एक्स्प्लोर
हेअर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर मुंबईत उद्योजकाचा मृत्यू
हेअर ट्रान्सप्लांट ट्रीटमेंटनंतर श्रवणकुमार यांच्या चेहऱ्यावर आणि घशावर सूज यायला लागली. त्यामुळे ते दवाखान्यात गेले, परंतु त्यावर काही इलाज झाला नाही. काही तासांतच त्यांच्यावर जीव गमावण्याची वेळ आली.

मुंबई : दाट केसांच्या इच्छेने मुंबईतील तरुण उद्योजकाचा घात केला. हेअर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर अवघ्या 50 तासांतच 43 वर्षीय श्रवणकुमार चौधरींचा मृत्यू झाला. श्रवणकुमार चौधरी मुंबईतील साकीनाका भागात राहत होते. काही लाख रुपये खर्च करुन चौधरींनी चिंचपोकळीतील एका खाजगी रुग्णालयात हेअर ट्रान्सप्लांट ट्रीटमेंट करुन घेतली. जवळपास 15 तास ही शस्त्रक्रिया सुरु होती. ट्रीटमेंटनंतर श्रवणकुमार यांच्या चेहऱ्यावर आणि घशावर सूज यायला लागली. त्यामुळे ते दवाखान्यात गेले, परंतु त्यावर काही इलाज झाला नाही. त्यामुळे काही तासांतच त्यांच्यावर जीव गमावण्याची वेळ आली. काय काळजी घ्याल? ही ट्रीटमेंट करताना देण्यात येणारे सलाईन, गोळ्या, औषधं याचा तुम्हाला कोणता साईड इफेक्ट तर होणार नाही ना? तुम्हाला कोणती अॅलर्जी तर नाही ना ? तुम्हाला कोणता आजार तर नाही ना ? याची खात्री करुन घेणं गरजेचं आहे. अशा ट्रीटमेंटमध्ये पेशण्टला विश्रांती घेणंही आवश्यक असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. आपल्याला टक्कल पडलेलं असताना केसांसाठी कितीही रुपये खर्च करणारे अनेक जण आहेत. मात्र, आपल्याला असलेला त्रास, समस्या न सांगता केलेली ही ट्रीटमेंट जीवावर बेतू शकते.
आणखी वाचा























