एक्स्प्लोर

मुलुंडमधील मैदानाच्या विकासकामाला हायकोर्टाची स्थगिती

मुंबईत मुलुंडमधील संभाजीराजे मैदानावर सुरु असलेल्या काँक्रिटीकरणाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.

मुंबई : मुंबईत मुलुंडमधील संभाजीराजे मैदानावर सुरु असलेल्या काँक्रिटीकरणाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. स्थानिक नागरिकांचा विरोध डावलून क्राँक्रिटीकरणाच्या नावाखाली हे मैदान घशात घालण्याचा भाजपच्या स्थानिक नगरसेवकांचा हा डाव असल्याचा आरोप करत माजी आमदार शिशिर शिंदे आणि अन्य दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पालिकेनं कोणत्या अधिकारात हे काम सुरु केलं, याचा तपशील पुढील आठवड्यात सादर करण्याचे निर्देश मंगळवारी झालेल्या सुनावणीत देण्यात आले. पालिकेच्या कामाला 3 मेपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी सुरु आहे. तीन दशकांपूर्वी केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वसाहतींशी चर्चा करुन त्यांच्या ताब्यातील जमीन मैदानासाठी मिळवण्यात आली. त्या माध्यमातून स्थानिक नागरिकांसाठी भव्य मोकळे मैदान मुलुंडमध्ये उभारण्यात आले. यासंदर्भात मुंबईत प्रथमच टीडीआर पद्धतीचा अवलंब करण्यात आला. आज हा संपूर्ण भूखंड मैदानाच्या आरक्षणाखाली राखीव आहे. या मैदानाची देखभाल करत असलेल्या ट्रस्टने 15 वर्षांपूर्वी उभारलेल्या म्युझिकल जॉगिंग ट्रॅकचा उपयोग दररोज जवळपास चार हजार जॉगर्स करतात. तसेच या विभागातील खूप मोठ्या प्रमाणातील मुले-मुली या मैदानाचा क्रिकेट व अन्य खेळांसाठी वापर करतात. या विभागातील अनेक शाळांना स्वत:चं असं मैदान नसल्याने त्या शाळाही क्रीडा महोत्सवासाठी याच मैदानाचा वापर करतात. वॉटर कूलर, मोफत वाचनालाये अशा सुविधाही मैदानाच्या कडेला देण्यात आल्या आहेत. स्थानिक नागरिक मैदानाचा पुरेपूर वापर करत असताना भाजपच्या विद्यमान नगरसेविका रजनी किणी यांच्या पुढाकारानं पालिकेने या मैदानाचा नवा विकास आराखडा बनवून मैदानात स्केटिंग रिंग, बॅडमिंटन कोर्ट, व्हॉलीबॉल, फुटबॉल व बास्केटबॉल कोर्ट करण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी नियमांचे उल्लंघन करुन मोठ्या प्रमाणात काँक्रिटीकरण केले जात आहे. या सर्व प्रकल्पाला सव्वा सात कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. अवघ्या दोन मिनिटांवरच चिंतामणराव देशमुख मैदानात पालिकेने काही वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले स्केटिंग रिंग विनावापर पडून आहे. या साऱ्याचा सारासार विचार न करताच विनाकारण अवाढव्य खर्च केला जात आहे, असा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे. तसेच या कामाला स्थगिती देण्याची आणि मैदान पुन्हा मूळ स्वरुपात करण्याचे निर्देश देण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7PM 16 January 2025ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6PM 16 January 2025Saif Ali Khan Attacked Criminal CCTV : सैफ अली खानवर चाकू हल्ला करणारा आराेपी सीसीटीव्हीत कैदTop 50 : टॉप 50 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर Abp Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia Crime : कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
कर्तव्यावर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळ्या झाडून आयुष्य संपवलं, तिरोडा येथे बदली झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याचा संशय
Shitanshu Kotak Batting Coach : टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
टीम इंडियाला नवा बॅटिंग कोच मिळाला, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपासूनच जबाबदारी सांभाळणार!
Raju Shetti on Almatti Dam : अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या निर्णयाला स्थगिती द्या; राजू शेट्टींची केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे मागणी
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
ती माझी बहीण, व्हिडिओ-फिडिओ काही नाही; धस म्हणाले, मी धुतल्या तांदळासारखं आयुष्य जगलोय
Buldhana Hair Loss : वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
वातावरणातील विषारी घटकामुळे शेगाव तालुक्यात केस गळती, ICMR पथकातील संशोधकांचा प्राथमिक अंदाज
Amit Shah Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : जेव्हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह थेट आयसीसी चेअरमन जय शाहांवर भडकतात!
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
Video : सडपातळ बांधा, अंगात टी-शर्ट, पाठीवर बॅग; सैफवर हल्ला करणारा आरोपी कॅमेऱ्यात कैद, फोटो समोर
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
देशात सर्वाधिक महिला डायरेक्टर असलेले पहिलं राज्य महाराष्ट्र; सिडबीकडून स्टार्टअपसाठी 200 कोटी
Embed widget