एक्स्प्लोर

Raj Thackeray: कोर्टाने राज ठाकरेंच्या भाषणांचा तपशील मागवला, हिंदी भाषिकांविरोधात कथित द्वेषपूर्ण वक्तव्याप्रकरणी खटल्यावरील सुनावणीत काय घडलं?

Raj Thackeray: माध्यमांवरील प्रतिक्रियांमुळे आणि मनसे आणि राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्यानंतर धमक्यांचे सत्र वाढल्याचा सुनील शुक्ला यांचा दावा आहे.

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनवणीदरम्यान उच्च न्यायालयाने अमराठी भाषिकांविरोधात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कथित द्वेषपूर्ण वक्तव्यांच्या घटनांची माहिती मागवली आहे. याचिकाकर्त्यांकडून या घटनांची माहिती मागवत उच्च न्यायालयाने सुनवणी तहकूब केली. उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी याप्रकरणी याचिका दाखल करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याचिकाकर्ते सुनील शुक्ला यांनी याचिकेत त्यांच्या कार्यालयाची मानसैनिकांनी तोडफोड केल्याचा तसेच समाज माध्यमांवर पोस्ट करून त्यांना धमकावण्यात आल्याचा हवाला दिला आहे. प्रसार माध्यमांवरील प्रतिक्रियांमुळे आणि मनसे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्यानंतर धमक्यांचे सत्र वाढल्याचा सुनील शुक्ला यांचा दावा आहे.

त्यांना ठार मारण्याच्या धमक्या देणाऱ्या पोस्टचा उल्लेख

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी हिंदी भाषिकांविरोधात केलेल्या द्वेषपूर्ण भाषणांच्या कथित घटनांचा तपशील गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने मागवला आहे. राज्यात 'उत्तर भारतीय विरोधी' मोहिमेला विरोध केल्याने आपल्याला लक्ष्य केले आहे, असा आरोप उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी याचिकेमध्ये केला आहे. मुख्य न्या. श्री चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी या याचिकेवर सुनावणी पार पडली. न्यायालयाने शुक्ला यांनी नमूद केलेल्या घटनांची माहिती अधिक तपशिलात न्यायलयाने मागवत ही सुनावणी तहकूब केली. याचिकेत २०२४-२५ मधील काही घटनांचा उल्लेख केला आहे. सुमारे ३० मनसेशी संबंधित व्यक्तींनी त्यांच्या पक्ष कार्यालयावर तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच त्यांना ठार मारण्याच्या धमक्या देणाऱ्या पोस्टचा उल्लेख केला आहे.

त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण मिळावे

शुक्ला यांनी राज ठाकरे व धमक्या देणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली. तसेच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण मिळावे. तसेच हे प्रकरण प्रलंबित असताना राज ठाकरे यांना प्रक्षोभक वक्तव्ये करण्यास मनाई करावी व पक्षाची मान्यता रद्द करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशा मागण्या शुक्ला यांनी याचिकेद्वारे केल्या आहेत.

राज ठाकरे व मनसेविरोधात याचिका केल्यानंतर त्यांना अधिक धमक्या

शुक्ला यांच्या म्हणण्यानुसार, आपण वृत्तवाहिन्यांवर झळकल्यानंतर तसेच सर्वोच्च न्यायालयात राज ठाकरे व मनसेविरोधात याचिका केल्यानंतर त्यांना अधिक धमक्या देण्यात आल्या आहेत. गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या भाषणानंतर बँका, मॉल्स आदी ठिकाणी मराठी न बोलणाऱ्या हिंदी भाषिक कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले आणि त्यांच्यावर हल्ले करण्यात आले. मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्त, राज्यपाल, केंद्रीय गृहमंत्री आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना तक्रारी व ई-मेल पाठवूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे याचिकेत म्हटले आहे. प्रशासनाची ही निष्क्रियता म्हणजे राज्यघटनेतील त्यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन असल्याचा दावा याचिकेत केला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची १० वाजता बैठक

महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची १० वाजता बैठक आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. मराठी भाषा दिनाच्या नियोजनाची आज १० वाजता शिवतीर्थवर बैठक आहे.

About the author सचिन गाड

सचिन गाड, प्रतिनिधी, एबीपी माझा

Read More

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Pratap Sarnaik: मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
मराठी न येणाऱ्या रिक्षा- टॅक्सीचालकांची उद्यापासून खैर नाही, आरटीओचं वायूवेग पथक जागेवर बॅच-लायसन्स सस्पेंड करणार, प्रताप सरनाईकांची ठाम भूमिका
Narendra Modi: मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
मला मोदींचा अभिमान वाटतो, ते चांगलं काम करतात; युगेंद्र पवारांकडून कौतुक, बारामती दौऱ्याबाबतही भाष्य
Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांकडून गैरफायदा

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Junnar Crime News : पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
पिंपळवंडीतील चिमुकलीसोबत नेमकं काय घडलं अन् नराधमाचं बिंग कसं फुटलं? वाचा स्टार्ट टू एंड घटनाक्रम
Govinda: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
Video: गोविंदाची पत्नी लेकासोबत फॅमिली कोर्टात पोहोचली; कॅमेऱ्यासमोर बेधडक बोलणारी सुनीता एकदम शांत दिसली, पण कारमध्ये बसताना संताप अनावर अन् म्हणाली..
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
मोठी बातमी! आम्हाला मिळत नसेल तर 'शिवसेना पक्ष आणि चिन्ह' गोठवा; ठाकरेंचे वकील कपिल सिब्बलांची न्यायालयात महत्त्वाची मागणी
Rain Update: अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
अल-निनोचं संकट कायम, सप्टेंबर महिन्यातही पावसाचा जोर नाहीच; हवामान विभागाने दिली महत्त्वाची माहिती
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
'वाढत्या वयाचा अर्थ असुरक्षितता किंवा अपमान असा होऊ नये..' पालक आपल्या मुलांना मालमत्तेतून बेदखल करू शकतात; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश
Pune Junnar Crime News: 'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
'चल तुला सायकल शिकवतो' म्हणत घरापासून दूर ऊसाच्या शेतात नेलं; जुन्नरमधील चिमुरडीवर अत्याचार झालेलं ठिकाण अंगावर काटा आणणारं, व्हिडीओ समोर
Rahul Gandhi Chhatron ki Goonj: राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या परवानगीला विलंब, प्रशांत जगतापांनी दंड थोपटताच पोलिसांकडून हिरवा कंदील मिळाला
Asim Sarode on Rahul Narvekar: 'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
'शाश्वत शब्दाचा अर्थ तरी कळतो का? राहुल नार्वेकर स्वतः वकील, त्यांना माझे जाहीर आव्हान आहे..' असीम सरोदेंकडून चॅलेंज
Embed widget