एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Anil Jaisinghani : अमृता फडणवीसांना ब्लॅकमेल करणारा बुकी अनिल जयसिंघानीला जामीन मंजूर, साक्षीदारांना न धमकावण्याचे निर्देश

Anil Jaisinghani Bail : अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न अनिल जयसिंघानी याची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिने केल्याचा आरोप आहे. 

मुंबई: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्नी अमृता फडणवीसांकडून (Amruta Fadnavis) खंडणी वसुली प्रकरणी अटकेत असलेला मुख्य आरोपी बुकी अनिल जयसिंघानीला (Anil Jaisinghani) जामीन मंजूर करण्यात आला. मुंबई सत्र न्यायालयाने 50 हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला आहे. बुकी अनिल जयसिंघानी हा 20 मार्चपासून अटकेत होता. जयसिंघानीची मुलगी आणि भाऊ या सहआरोपींना यापूर्वीच जामीन मंजूर करण्यात आला आहे. 

खटल्याच्या प्रत्येक सुनावणीला हजेरी लावण्याचे आणि साक्षीदारांना न धमकावण्याचे निर्देश न्यायालयाने जयसिंघानीला दिले आहेत. अनिल जयसिंघानीवर मलबार हिल पोलीस ठाण्यात 20 फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंदवला होता. 

15 हजार कोटींचे फिक्सिंग नेटवर्क उघड

क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी याचे 15 हजार कोटींचे मॅच फिक्सिंग नेटवर्क पोलीस तपासात उघड झालं आहे. त्याच्यावर ईडीने (Directorate of Enforcement) मनी लॉंड्रिंगप्रकरणी गुन्हा नोंद करून कारवाई केली आहे. अमृता फडणवीस  यांना लाच देण्याचा प्रयत्न आणि ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न अनिल जयसिंघानी यांची मुलगी अनिक्षा जयसिंघानी हिने केला असल्याचा आरोप आहे. अमृता फडणवीस यांनी तक्रार नोंदवल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर अनिक्षा जयसिंघानीला अटक करण्यात आली होती. अनिक्षाने वडील जयसिंघानीवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्यासाठी लाच देऊ केली असल्याचा आरोप आहे. अनिक्षाला अटक करण्यात आल्यानंतर पोलिसांनी अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक केली. 

ईडीने 3.40 कोटींची संपत्ती जप्त केली 

या प्रकरणी अनिल जयसिंघानी याची 3.40 कोटी रुपयांची मालमत्ता ईडीकडून जप्त (Property Seized) करण्यात आली आहे. पीएमएलए (Prevention of Money Laundering Act) म्हणजे आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंध कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाशी संबंधित गुजरातमधील क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानीच्या मालकीची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.

जयसिंघानीची 3.40 कोटी किमतीची स्थावर मालमत्ता जप्त

ईडीने 9 जून रोजी जयसिंघानीच्या ओळखी असलेल्या परिसरात छापा टाकला. ईडीने आता जयसिंघानीची 3.40 कोटी किमतीची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे, ही जयसिंघानी यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. याव्यतिरिक्त, ईडीने 6 जून रोजी अहमदाबाद येथील विशेष पीएमएलए न्यायालयासमोर आरोपी जयसिंघानीविरुद्ध फिर्यादी तक्रार दाखल केली.

अनिल जयसिंघानीचं मॅचफिक्सिंग नेटवर्क उघडकीस

क्रिकेट बुकी अनिल जयसिंघानी याचे 15 हजार कोटींचे मॅच फिक्सिंग नेटवर्क याआधीच पोलीस तपासात उघड झालं आहे. या मॅच फिक्सिंग नेटवर्कमध्ये अनेक क्रिकेटपटू, आयपीएल फ्रँचाईसी (IPL), मालक आणि पोलिसांचा (Police) समावेश असल्याची चर्चा आहे. भ्रष्टाचार, ब्लॅकमेलिंग, मॅचफिक्सिंग आणि हवालाचे मोठे रॅकेट उघडकीस आले आहे. पाकिस्तान आणि दुबईतील क्रिकेट बेटिंग कार्टेलशी संबंध असल्याचे पोलीस तपासात समोर आलं आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Gokul Milk : निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ram Shinde Full PC : माझा पराभव हा नियोजित कट, त्यात अजित पवार सहभागी; राम शिंदेंचा आरोपCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 25 नोव्हेंबर  2024 :  ABP MajhaPM Narendra Modi Full Speech : संसदेच्या अधिवेशनाआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संबोधनSanjay Raut Full PC : ईव्हीएमसंदर्भात संजय राऊतांकडून शंका व्यक्त; म्हणाले आमच्याकडे  450 तक्रारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election Result 2024: लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
लाडक्या बहिणींच्या महाराष्ट्रात विजयी ठरलेल्या महिला आमदार किती? पहा संपूर्ण विजयी महिला उमेदवारांची यादी
Gokul Milk : निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Ajit Pawar Rohit Pawar meet : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Embed widget