारायण राणे यांच्या जागेवर पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीसाठी 7 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत नारायण राणे उभे राहणार का? ते उभे राहिले तर निवडणूक चुरशीची असेल, पण त्याचवेळी राणे यांना दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विधानसभेतील पक्षीय बलाबल : भाजप - 122 शिवसेना - 63 काँग्रेस - 42 राष्ट्रवादी काँग्रेस - 41 इतर - 20 भाजपची मतं राणेंच्या पारड्यात? भाजपची 122 मते राणेंच्या पाठीशी निश्चित असल्याचं मानलं जात आहेत. तर अन्य 20 मतंही राणेंना सहकार्य करतील असं मानलं, तर ही संख्या 142 (122+20) वर जाते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेची निर्णायक मतं  या घडीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मिळून 83 इतकं संख्याबळ होते. त्याला शिवसेनेच्या 63 आमदारांची रसद जोडल्यास ते संख्याबळ 146 (83+63) पर्यंत जातं. अदृश्य हात मदतीला धावतील? नुकत्याच झालेल्या राष्ट्रपती निवडणुकीत महाराष्ट्रात मते फुटली होती. भाजपच्या मदतीला अदृश्य हात आले होते. ते हात यावेळी नारायण राणे यांच्यासाठी पुढे येतील का हा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. सुनील तटकरे काय म्हणाले? काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते एकत्र बसून, यावर चर्चा करतील आणि भूमिक ठरवतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. शिवाय, शिवसेनेने आता सत्तेसोबत की सत्तेशिवाय, यावर निर्णय घेण्याची वेळ आली असल्याचे त्यांनी म्हटले. नितेश राणे आणि कोळंबकरांची मतं राणेंना? दरम्यान, नारायण राणेंचे पुत्र आमदार नितेश राणे आणि कट्टर समर्थक कालिदास कोळंबकर अशी दोन मते राणेंच्या पारड्यात पडण्याची शक्यता अधिक आहे.  काँग्रेस, सेना राणेंच्या विरोधात, राष्ट्रवादीच्या भूमिकेला महत्त्व नारायण राणे यांचा मंत्रिमंडळात प्रवेश होऊ नये म्हणून शिवसेनेनं आधीच ताठर भूमिका घेतली आहे. नारायण राणे यांनी काँग्रेस सोडताना अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस तरी राणे विरोधात जोर लावणार, असं असताना राष्ट्रवादी पक्षाची भूमिका महत्त्वाची ठरते. राष्ट्रवादी काँग्रेसकडे नेहमीच संशयाने पाहिले जाते. सध्या तरी या जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा सुरु आहे. राजकारणात राणेंचे मित्र कमी, शत्रू जास्त  राजकारणात नारायण राणे यांनी मित्र कमी शत्रू जास्त बनवले आहेत. त्यामुळे नारायण राणे जर ही निवडणूक लढवणार असतील तर त्यांच्या विरोधातील सगळेच शत्रू एकत्र यायची शक्यता नाकारता येत नाही. राणेंना दगाफटका होण्याची शक्यता भाजपच्या गोटातही नारायण राणे यांच्या बाबत फारसं ममत्व नाही. त्यामुळे नारायण राणे यांनी ही निवडणूक लढवली तर दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 2014 विधानसभा निवडणूक, त्यानंतर वांद्रे पोटनिवडणूक या दोन निवडणुकीत पराभवाला समोर गेलेल्या नारायण राणे तिसऱ्यांदा पुन्हा अशा अटीतटीच्या निवडणुकीला सामोरं जातील का, त्यांना कुणकुणाची साथ मिळेल? या निवडणुकीच्या निमित्ताने काय राजकीय डाव खेळले जातील याकडे आता सगळ्याच लक्ष लागून आहे.

संबंधित बातमी : राणेंच्या रिक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी 7 डिसेंबरला पोटनिवडणूक

 

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Audio Clip Marathi News: 500 कोटींचा बॉम्ब, श्रीकांत शिंदेंचं नाव; मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे?
500 कोटींचा बॉम्ब, श्रीकांत शिंदेंचं नाव; मनोज जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे?
Mumbai Air Quality Marathi News: मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर; हवेची गुणवत्ता खालावली, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर; हवेची गुणवत्ता खालावली, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
Mumbai Water Shortage: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
Maharashtra Live News Updates: मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर
Maharashtra Live News Updates: मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर

व्हिडीओ

Manoj Jarange News : एकनाथ शिंदेंचा कुठला नेता कुठे जातो, कुठे पैसे जातात, हे सगळं माहितीय
Manoj Jarange: 500 कोटींचा बॉम्ब, आता मनोज जरांगेंनी ऐकवली राज्याला हादरवणारी ऑडिओ क्लिप, पाहा संपूर्ण VIDEO
Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
एकाच झटक्यात तब्बल 5000 कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं, 'या' बड्या बँकेचा मोठा निर्णय, नेमकं कारण काय?
IND vs NZ : न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
न्यूझीलंडविरुद्ध गंभीर-अय्यरचे पोरकट निर्णय, ऐनवेळी नमन धीर चमकल्याने टीम इंडियाच्या जीवात जीव!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑक्टोबर 2026 | गुरुवार
कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई 
कराळे मास्तरांची शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून 6 वर्षांसाठी हकालपट्टी, पक्ष शिस्तीचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई 
मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, तीन मुलांचं पितृछत्र हरपलं, जळगावच्या जामनेर तालुक्यातील घटना 
मका काढण्याच्या मशीनमध्ये अडकून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू, तीन मुलांचं पितृछत्र हरपलं, जळगावच्या जामनेर तालुक्यातील घटना 
मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे? नरेश म्हस्केंनी धडाधड नावं घेतली!
मोठी बातमी : मनोज जरांगेंच्या ऑडिओ क्लिपमधील आवाज कुणाचे? नरेश म्हस्केंनी धडाधड नावं घेतली!
Ashish Shelar : एकनाथ शिंदेंबद्दल प्रश्न निर्माण करणं मान्य नाही, जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर भाजपची प्रतिक्रिया, शेलार म्हणाले, उदय सामंतांचा गैरसमज दूर करु
एकनाथ शिंदेंबाबत प्रश्न निर्माण करणं मान्य नाही, जरांगेंच्या ऑडिओ क्लिपवर भाजपची प्रतिक्रिया
Gold : दिवाळीपूर्वी सोने खरेदी करावं की दिवाळी नंतर, कधी मिळेल जास्त फायदा? जाणून घ्या
दिवाळीपूर्वी सोने खरेदी करावं की दिवाळी नंतर, कधी मिळेल जास्त फायदा? जाणून घ्या
Embed widget