एक्स्प्लोर

मुंबईत पिक अवर्समध्ये अवजड वाहनांवरील बंदीला बस संघटनेचा विरोध

मुंबई शहरात खासगी बससेवा पुरवणाऱ्या बस चालक-मालकांनी 19 आणि 20 तारखेला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. अवजड वाहनांवरील बंदीबाबत चर्चा करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पोलिस आयुक्त पडसलगीकरांची भेट घेतली.

मुंबई : मुंबईत पिक अवरमध्ये अवजड वाहनांना बंदी करण्याच्या पोलिसांच्या निर्णयाला मुंबई बस मालक संघटनेनं विरोध दर्शवला आहे. मुंबई शहरात खासगी बससेवा पुरवणाऱ्या बस चालक-मालकांनी 19 आणि 20 तारखेला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. अवजड वाहनांवरील बंदीबाबत चर्चा करण्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज पोलिस आयुक्त पडसलगीकरांची भेट घेतली. “अवजड वाहनाबाबत मी फक्त सूचना केल्या होत्या, मात्र त्याच्या बंदीच्या अंमलबजावणी बाबत मला नाहीत नाही” असं भेटी दरम्यान पोलीस आयुक्तांनी मुंबई बस मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं. दरम्यान आम्ही ही बंदी लवकरात लवकर मागे घेऊ, असं आश्वासन पोलिस आयुक्त आणि वाहतूक विभागाचे सह आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितल्याच बस मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. मात्र ,जे आश्वासन दिलंय ते जोपर्यंत पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत आम्ही 19 आणि 20 तारखेच्या संपावरवर ठाम आहोत असंही खासगी बस संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. मुंबईत मेट्रोचं सुरु असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हेच लक्षात घेत मुंबईच्या वाहतूक शाखेकडून अवजड वाहनांवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईत सध्या ठिकठिकाणी मेट्रोचं काम सुरु आहे. त्यामुळे अनेक रस्ते बंद करण्यात आले आहेत. अवजड वाहनांची गर्दी आणि वाहनांमुळे होणारा ट्रॅफिक दिवसेंदिवस वाढत चालला आहे. म्हणूनच सध्या दक्षिण मुंबईत प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. अवजड वाहनांवरील बंदीसाठी एक विशिष्ट वेळ ठेवण्यात आली आहे. सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 10 या वेळेत दक्षिण मुंबईत अवजड वाहनांना प्रवेश नसेल. एसटी, बेस्ट बस, स्कूल बस, प्रायव्हेट कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांच्या बस, पाणी-दूध-भाज्यांसारख्या अत्यावश्यक सेवा किंवा पेट्रोल-डिझेलची वाहतूक करणारी वाहनं, रुग्णवाहिका, फायर ब्रिगेडच्या गाड्यांना यातून सूट देण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget