एक्स्प्लोर

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून हायकोर्टात प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात

टास्क फोर्ससोबत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे तपशील सोमवारी हायकोर्टात सादर करू. महाधिवक्त्यांची हायकोर्टात माहिती, दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची शक्यता.

मुंबई : मुंबईसह राज्यात सुधारलेल्या कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून मुंबई उच्च न्यायालयानं ऑनलाईनसोबत प्रत्यक्ष सुनावणीही सुरू करण्याचं निश्चित केलंय. आठवड्याचे चार दिवस प्रत्येक कोर्टाच काम सुरू राहील. ज्यात तीन दिवस प्रत्यक्ष तर एक दिवस ऑनलाईन कामकाज चालेल. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील प्रशासकीय समितीनं हा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मुंबईसह हायकोर्टाच्या नागपूर, औरंगाबाद आणि गोवा खंडपीठालाही लागू राहील. तर कोरोनाच्या अधिक धोका असलेल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहमदनगर आणि बीडसह एकूण 11 जिल्ह्यांमधील कनिष्ट न्यायालय अर्धा दिवसच कार्यरत राहतील असं निश्चित करत अन्य जिल्ह्यातील न्यायालयांना पूर्ण दिवस काम करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

सध्या राज्य सरकारनं केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा दिली असून वकिलांसाठी तसेच लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल ट्रेनची परवानगी देण्यात यावी या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी राज्य सरकारनं गुरूवारी माहिती देताना सांगितलं की यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्सची बैठक होणार असून त्या बैठकीत लोकल प्रवासाचा निर्णय घेतला जाईल व तो सोमवारी हायकोर्टात सांगितला जाईल.

वकिलांना लोकल प्रवासाची मुभा द्यावी यासाठी वकिलांनीही मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली आहे. तसेच लसीचे दोन्ही डोस घेतलेल्याना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा द्या अशी मागणी करणारी जनहीत याचिका प्राध्यापक मोहन भिडे यांनीही दाखल केली आहे. या याचिकेवर गुरूवारी मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी राज्य सरकारच्यावतीनं महाधिवक्ता आशुतोष कुंभकोनी यांनी बाजू मांडताना खंडपीठाला सांगितले की, टास्क फोर्सची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार असून त्याबैठकीत दोन डोस घेतलेल्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देता येईल का याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तसेच उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीच्या बैठकित कोविड परिस्थिती व वकिलांच्या रेल्वे प्रवासाबाबत आढावा घेतला जाणार आहे. खंडपीठाने हा युक्तिवाद ऐकून घेत या प्रकरणावरील सुनावणी सोमवारपर्यंत तहकूब केली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Sharad Ponkshe and Babasaheb Ambedkar: 'मनुस्मृती वाचली असती तर...' माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर माफी मागतो: शरद पोंक्षे
'मनुस्मृती वाचली असती तर...' माझ्या वक्तव्यामुळे कोणी दुखावलं गेलं असेल तर माफी मागतो: शरद पोंक्षे
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Konkan Railway ratnagiri diva passenger: रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली, कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार
रत्नागिरी-दिवा पॅसेंजर दादरपर्यंत नेण्याची मागणी फेटाळली, कोकण रेल्वेचा मार्ग बदलणार

व्हिडीओ

Akola Police : अटकेतील महिलेकडे पोलीसाची शरीरसुखाची मागणी Special Report
Jain Muni on Tararani : ताराराणींचा अवमान, जैन मुनींमध्येच घमासान Special Report
Ashok Kharat on Fish Vegetarian : खरातचा चमत्कार म्हणे मासे 'शाकाहार' Special Report
Shashikant Shinde PC : अजितदादा प्रकरणात एफआयआरही होत नसेल तर महाराष्ट्राचं दुर्देव, शिंदेंचा संताप
Sanjay Raut PC | हा मराठा साम्राज्याचा अपमान, महाराणी ताराराणींच्या विधानावरून संजय राऊत आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime news: सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
सोलापूरमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना, वडिलांनी तीन चिमुकल्यांना विष पाजलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
Navi Mumbai : नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
नवी मुंबई महापालिका ठरली करवसुलीत अग्रेसर, 876 कोटींचा कर वसूल करत ऐतिहासिक कामगिरी
Latur Rain Update : लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
लातूरच्या रेणापूर तालुक्यात गारपीट आणि वादळी वाऱ्याचा तडाखा; शेतीचे मोठे नुकसान, रस्ते बंद..
Maharashtra Rain : महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा, कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा सुरुच, मराठावाडा,कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ते खान्देशात जोरदार पाऊस
Share Market : नव्या आर्थिक वर्षाची दणक्यात सुरुवात, शेअर बाजारात एका दिवसात गुंतवणूकदारांची 10 लाख कोटींची कमाई
नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी, शेअर बाजारात 10 लाख कोटींची कमाई
Donald Trump : इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले  
इराणच्या नव्या राजवटीच्या अध्यक्षांची शस्त्रसंधीची विनंती, डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, इराणनं ट्रम्प यांचे दावे फेटाळले
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 01 एप्रिल 2026 | बुधवार
Aditi Tatkare on Ashok Kharat case: राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
राजकारण्यांनी एकमेकांची बदनामी करु नये, अशोक खरात प्रकरण सगळ्यांसाठीच एक धडा: अदिती तटकरे
Embed widget