एक्स्प्लोर
मोबाईलच्या वादातून मोठ्या भावाची डोक्यात फावडा घालून हत्या
माहेरी गेलेल्या पत्नीला फोन करण्यासाठी मोठ्या भावाने घेतलेला मोबाईल लहान भावाने परत मागितला असता, त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला.

प्रातिनिधीक फोटो
भिवंडी : माहेरी गेलेल्या पत्नीला फोन करण्यासाठी मोठ्या भावाने घेतलेला मोबाईल लहान भावाने परत मागितला असता, त्यावरुन दोघांमध्ये वाद झाला. त्यावेळी संतापलेल्या लहान भावाने फावड्याने डोक्यात प्रहार करुन मोठ्या भावाची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना भिवंडी तालुक्यातील बासे गावात घडली आहे. दत्तात्रेय काळुराम पवार (वय 35 वर्षे) से हत्या झालेल्या मोठ्या भावाचे नाव आहे. तर संतोष पवार (वय 32 वर्षे) असे लहान भावाचे नाव असून त्याच्यावर मोठ्या भावाच्या हत्येप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे. मृतक दत्तात्रेय याची पत्नी माहेरी गेल्याने तिच्याशी बोलण्यासाठी आरोपी संतोषकडून त्याने मोबाईल घेतला होता. मात्र बराच उशीर झाल्याने सदरचा मोबाईल संतोष याने परत मागितला. त्यावेळी मोबाईल परत देण्यावरुन मृतक दत्तात्रेय व संतोष या दोघा भावांमध्ये वाद झाला झाला. या वादातून चिडलेल्या संतोष याने घराच्या कोपऱ्यात असलेला फावडा हातात घेऊन त्या फावड्याने दत्तात्रेय याच्यावर दणादण प्रहार केले. यातील एक फटका डोक्याच्या पाठीमागील भागात वर्मी लागल्याने दत्तात्रेय याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती महिला पोलीस पाटील वैभवी विनोद पालवी यांनी पडघा पोलीस ठाण्यास दिली असता पडघा पोलीस पथकासह घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. त्यानंतर या हत्येतील आरोपी संतोष पवार हा रात्री पळून जाण्याच्या तयारीत असताना त्याला पडघा पोलिसांनी सापळा लावून शिताफीने अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले असता, 17 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या खुनाच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस करीत आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















