एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

सट्टेबाजी होत नसल्याचा निर्वाळा, ड्रीम इलेव्हन विरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली

‘ड्रीम इलेव्हन’ विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे.

मुंबई : मोबाईलवर क्रिकेट सामन्याआधी खेळण्यात येणाऱ्या ‘ड्रीम इलेव्हन’ या मोबाईल अॅपचा अथवा खेळाचा सट्टेबाजी तसेच जुगाराशी काहीही संबंध नाही, असा निर्वाळा देत ‘ड्रीम इलेव्हन’ विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. क्रिकेटचा सामना सुरु होण्याआधी मोबाईलवर ऑनलाईन खेळण्यात येणाऱ्या ‘ड्रीम इलेव्हन’ या ऑनलाईन गेमविरोधात मुंबई उच्च न्यायालयात गुरदित सच्चर यांनी जनहित याचिका दाखल केली होती. मोबाईलवर खेळण्यात येणारा हा खेळ सट्टेबाजी तसेच जुगाराला प्रोत्सासन देत आहे. तसेच ‘ड्रीम इलेव्हन’कडून कोणताही कर अथवा सेवा आणि वस्तू कर (जीएसटी) भरला जात नसल्याचा आरोपही याचिकेमार्फत करण्यात आला होता. या याचिकेवर न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. ड्रीम इलेव्हन हा एक ऑनलाईन गेम असून तो क्रिकेट सामना सुरु होण्याआधी खेळला जातो. यात खेळणाऱ्या प्रत्येकाला आपला स्वतःचा 11 जणांचा संघ निवडायचा असतो. ज्याची संघ निवड योग्य किंवा अचूक ठरते त्याला त्यातून पैसे मिळतात. त्यामुळे यात कोणत्याही प्रकारची सट्टेबाजी तसेच जुगार खेळला जात नाही, अशी बाजू ‘ड्रीम इलेव्हन’ने हायकोर्टात मांडली. तसेच हा एक खेळ असल्यामुळे यामध्ये कुठेही वस्तू अथवा त्यासाठी सेवा पुरविली जात नसल्यामुळे त्यात वस्तू सेवा कर (जीएसटी) लागू होत नाही, असा दावाही करण्यात आला. नुकताच पंजाब न्यायालयानं यासंदर्भात दिलेल्या निकालातही हा निव्वळ एक ऑनलाईन गेम असून त्यात कोणत्याही प्रकारचा जुगार अथवा सट्टेबाजी केली जात नसल्याचे स्पष्ट म्हटलं आहे. तसेच हा खेळ खेळण्यासाठी बुद्धी आणि कौशल्याचा वापर करावा लागत असल्याचंही पंजाब न्यायालयानं या निकालात म्हटलं आहे. त्यावर दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेत पंजाब न्यायालयाने दिलेला निकाल आणि ‘ड्रीम इलेव्हन’ची बाजू ग्राह्य धरत हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Cold Wave : भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
Mohammed Shami : टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Hitendra Thakur Palghar VVPAT :  व्हीव्हीपॅट्स आणि EVM जशास तशा तपासाव्या - ठाकूरSharad Pawar Meets Baba Adhav Pune : बाबा आढावांचं आत्मक्लेश आंदोलन; शरद पवार भेटीलाTOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 30 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  9 AM : 30 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Cold Wave : भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
भयंकर थंडीने नाशिक गारठलं, निफाड, ओझरमध्ये हाडं गोठवणारी थंडी, गोदावरी नदीवर धुक्याची चादर
Mohammed Shami : टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
टीम इंडियाचा वाघ पुन्हा एकदा जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये खेळण्याच्या आशा मावळल्या? फोटो व्हायरल
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
गृहखातं सोडाच, पण शिवसेनेतील 'या' 4 नेत्यांना मंत्रिमंडळात घेण्यास भाजपचा आक्षेप, एकनाथ शिंदे काय करणार?
Ind vs Aus 2nd Test : ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
ज्याची भीती होती तेच झाले...! पिंक बॉल टेस्टमधून स्टार वेगवान गोलंदाज बाहेर, संघाला मोठा धक्का
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या मनात नेमकं काय चाललंय? मोबाईल रेंज नसलेल्या दरे गावात मुक्काम, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
भाजपचा गृहखात्याला नकार, एकनाथ शिंदे संध्याकाळपर्यंत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
एसटीपेक्षा शिवशाहीच्या अपघाताचं प्रमाण सर्वाधिक! गोंदिया अपघातानंतर शिवशाहीच्या अवस्थेचा  प्रश्न ऐरणीवर
एसटीपेक्षा शिवशाहीच्या अपघाताचं प्रमाण सर्वाधिक! गोंदिया अपघातानंतर शिवशाहीच्या अवस्थेचा प्रश्न ऐरणीवर
 ...तर मी आमदारकीचा राजीनामा देईल,EVM चं समर्थन करत पहिल्यांदा आमदार झालेल्या भाजप नेत्याचं चॅलेंज
इव्हीएम अन् आयोगावर ठाम विश्वास, शंका निर्माण झाल्यास राजीनामा देत पुन्हा निवडणूक लढवेल, भाजप नेत्याचं चॅलेंज
Cyclone Fengal: आजचा दिवस सतर्कतेचा, फेंगल वादळाचा धोका? 'या' 7 राज्यांसाठी इशारा, या वादळाची ताजी स्थिती काय? 
Cyclone: आजचा दिवस सतर्कतेचा, फेंगल वादळाचा धोका? 'या' 7 राज्यांसाठी इशारा, या वादळाची ताजी स्थिती काय? 
Embed widget