एक्स्प्लोर

Web Series : चाकरमान्यांच्या कोकणवारीवर कसला कॉपीराइट? 'देवाक काळजी' वेब सीरिजला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार

PIL Against Web Series : गणपतीला लोक आपल्या गावी जातच असतात. त्यावर कोणाचाच कॉपीराईट असू शकत नाही, असं हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे.

मुंबई :  गणेश उत्सवाला (Ganeshotsav) आपल्या मूळ गावी जाणं ही महाराष्ट्राची पारंपारिक प्रथाच आहे. त्यावर कोणाचाही कॉपीराईट असू शकत नाही, असं मत नोंदवत मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) 'देवाक काळजी' या वेब सीरिजच्या (Web Series) प्रदर्शनाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. या वेब सिरीजची स्क्रीप्ट आपली आहे, असा दावा करत नवीगनस् स्टुडिओ प्रा. लि. यांनी कॉपीराइटच्या मुद्यावर हायकोर्टात धाव घेतली आहे. कंपनीने जो कॉपीराईटचा मुद्दा उपस्थित केला आहे आणि वेब सीरिजमध्ये जे दाखवण्यात आलेलं आहे, ती महाराष्ट्रातील प्रथाच आहे. गणपतीला लोक आपल्या गावी जातच असतात. त्यावर कोणाचाच कॉपीराईट असू शकत नाही, असं हायकोर्टानं स्पष्ट केलं आहे.

या कॉपीराईटची शाहनिशा करण्यासाठी न्यायमूर्ती मनिष पितळे यांनी वेब सीरिजचे चार भागही बघितले. त्यानंतर वेब सीरिजची कथा ही चित्रपटातून घेतलेली आहे, असं प्रथमदर्शनी तरी स्पष्ट होत नाही. वेब सीरिजच्या कथेची कागदपत्रेही योग्य आहेत, असं नमूद करत हायकोर्टानं वेब सीरिजच्या प्रदर्शनास स्थगिती देण्यास नकार देत याचिकेवरील पुढील सुनावणी 25 ऑक्टोबर पर्यंत तहकूब केली आहे. 15 सप्टेंबरला यु-ट्यूबवर ही वेब सिरीज प्रदर्शित झाली आहे.

काय आहे प्रकरण :

'घरचा गणपती' या चित्रपटाच्या कॉपीराईटचा मुद्दा कंपनीनं उपस्थित केला होता. 'देवाक काळजी' या वेब सीरिजचे लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते समीर खांडेकर आणि अभिनेत्री दिब्यलक्ष्मी यांनी कॉपीराईट कायद्याचा भंग केला आहे, असा आरोप कंपनीनं केला होता. आमच्या चित्रपटाची थीम या वेब सिरीजमध्ये कॉपी करण्यात आली आहे, असा दावा कंपनीच्यावतीनं हायकोर्टात केला गेला.

आमचा चित्रपट डिसेंबर 2023 मध्ये प्रदर्शित होणार आहे. मात्र आमच्या चित्रपटातील काही दृश्य वेब सीरिजमध्ये जशीच्या तशी घेण्यात आली आहेत. तसेच अभिनेत्री दिब्यलक्ष्मी आमच्या चित्रपटातदेखील आहे. चित्रपटाप्रमाणेच तिची वेब सीरिजमध्येही तिची तिच भूमिका आहे, त्यामुळे हा विश्वासघात आहे. इथं सरळसरळ कॉपीराईटचा भंग झाल्याचा आरोप कंपनीकडून करण्यात आला.

मात्र या याचिकेला 'देवाक काळजी' या वेब सीरिजकडून विरोध करण्यात आला. या वेब सीरिजच्या कथेवर साल 2021 पासून काम सुरु होतं जे जुलै 2022 मध्ये पूर्ण झालं. गणेश उत्सवात कुटुंब कसं एकत्र येतं या थीमवर कोणाचीच मक्तेदारी असू शकत नाही, असा दावा वेब सीरिजच्या निर्मात्यांकडून केला गेला.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?

व्हिडीओ

Pune Protest : अजित पवारांनी आम्हाला साथ द्यावी, लाडकी बहीण म्हणून चॉकलेट देतायत!
Eknath Shinde Speech Dadar :चक्रव्यूह भेदून शाहजीबापूने सगळ्यांना आडवं पाडलं, शिंदेंचं मुंबईत भाषण
Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur : कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
कोल्हापुरात आराम बसवर दरोडा, पोलिसांचा 12 तासांत तपास, 1 कोटी 22 लाखांच्या मुद्देमालासह सात आरोपी जेरबंद
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
निवडणुकीची तयारी... मुंबई महापालिकेत भावी नगरसेवकांची तोबा गर्दी; पहिल्याच दिवशी 4165 अर्जांची विक्री
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
सीबीआयकडून GST कार्यालयातील अधिकाऱ्यास रंगेहात अटक; 5 लाखांची लाच घेताना ठोकल्या बेड्या
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; नडला व्हिआयपी दर्शनासाठी अट्टाहास
Embed widget